Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘टीबीमुक्त भारत’चा नारा कागदावरच! बीपीएचयू केंद्रांमध्ये किट्सचा तुटवडा; टू-नॅट मशीन असूनही तपासणीला ब्रेक

किट्सचा अभाव, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर नियंत्रणाचा अभाव कायम राहिल्यास या केंद्रांच्या उभारणीमागील मूळ उद्देशच धोक्यात येण्याची शक्यता आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केवळ कागदी अहवालांवर विसंबून न राहता बीपीएचयू केंद्रांची अचानक पाहणी करावी.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 29, 2026 | 02:30 PM
'टीबीमुक्त भारत'चा नारा कागदावरच! बीपीएचयू केंद्रांमध्ये किट्सचा तुटवडा; टू-नॅट मशीन असूनही तपासणीला ब्रेक

'टीबीमुक्त भारत'चा नारा कागदावरच! बीपीएचयू केंद्रांमध्ये किट्सचा तुटवडा; टू-नॅट मशीन असूनही तपासणीला ब्रेक

Follow Us
Follow Us:

एकीकडे केंद्र आणि राज्य सरकारकडून ‘टीबीमुक्त भारत’चा गाजावाजा केला जात असताना, दुसरीकडे जिल्ह्यातील बीपीएचयू केंद्रांमध्ये क्षयरोगाच्या (टीबी) तपासणीसाठी आवश्यक किट्सचा तुटवडा निर्माण झाला. गत महिनाभरापासून टू-नॅट मशीनच्या किट्स उपलब्ध नसल्याने तपासणीचा वेग मंदावला असून, अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध असतानाही रुग्णांना प्रतीक्षा करावी लागत आहे.(फोटो सौजन्य – istock)

Yavatmal News: दर्जेदार बियाण्यांसाठी राष्ट्रीय संस्थांशी करार! आता हवामानानुकूल व अधिक उत्पादनक्षम वाण उपलब्ध होणार

बीपीएचयू केंद्रांमध्ये टू-नेंट मशीन उपलब्ध करून देण्यामागे क्षयरोगाचे लवकर आणि अचूक निदान करून तत्काळ उपचार करण्याचा उद्देश आहे. मात्र, या मशीनसाठी आवश्यक किट्सचा पुरवठाच ठप्प झाल्याने अत्याधुनिक यंत्रणेचा अपेक्षित वापर होत नसल्याचे चित्र आहे. गेल्या महिनाभरापासून किट्स उपलब्ध नसल्याने तपासणीचे काम संथ गतीने सुरू असल्याची माहिती आहे. क्षयरोग हा संसर्गजन्य आजार असल्याने त्याचे वेळीच निदान होणे उपचाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. तपासणीला विलंब झाल्यास रुग्णाच्या उपचारावर परिणाम होण्याबरोबरच संसर्गाचा प्रसार रोखण्याच्या प्रयत्नांनाही फटका बसण्याची शक्यता आहे. क्षयरोगाचे निर्मूलन करण्यासाठी शासनाकडून विविध अभियान राबविण्यात येत आहेत. ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना त्यांच्या जवळच तपासणीची सुविधा मिळावी, यासाठी बीपीएचयू केंद्रांची उभारणी करण्यात आली.

मात्र, ज्या केंद्रांवर क्षयरोगाची तपासणी होणे अपेक्षित आहे, तेथे आवश्यक किट्सच उपलब्ध नसतील तर ‘टीबीमुक्त भारत’चे उद्दिष्ट कसे साध्य होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना त्यांच्या जवळच दर्जेदार आरोग्यसेवा आणि आवश्यक तपासण्या उपलब्ध करून देण्यासाठी बीपीएचयू केंद्रांची निर्मिती करण्यात आली. मात्र, किट्सचा अभाव, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर नियंत्रणाचा अभाव कायम राहिल्यास या केंद्रांच्या उभारणीमागील मूळ उद्देशच धोक्यात येण्याची शक्यता आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केवळ कागदी अहवालांवर विसंबून न राहता बीपीएचयू केंद्रांची अचानक पाहणी करावी. टू-नेंट किट्सचा तातडीने पुरवठा करावा आणि लॅब टेक्निशियनच्या उपस्थितीची काटेकोरपणे तपासणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

४३ हजार शेतकरी झाले कर्जमुक्त! ३७४ कोटी ३१ लाख रुपये खात्यात जमा; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना

बीपीएचयू केंद्रांमध्ये टू-नेंट मशीनच्या किट्स सध्या उपलब्ध नाहीत. मात्र, काही दिवसात किट्स उपलब्ध होतील. यासाठी कार्यालयाकडून दर महिन्याला किट्सची मागणी केली जात असल्याची माहिती अमरावतीच्या प्रभारी क्षयरोग अधिकारी डॉ. ज्योती खडसे यांनी दिली.जिल्ह्यातील काही बीपीएचयू केंद्रांमधील लॅब टेक्निशियनच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित कर्मचाऱ्यांवर प्रभावी नियंत्रण नसल्याने आहे. काही ठिकाणी दररोज नियमित ड्युटी करण्याऐवजी आड दिवस ड्युटी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Tb free india slogan remains only on paper shortage of kits at bphu centers testing stalled despite availability of truenat machines

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • Amaravati
  • Health Updates
  • TB

संबंधित बातम्या

Health Update: तपासण्या वाढूनही स्तन कर्करोगाचा धोका कमी होईना! कामा रुग्णालयात तीन वर्षांत रुग्णसंख्येत ६८ टक्के वाढ
1

Health Update: तपासण्या वाढूनही स्तन कर्करोगाचा धोका कमी होईना! कामा रुग्णालयात तीन वर्षांत रुग्णसंख्येत ६८ टक्के वाढ

अमरावती घटनेने आरोग्य यंत्रणा अलर्ट! रुग्णालयातील उपारणांची तपासणी; अग्नीशमन यंत्र हाताळण्याचे प्रशिक्षण
2

अमरावती घटनेने आरोग्य यंत्रणा अलर्ट! रुग्णालयातील उपारणांची तपासणी; अग्नीशमन यंत्र हाताळण्याचे प्रशिक्षण

Health Update: टीबी निदानासाठी ‘नॅट’ चाचणी वापर वाढवण्याची गरज! ग्रामीण भागात जुन्या तंत्रज्ञानाचा वापर
3

Health Update: टीबी निदानासाठी ‘नॅट’ चाचणी वापर वाढवण्याची गरज! ग्रामीण भागात जुन्या तंत्रज्ञानाचा वापर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.