अहमदनगर जिल्ह्यातील वकील दांपत्याचे अपहरण करून हत्या झाली. या घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई करा अशी मागणी वडगाव मावळ लीगल बार असोसिएशनच्या वतीने मंगळवारी ( दि ३० )करण्यात आली आहे याबाबत मावळचे तहसिल याना निवेदन देण्यात आले.
वडगाव मावळ : अहमदनगर जिल्ह्यातील वकील दांपत्याचे अपहरण करून हत्या झाली. या घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई करा अशी मागणी वडगाव मावळ लीगल बार असोसिएशनच्या वतीने मंगळवारी ( दि ३० )करण्यात आली आहे याबाबत मावळचे तहसिल याना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, राहुरी न्यायालयात वकिली क्षेत्रात कार्यरत असलेले ॲड. राजाराम आढाव आणि त्यांच्या पत्नी ॲड. मनीषा आढाव हे दांपत्य गुरुवारी, दिनांक २५ जानेवारी २०२४ पासून बेपत्ता होते. त्यानंतर पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात आला असता दांपत्याची हत्या झाल्याबाबत कळाले. सदर वकील दांपत्याचे अपहरण करून हत्या झाल्याने देशात वकील ही सुरक्षित नाही अशा घटना वारंवार घडत आहेत.
वकील संरक्षण कायदा पारित करावा, सदर खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा, आरोपींना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी वडगाव मावळ लिगल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीने मावळचे निवासी नायब तहसीलदार यांना निवेदनाद्वारे केली आहे
यावेळी अध्यक्ष अँड सोमनाथ पवळे, अँड धनंजय कोद्रे, दिपक चौधरी, अँड प्रिया पंडित, अँड मोनाली कुलकर्णी, खजिनदार अँड मिनाक्षी ढोरे, सचिव अँड प्रणोती पिंगळे, अँड अक्षय रौधळ,
आदी उपस्थित होते
Web Title: Take strict action against the culprits in the murder of the lawyer couple demand of vadgaon legal practitioners association nrab