संग्रहित फोटो
सोलापूर : राज्यात अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून अत्याचाराच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता सोलापुरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील एका संस्थेमध्ये मुंबईच्या महिलेला अधीक्षकपदी नोकरी लावतो, असे आश्वासन देऊन अत्याचार केल्याप्रकरणी शहरातील नामवंत व्यक्तींसह तिघांविरुद्ध अत्याचार व अॅट्रॉसिटीअंतर्गत तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
प्रदीप सोहालाल शिंघवी (रा. मंगळवार पेठ, सोलापूर), रेखा गुप्ता, शीलवंती बिराजदार (दोघी रा. सोलापूर)अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत. १५ सप्टेंबर २०२४ रोजी मुंबईतील एका महिलेच्या एका व्हॉटस्अॅप ग्रुपवर जाहिरातीची पोस्ट आली. जाहिरातीमध्ये सोलापुरातील नामांकित संस्थेत अधीक्षक आणि समुपदेशक पदांसाठी अर्ज करावा असे नमूद केले होते. त्यानुसार महिलेच्या मैत्रिणीने तिला फोन करून माहिती
घेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार महिलेने संस्थेत फोन लावला तेव्हा तो प्रदीप शिंगवी यांनी उचलला. फोनवर बोलणे झाल्यानंतर त्यांनी महिलेला सोलापूरला येण्यास सांगितले. १४ ऑक्टोबर २०२४ रोजी महिला सोलापुरात आली. महिलेची मुलाखत घेतल्यानंतर तिला लगेच नोकरीवर रुजू होण्यास सांगितले. मात्र महिलेने अपॉइंटमेंट लेटरची मागणी केली. त्यानंतर ती मुंबईला निघून गेली. नंतर पुन्हा तिला फोन करून संस्थेमध्ये जॉईन होण्यास सांगितले.
राहण्यास खोली दिली
संस्थेत राहण्यासाठी खोली दिली व कामाला सुरुवात झाली. दरम्यान महिलेला तिची जात विचारण्यात आली. मागासवर्गीय असल्याचे सांगितल्यानंतर संस्थेतील अन्य महिला तिच्याशी वेगळा व्यवहार करू लागल्या. शिवाय प्रदीप शिंगवी याने महिलेला तुला जर अपॉइंटमेंट लेटर हवे असेल तर मी जसे म्हणेल तसे करावे लागेल, असे म्हणून १८ नोव्हेंबर २०२४ रोजी महिलेवर अत्याचार केला. त्यानंतर २५ नोव्हेंबर २०२४ रोजी असाच प्रकार घडला.
8 वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार
अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यात 65 वर्षीय नराधमाने एका तीन वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली. अशातच दर्यापूर तालुक्यात पुन्हा एक धक्कादायक घटना एका गावात 18 जानेवारी रोजी उघडकीस आली आहे. यामध्ये 13 वर्षीय मुलाने 8 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार केल्याची घटना पुढे आली आहे.
बदलापुरात पुन्हा लैंगिक अत्याचार
बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका 6 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करण्यात आल्याचं पुढं आलं आहे. आरोपीने या मुलीला अंधाऱ्या निर्जनस्थळी नेलं व तिच्यावर अत्याचार केले. आरोपी हा देखील अल्पवयीन असल्याची माहिती आहे. याप्रकरणी 16 वर्षीय अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.