Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pratap Sarnaik: ‘या’ रिक्षा चालकांना मिळणार 10 हजार रुपये , आनंद दिघे महामंडळाच्या बैठकीत प्रताप सरनाईकांची घोषणा

पाच वर्षांपूर्वीची नोंदणी असलेले 65 वर्षांच्या वरिल जे काही रिक्षा चालक आहेत, त्यांना आम्ही प्रत्येकी 10 हजार रुपयांचं अनुदान देणार आहोत. याला अनुदान म्हणा किंवा पुरस्कारही म्हणता येईल.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 13, 2025 | 05:39 PM
'या' रिक्षा चालकांना मिळणार 10 हजार , आनंद दिघे महामंडळाच्या बैठकीत प्रताप सरनाईकांची घोषणा

'या' रिक्षा चालकांना मिळणार 10 हजार , आनंद दिघे महामंडळाच्या बैठकीत प्रताप सरनाईकांची घोषणा

Follow Us
Close
Follow Us:

Pratap Sarnaik News Marathi: महाराष्ट्रात नऊ ते दहा लाख ऑटो रिक्षा व मीटर टॅक्सी आहेत. “या असंघटित क्षेत्रातील ऑटो रिक्षा व मीटर टॅक्सी चालकांना सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा लाभ पुरवणे ” या उद्देशाने धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा, मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली असून हे महामंडळ महाराष्ट्रातील लाखो रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी एक आदर्श संस्था म्हणून कार्य करेल! असे प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. ते या कल्याणकारी महामंडळाच्या पहिल्या बैठकीत बोलत होते.

यावेळी, २७ जानेवारी २०२५ रोजी म्हणजे आदरणीय आनंद दिघे साहेबांच्या जयंती दिवशी या मंडळाची अधिकृत स्थापना करण्यात आली. तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री . एकनाथजी शिंदे यांच्या संकल्पनेतून हे कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात आले आहे. यासाठी राज्य शासनाने ५० कोटी रुपयांचा निधी देऊन या महामंडळाची सुरुवात केली आहे. भविष्यात केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना या मंडळाच्या माध्यमातून लाखो चालकांना साठी राबविण्यात येतील,अशी माहिती प्रताप सरनाईक यांच्याकडून देण्यात आली.

नोकरीचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार, काय आहे प्रकरण?

 सभासद नोंदणी प्रक्रिया

राज्यभरातील सर्व रिक्षा व मीटर टॅक्सी चालकांना ५००/- रुपये नोंदणी शुल्क व ३००/- रुपये वार्षिक वर्गणी भरून या मंडळाचे सदस्यत्व घेता येईल. मंडळाचे सभासद नोंदणीसाठी संकेत स्थळ (वेबसाईट) निर्माण करण्यात आले असून या संकेतस्थळावरून अतिशय सुलभ पद्धतीने चालकांना सभासत्व नोंदणी करता येईल. ( स्वतः च्या मोबाईल वरून देखील त्यांना ते सहज शक्य होईल!)

६५ वर्षावरील सभासद चालकांना निवृत्ती सन्मान योजने या योजने अंतर्गत ६५ वर्षावरील ऑटो रिक्षा व टॅक्सी चालकांना प्रत्येकी १० हजार रुपये ” सन्मान निधी” दिला जाणार आहे. त्यासाठी आवश्यक त्या अटी शर्ती त्यांनी पूर्ण करणे अपेक्षित आहे.

या बरोबरच कल्याणकारी मंडळाच्या सभासद चालकांना जीवन विमा, अपंग विमा अशा आरोग्य योजना राबविणे विचाराधीन आहेत. तसेच त्यांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजना देखील राबवली जाणार आहे.
कर्तव्यवर असताना एखादा चालकात दुखापत झाल्यास त्याला या कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून अर्थसहाय्य केले जाणार आहे.

बक्षीस योजना राबविण्यात येणार

उत्कृष्ट रिक्षा/टॅक्सी चालक ,उत्कृष्ट रिक्षा /टॅक्सी चालक संघटना तसेच उत्कृष्ट रिक्षा स्टॅन्ड यांच्यासाठी आकर्षक बक्षीस योजना दरवर्षी राबवली जाईल. असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी यावेळी केले. या बैठकीला परिवहन आयुक्त श्री. विवेक भीमनराव यांच्या सह मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.

Kalyan News: जागेच्या वादातून शेतकरी आणि बिल्डरमध्ये प्रचंड वादंग, पोलिसांनी तीन महिलांना घेतले ताब्यात

Web Title: Taxi rickshaw drivers above 65 years will get 10 thousand pratap sarnaik announced in anand dighe corporation meeting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2025 | 05:29 PM

Topics:  

  • maharashtra
  • pratap sarnaik

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
1

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा
2

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!
3

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!

महाराष्ट्रात वाघ आणि बिबट्यांचे हल्ले सुरूच, ३ वर्षांत १७,०४४ जणांचा मृत्यू, वाघांच्या मृत्यूची आकडेवारी चिंताजनक
4

महाराष्ट्रात वाघ आणि बिबट्यांचे हल्ले सुरूच, ३ वर्षांत १७,०४४ जणांचा मृत्यू, वाघांच्या मृत्यूची आकडेवारी चिंताजनक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.