Photo Credit- Social Media शर्मिला पवार यांनी बारामती मतदान केंद्रावर दमदाटी करून बोगस मतदान सुरू असल्याच आरोप केला
मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठी आज एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली. पण मतदान सुरू झ्लायच्या अवघ्या काही तासातच बारामती मतदान केंद्राबाहेर गोंधळ झाल्याची माहिती समोर आली आहे. बारामती मतदारसंघातील मतदान केंद्रावर दमदाटी करून बोगस मतदान सुरू असल्याच आरोप शर्मिला पवार यांनी केला आहे. शर्मिला पवार या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या मातोश्री आहेत. त्यांच्या या आरोपांमुळे एकच खळबल उडाली आहे.
आमचा कार्यकर्ता मोहसीन आहे. तो त्याचे काम करत होता. काही स्थानिक लोक आहेत.काही स्थानिक लोकांनी या या बसा बसा झाल का तुम्ही वोटींग केलं का, तुमचं मतदान झालं का, असे वेगवेगळे इशारे करणे सुरू आहे. आता आम्हाला या स्लिप दिसत आहे. यावर स्टॅम्पवर घड्याळ चिन्हाचा स्टॅम्प ने मारलेलं दिसत आहे. आम्ही त्यांना विचारलं तर त्यांनी आम्हाला माहिती नाही, असं सांगितलं. याची तक्रार आम्ही करणार आहोत. दमदाटी करून त्यांनी मोहसीनला खल्लास करीन अशी धमकी दिली. पण धमकी देणारा वेगळ्या पद्धतीने वागत होता. असा आरोप शर्मिला ठाकूर यांनी केला. विशेष म्हणजे यावेळी शर्मिला पवार यांनी बोगस मतदान केल्याच्या काही स्लिपही दाखवल्या.
Maharashtra Election 2024: महाराष्ट्रातील ‘या’ गावाने पुकारला यल्गार; अद्याप एकही मतदान नाही,
शर्मिला पवार यांच्या आरोपांनंतर अजित पवार हेदेखील संबंधित मतदान केंद्रावर दाखल झाले. यावेळी झालेल्या प्रकाराचा आढावा घेत अजित पवार यांनी शर्मिला पवार यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. शर्मिला पवार यांनी केला आरोप धादांत खोटा आहे. आम्ही सुसंस्कृत महाराष्ट्रात राहतो, आमचे कार्यकर्ते असे करणार नाही. आमच्या कार्यकर्त्यांनी कुणालाही धमक्या दिल्या नाही. तुम्ही ज्या पक्षाचे उमेदवार किंवा कार्यकर्ते असता त्यावेळी तुम्हाला स्लिप दिली जाते. त्यावर संबंधित पक्षाचे चिन्ह असते. हे आजच नाही अनेक वर्षांपासून चालत आलं आहे. आज मतदानाचा दिवस आहे. जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावे, पण दुपार झाली तरी मतांची टक्केवारी कमी आहे. जास्तीत जास्त लोकानी मतदान कराव, असं आवाहन मी करत आहे. तुमच्या सद्सद् विवेक बुद्धीला योग्य वाटेल त्या उमेदवाला मतदान करा, असही त्यांनी म्हटलं आहे.