Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ठाकरेंच्या बॅगेची लातूरमध्ये पुन्हा तपासणी; सुषमा अंधारेंचा निवडणूक आयोगावर निशाणा; म्हणाल्या, “ठरवून पक्षप्रमुख…”

गेल्या चार महिन्यात फक्त बॅग तपासण्यासाठी मीच सापडलो का? नरेंद्र मोदी, अमित शहा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगा का तपासल्या नाहीत आजपर्यंत? असा सवाला उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना केला.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 12, 2024 | 03:00 PM
ठाकरेंच्या बॅगेची लातूरमध्ये पुन्हा तपासणी; सुषमा अंधारेंचा निवडणूक आयोगावर निशाणा; म्हणाल्या, "ठरवून पक्षप्रमुख..."

ठाकरेंच्या बॅगेची लातूरमध्ये पुन्हा तपासणी; सुषमा अंधारेंचा निवडणूक आयोगावर निशाणा; म्हणाल्या, "ठरवून पक्षप्रमुख..."

Follow Us
Close
Follow Us:

लातूर: राज्यात विधानसभा निवडणूक अगदी शेवटच्या टप्प्यात आलेली पाहायला मिळत आहे. महायुती आणि महाविकास आघाडी जोरदारपणे आपल्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. दरम्यान लातूर जिल्ह्यातील एका प्रचार सभेला जात असताना पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंची बॅग तपासण्यात आली आहे. औसा हेलीपॅडवर उद्धव ठाकरे यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. लातूर जिल्ह्यातील औसा हेलीपॅडवर ठाकरेंच्या बॅग तपासण्यात आल्या आहेत. काल वणी येथे देखील त्यांची बॅग तपासण्यात आली होती.

सुषमा अंधारे काय म्हणाल्या? 

निवडणूक आयोगाने घातलेल्या आचारसंहितेचा आदर केला पाहिजे. मात्र ही आचारसंहिता केवळ आमच्यासाठी आहे की, सत्ताधारी यांच्यासाठी आहे? असा सवाल सुषमा अंधारे यांनी विचारला आहे. हे जे काही चालू आहे त्यावरून ठरवून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना टार्गेट केले जात आहे. त्यांची प्रतिमाहनन करण्यासाठी या प्रकारचे कृत्य केला जात आहे, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे.

हेही वाचा:  Uddhav Thackeray : यवतमाळमध्ये उद्धव ठाकरेंच्या बॅगांची झडती; निवडणूक अधिकाऱ्यांवर ठाकरे कडाडले, Video ही काढला

विधानसभा निवडणुकीच्या प्रचासाठी आज उद्धव ठाकरे यवतमाळ जिल्ह्यात आहेत. दरम्यान वणी येथे प्रचारसभेसाठी जात असताना निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्या बगची झडती घेतली. त्यामुळे संतापलेल्या ठाकरेंनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरलं आणि नंतर प्रचारसभेतही चांगलाच समाचार घेतला. उद्धव ठाकरे यांनी याचा स्वत: व्हिडिओही शूट केला आहे.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

गेल्या चार महिन्यात फक्त बॅग तपासण्यासाठी मीच सापडलो का? नरेंद्र मोदी, अमित शहा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगा का तपासल्या नाहीत आजपर्यंत? असा सवाला उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना केला. मी तुमच्या कामात अडथळा आणणार नाही, मात्र सर्व पक्षांच्या नेत्यांची झडती घ्या. पण या निवडणुकीत नरेंद्र मोदी, अमित शहा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्याही बॅगा तपासल्याचे व्हिडिओ समोर आले पाहिजेत, असंही ठाकरे यांनी म्हटलं आहे.

वणी झालेल्या प्रचार सभेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणावरून चांगलाच समाचार घेतला. नरेंद्र मोदी महाराष्ट्रात सभेसाठी आल्यावर सर्व रस्ते बंद केले जातात. पण मोदी असो वा अमित शाह, फडणवीस असोत वा अजित पवार यांच्या बॅगा कधी तपासल्या का? त्या तपासल्या जाणार नसतील तर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आता त्यांच्या बॅगा तपासतील. पण पोलिसांनी मधे यायचं नाही. निव़डणूक अधिकाऱ्यांनीही मधे यायच नाही, आमच्या बॅग तपासण्याचा जसा तुम्हाला अधिकार आहे तसाच प्रचाराला जो कोणी येईन, त्याची बॅग तपासण्याचा अधिकारही मतदारांना आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. म्हटलं आहे.

Web Title: Sushma andhare criticizes on election comission about uddhav thackeray bag checking maharashtra election 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2024 | 03:00 PM

Topics:  

  • Election Comission
  • Maharashtra Assembly election 2024
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; फडणवीसांनी एका वाक्यात संपवला विषय, म्हणाले…
1

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; फडणवीसांनी एका वाक्यात संपवला विषय, म्हणाले…

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ
2

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ

Best Election Results: युतीचा फुगा फुटला! ‘बेस्ट’ निवडणुकीत हरताच प्रसाद लाडांनी ठाकरे बंधूंना डिवचलं; म्हणाले….
3

Best Election Results: युतीचा फुगा फुटला! ‘बेस्ट’ निवडणुकीत हरताच प्रसाद लाडांनी ठाकरे बंधूंना डिवचलं; म्हणाले….

BEST Election Results: पहिल्याच परिक्षेत ठाकरे बंधु नापास, ‘बेस्ट टेस्ट’ मध्ये हरले उद्धव-राज, वाचा निकाल
4

BEST Election Results: पहिल्याच परिक्षेत ठाकरे बंधु नापास, ‘बेस्ट टेस्ट’ मध्ये हरले उद्धव-राज, वाचा निकाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.