Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तामलवाडी टोलनाक्यावर स्थानिकांच्या रोजगाराचा मुद्दा ऐरणीवर; व्यावसायिकांना हटविण्याच्या कारवाईविरोधात काँग्रेसचे आंदोलन

तामलवाडी टोलनाका परिसरातील स्थानिक दुकानदार, हॉटेल व्यावसायिक आणि छोट्या व्यावसायिकांना हटविण्याच्या प्रस्तावित कारवाईविरोधात धाराशिव काँग्रेसने आंदोलन केले. स्थानिकांचा रोजगार अबाधित ठेवण्याची मागणी करण्यात आली.

  • By विवेक
Updated On: Aug 21, 2026 | 09:20 PM
तामलवाडी टोलनाक्यावर स्थानिकांच्या रोजगाराचा मुद्दा ऐरणीवर

तामलवाडी टोलनाक्यावर स्थानिकांच्या रोजगाराचा मुद्दा ऐरणीवर

Follow Us
Follow Us:

धाराशिव, जिल्हा प्रतिनिधी : तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी टोलनाका परिसरातील गाळाधारक शेतकरी, हॉटेल व्यावसायिक, दुकानदार, पान स्टॉल, दूध विक्रेते, स्नॅक्स सेंटर चालक यांच्यासह स्थानिक व्यावसायिकांना हटविण्याच्या प्रस्तावित कारवाईच्या निषेधार्थ धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटी व तुळजापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवारी २१ ऑगस्ट रोजी शांततामय आंदोलन करण्यात आले.

टोलनाका परिसरात अनेक वर्षांपासून स्थानिक व्यावसायिक हॉटेल, दुकाने व विविध छोटे व्यवसाय चालवत असून, त्यावर अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. यातील बहुतांश व्यावसायिक शेतकरी असून, व्यवसायाच्या जागेच्या मागील बाजूस त्यांची शेती असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. त्यामुळे व्यवसाय हटविल्यास त्यांच्या उत्पन्नावर आणि कुटुंबांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.

हॉटेल व दुकाने हटविण्याची कारवाई करण्यापूर्वी स्थानिकांच्या रोजगाराचा आणि उपजीविकेचा विचार करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. तसेच स्थानिकांच्या रोजगाराचे साधन असलेली दुकाने अतिक्रमणाच्या नावाखाली हटविणे योग्य नसल्याची भूमिका काँग्रेसने मांडली.

Buldhana News: बुलढाणा जिल्हा परिषदेतील प्रतिनियुक्त्या केल्या रद्द; वर्षानुवर्षे ठाण मांडणाऱ्यांना सीईओ गुलाबराव खरात यांचा दणका

पालकमंत्र्यांनी परिसरात जमीन घेतली असून त्या ठिकाणी शेती, फळबाग किंवा रिसॉर्ट उभारणे हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे. मात्र, त्यासाठी स्थानिकांच्या रोजगारावर परिणाम होईल अशी कारवाई करू नये, असे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

स्थानिक व्यावसायिकांचा रोजगार व उपजीविका अबाधित ठेवूनच प्रशासनाने पुढील निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलनातून करण्यात आली. संबंधित व्यावसायिकांना न्याय मिळेपर्यंत काँग्रेस त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, अशी भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.

पाण्यावरून राजकारण तापले! ‘विरोधकांनी पाणी पुरवठा योजनेवरुन…’; नगरसेवक विजय धट काय म्हणाले?

आंदोलनास जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर, धिरज पाटील, धनंजय राऊत, शिवाजी गायकवाड, अरविंद बेडगे, अमोल कुतवळ, दिलीप भोकरे, सयाजी देशमुख, राजेंद्र शेंडगे, गौरीशंकर मुळे, अझहर, गोपाळ सुरवसे, हणमंत गवळी, दादासाहेब चौधरी, सिद्धेश्वर अण्णा कस्तुरे, सुनिल माळी, सत्तार मुलाणी, गोविंद डोंगरे, डॉ. पंकज घुगे, पोपट मोटे, उत्तम दादा पाटील, संजय गुंजूटे, तुकाराम नवगिरे, ज्ञानेश्वर जगताप, सुमन नवगिरे, विकास वडणे, दीपक वडणे, अश्विनकुमार आतकरे, जुबेर शेख, संदीप सुरवसे, पेंदे, सौ. वाघे ताई शिंदे, भीमा रणसुरे, दादाराव नेटके, हरिदास घोटकर, निजाम शेख, तानाजी नेटके, बाळासाहेब गायकवाड यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यापारी, दुकानदार व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Tamalwadi toll naka local businessmen congress protest dharashiv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 09:20 PM

Topics:  

  • Congress
  • Dharashiv
  • Dharashiv News

संबंधित बातम्या

नाशिक कुंभमेळ्याच्या ३५ हजार कोटींच्या खर्चाचा डीपीआर आधी जाहीर करा, जनतेच्या पैशाचा हिशोब पारदर्शक हवा – पृथ्वीराज चव्हाण
1

नाशिक कुंभमेळ्याच्या ३५ हजार कोटींच्या खर्चाचा डीपीआर आधी जाहीर करा, जनतेच्या पैशाचा हिशोब पारदर्शक हवा – पृथ्वीराज चव्हाण

राहुल गांधींच्या 8 तासांच्या ठिय्यानंतर FIR दाखल; म्हणाले, ‘न्यायाच्या दिशेने पहिले पाऊल’
2

राहुल गांधींच्या 8 तासांच्या ठिय्यानंतर FIR दाखल; म्हणाले, ‘न्यायाच्या दिशेने पहिले पाऊल’

राहुल गांधींच्या आंदोलनाला यश! पेलेट गन प्रकरणात FIR दाखल करण्यास दिल्ली पोलिसांची तयारी
3

राहुल गांधींच्या आंदोलनाला यश! पेलेट गन प्रकरणात FIR दाखल करण्यास दिल्ली पोलिसांची तयारी

‘काँग्रेस नेते राष्ट्रवादीला चुकीच्या बॉक्समध्ये बसवतात’; पृथ्वीराज चव्हाणांच्या टीकेवर सुप्रिया सुळेंचा पलटवार
4

‘काँग्रेस नेते राष्ट्रवादीला चुकीच्या बॉक्समध्ये बसवतात’; पृथ्वीराज चव्हाणांच्या टीकेवर सुप्रिया सुळेंचा पलटवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.