Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“न्यायमूर्ती स्वामीनाथन विरोधातील महाभियोगाला समर्थन म्हणजे हिंदूंचा अपमान”, शिंदेंकडून उबाठाच्या बेगडी हिंदुत्वाचा पर्दाफाश

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही देशभक्त संघटना असून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय गृहमंत्री अमितजी शहा यांच्यावर केलेली टीका हे समतोल ढासळ्याचे लक्षण असल्याचा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 11, 2025 | 07:18 PM
शिंदेंकडून उबाठाच्या बेगडी हिंदुत्वाचा पर्दाफाश

शिंदेंकडून उबाठाच्या बेगडी हिंदुत्वाचा पर्दाफाश

Follow Us
Close
Follow Us:
  • एकनाथ शिंदे यांची उबाठावर टीका
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही देशभक्त संघटना
  • मुंबई लुटणाऱ्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर बोलू नये
नागपूर : सत्तेसाठी हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, अशी सणसणीत टीका शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठावर केली. हिंदू मंदिरात दिवा लावण्याचे आदेश देणाऱ्या मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जी.आर स्वामीनाथन यांच्याविरोधातील महाभियोग प्रस्तावात उबाठा खासदारांनी स्वाक्षरी केल्याचे दाखवत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठाच्या बेगडी हिंदुत्वाचा पर्दाफाश केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही देशभक्त संघटना असून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय गृहमंत्री अमितजी शहा यांच्यावर केलेली टीका हे समतोल ढासळ्याचे लक्षण असल्याचा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला. नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मुंबई लुटणाऱ्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर बोलू नये. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात देश आत्मनिर्भर होतोय. त्याच दरम्यान अयोध्येत राम मंदीर उभं राहिले. तसेच बाळसाहेबांचे जे स्वप्न होतं की काश्मिरमधील ३७० कलम हटवावं ते मोदीजींच्या नेतृत्वात अमित शहा यांनी पूर्ण केल. मोदीजी आणि गृहमंत्री अमित शाहांवर टीका करणं दुर्देवी, असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. अनेक वर्ष ज्यांनी मुंबई लुटली, मुंबईची तिजोरी धुतली. कोविड काळात रुग्णांची खिचडी गिळली, मिठीतला गाळ गिळला, रस्त्यातला डांबर खाल्ला, बॉडीबॅगमधून पैसे खाल्ले, खोटी कोविड सेंटर उभी करुन मढ्याच्या टाळुवरचे लोणी खाल्लं, अशा लोकांनी अमित शहांवर बोलणं मोठी शोकांतिका आहे. त्यांचा कुठंतरी समतोल ढासळला आहे त्यामुळे असे असंबधं बोलत आहेत, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली.

“कोकणातील आंब्यालाच हापूसचा दर्जा -मानांकन मिळाले पाहिजे”, शेखर निकम यांनी हिवाळी अधिवेशनात मांडली स्पष्ट भूमिका

ते पुढे म्हणाले की, दोन नंबरवाल्याने विधानसभा निवडणुकीत त्यांना शेवटच्या नंबरवर बसवले. मुख्यमंत्री असताना ते घटनाबाह्य पद आहे अशी टीका करत होते. घटनाबाहय शब्द त्यांच्या आवडीचा आहे. त्यांना बाबासाहेबांचे संविधान मान्य नाही त्यामुळे नेहमी ते घटनाबाह्य बोलून टाहो फोडतात, असे ते म्हणाले. त्यांच्या काळात अजित दादा उपमुख्यमंत्री होते. काचेच्या घरात राहणाऱ्यानी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारु नये, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. आताची त्यांची परिस्थिती म्हणजे केविलवाणी धडपड आहे, असे ते म्हणाले. शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री होतो हे त्यांना पचनी पडले नाही. त्यामुळे त्यांच्याकडून जळजळ मळमळ सारखी बाहेर पडतेय, असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला.

एकीकडे मुख्यमंत्र्यांना भेटायला बुके घेऊन जायचे आणि दुसरीकडे टीका करायची ही दुटप्पी भूमिका आहे. ज्यांनी सत्तेच्या खूर्चीसाठी स्वत:चे पायपुसणं करुन घेतलं त्यांना मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याचा अधिकार नाही, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. मद्रास हायकोर्टाचे न्यायमूर्ती स्वामीनाथन यांच्या विरोधात डीएमके आणि उबाठा यांनी महाभियोगाचा प्रस्ताव सादर केला. त्यामुळे उबाठाला हिंदुत्व शिकवण्याची नैतिकता आहे का? असा सवाल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थित आहे. त्यांच्या काळात दहशतवादी याकूब मेमनची कबर सजवली, मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी त्यांच्या प्रचारात होते, त्यांनी हिंदुत्व शिकवू नये, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. मोठे घोटाळे करणारे लोक व्होटचोरीचा मुद्दा काढत आहेत. ते जेव्हा निवडणुका हरतात तेव्हा यंत्रणा वाईट होते, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. लाडक्या बहिणींची योजना जी सुरु केली ती कधीही बंद होणार नाही. तसेच यो योजनेसाठी जे आश्वासन सरकारने दिले आहे ते पूर्ण करणार, असा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केला.

शेतकऱ्यांच्या मदतीवरुन उबाठाचा खोटारडेपणा केला उघड

अतिवृष्टीबाबत राज्य सरकारने शेतकऱ्यांना ३२ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले असून त्यातील १४ हजार कोटींची मदत प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्य खात्यात जमा झाल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. अमरावती ३४१५ कोटी, छत्रपती संभाजी नगरसाठी ६२४९ कोटी, कोकण विभाग ४० कोटी, नागपूरसाठी ७१६ कोटी आणि नाशिक विभागाला १५५३ कोटी असे एकूण १४ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत अशी ओरड म्हणजे खोटारडेपणाचा कळस आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली.

मुंबईकरांसाठी गुडन्यूज! OC नसलेल्या 20 हजार इमारतींना…; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून घोषणा

Web Title: Supporting the impeachment of justice swaminathan is an insult to hindus eknath shinde exposes ubt biased hindutva

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2025 | 07:18 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Eknath Shinde
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

“कोकणातील आंब्यालाच हापूसचा दर्जा -मानांकन मिळाले पाहिजे”, शेखर निकम यांनी हिवाळी अधिवेशनात मांडली स्पष्ट भूमिका
1

“कोकणातील आंब्यालाच हापूसचा दर्जा -मानांकन मिळाले पाहिजे”, शेखर निकम यांनी हिवाळी अधिवेशनात मांडली स्पष्ट भूमिका

मुंबईकरांसाठी गुडन्यूज! OC नसलेल्या 20 हजार इमारतींना…; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून घोषणा
2

मुंबईकरांसाठी गुडन्यूज! OC नसलेल्या 20 हजार इमारतींना…; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून घोषणा

मुख्यमंत्र्यांच्या प्रचारापासून अग्निशमन वाहन हेलिपॅडवरच; लोहा नगरपालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार आला चर्चेत
3

मुख्यमंत्र्यांच्या प्रचारापासून अग्निशमन वाहन हेलिपॅडवरच; लोहा नगरपालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार आला चर्चेत

NAGPUR : अधिवेशनातील उपस्थितीवरून आ. निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका
4

NAGPUR : अधिवेशनातील उपस्थितीवरून आ. निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.