Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BJP- Supriya Sule: भाजपकडून बिटकॉईन ऑडिओ क्लिपचा आरोप; सुप्रिया सुळेंचे सणसणीत प्रत्युत्तर

आज सकाळी मी सुधांशु त्रिवेदींना मानहानीची नोटीस पाठवली. त्यांनी मला पाच प्रश्न विचारले आहे, मी बाहेर येऊन उत्तर द्यावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Nov 20, 2024 | 02:38 PM
दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणावरून नेत्याचे खासदार सुळेंना पत्र

दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणावरून नेत्याचे खासदार सुळेंना पत्र

Follow Us
Follow Us:

मुंबई:  भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटण्याचे आरोप झाले, यावरून काल मुंबईतील विवांता हॉटेलमध्ये मोठा गोंधळही झाला. या प्रकारानंतर विरोधीपक्षनेत्यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली. राज्यभरात एकच खळबळ माजली होती. या प्रकारानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर भाजपकडून गंभीर आरोप करण्यात आले. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी निवडणुकीच्या आदल्या दिवसी रात्री घेतलेल्या  पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे आणि काँग्रेस नेते नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले. एका ऑडिओ क्लिपचा संदर्भ देत सुप्रिया सुळे बिटकॉईनचे व्यवहार करून निवडणुकांसाठी निधी जमा करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

सुधांशु त्रिवेदी यांनी केलेल्या आरोपांवर सुप्रिया सुळे यांनी सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे. माजी पोलीस अधिकारी रवींद्र पाटील यांनी सुप्रिया सुळे  आणि नाना पटोलेंवर आरोप केल्यानंतर त्या पाठोपाठ सुधांशू त्रिवेदींनी सुप्रिया सुळेंवर गंभीर आरोपही केले. सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंनी विदेशी चलनाचा वापर करून निवडणुकीवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला. असा आरो करत चौकशीची मागणी केली.

Baramati Politics: बारामतीत दमदाटी करून बोगस मतदान; युगेंद्र पवारांच्या मातोश्रींनी थेट पुरावाच दाखवला

सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर

त्रिवेदी यांच्या आरोपांना उत्तर देताना सुप्रिया सुळें म्हणाल्या “ माझ्यावर असे आरोप करण्यात आल्याचे काल संध्याकाळी मला कळाले,  माझ्या हातात ते व्हॉईस रेकॉर्डिंग आल्यानंतर मी  सर्वात आधी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना फोन केला. काही बनावट रेकॉर्डिंग फिरत आहे आणि मला सायबर क्राईमकडे तक्रार करायची असल्याचं मी त्यांना सांगितलं. मी काल संध्याकाळीच ऑनलाईन तक्रार दाखल केली.  या सगळ्या रेकॉर्डिंग्स आणि मेसेजेस खोटे आणि बनावट आहेत.

आमचा कोणालाही पाठिंबा नाही..व्हायरल पत्र खोटं, मतदार सुज्ञ; राज ठाकरेंचा पलटवार

सुधांशु त्रिवेदींविरोधात मानहानीचा दावा

त्याचवेळी आपण सुधांशु  त्रिवेंदींविरोधात मानहानीचा दावा केल्याचेही सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितले. “आज सकाळी मी सुधांशु त्रिवेदींना मानहानीची नोटीस पाठवली. त्यांनी मला पाच प्रश्न विचारले आहे, मी बाहेर येऊन उत्तर द्यावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे. मी त्यांच्या प्रश्नांना उत्तरंही देणार आहे. त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला माझं उत्तर असेल, “नाही.” सगळे आरोप खोटे आहेत. त्यामुळेच मी सायबर क्राईमकडे तक्रार केली असून त्याच्याविरोधात अवमान याचिकाही दाखल केली आहे.

 अजित पवारांची प्रतिक्रीयेला उत्तर

सुप्रिया सुळेंच्या व्हायरल व्हिडीओबाबत बोलताना अजित पवारांनीही ऑडिओतील आवाज सुप्रिया सुळेंचा असल्याचे म्हटले होते. त्यावरही बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “ते अजित पवार आहेत. ते काहीही म्हणू शकतात. राम कृष्ण हरी. पण व्हायरल ऑडिओमध्ये माझा आवाज नाही. तो आवाज कुणीही चेक करावा. पोलीस अधिकारी रवींद्र पाटील हे दोन वर्षे तुरूंगात राहूल आले आहेत. त्यांनी माझ्यावर आरोप केले. पण ती ऑडिओ क्लिप खोटी आहे. असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Web Title: Supriya sules response to bjps bitcoin audio clip allegations nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2024 | 02:38 PM

Topics:  

  • BJP
  • Maharashtra Assembly election 2024
  • supriya sule

संबंधित बातम्या

Suvendu Adhikari Helicopter Emergency Landing: सुवेंदू अधिकारींच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग
1

Suvendu Adhikari Helicopter Emergency Landing: सुवेंदू अधिकारींच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग

NDA MPs Protest: आता राहुल गांधी पळू नका…! रांची विद्यार्थी लाठीचार्जवरून भाजप खासदारांची संसदेबाहेर घोषणाबाजी
2

NDA MPs Protest: आता राहुल गांधी पळू नका…! रांची विद्यार्थी लाठीचार्जवरून भाजप खासदारांची संसदेबाहेर घोषणाबाजी

‘शुद्ध पेट्रोल तुझ्या बापाच्या घरून येणार का?’; इथेनॉलच्या मुद्द्यावर भाजप खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य
3

‘शुद्ध पेट्रोल तुझ्या बापाच्या घरून येणार का?’; इथेनॉलच्या मुद्द्यावर भाजप खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य

Satara Har Ghar Tiranga Abhiyan 2026: सातार्‍यातील मोती चौकात १००० तिरंगा ध्वजांचे वाटप
4

Satara Har Ghar Tiranga Abhiyan 2026: सातार्‍यातील मोती चौकात १००० तिरंगा ध्वजांचे वाटप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.