
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Inflation Impact: महागाईचा सामान्यांना दणका! Tata चा मोठा निर्णय; चहा …
गेल्या अनेक वर्षांपासून चहाच्या दरात फारशी वाढ करण्यात आलेली नव्हती. मात्र, या काळात चहा बनवण्यासाठी लागणारे दूध, साखर, चहापत्ती आणि गॅस यांच्या किमतीत सातत्याने वाढ झाली. त्यासोबतच कामगारांचे वेतन, वीजबिल, पाणी, हॉटेलचे भाडे आणि इतर व्यावसायिक खर्चही वाढले आहेत.
वाढत्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत चहाचा विक्रीदर मात्र जुना असल्याने हॉटेल व्यावसायिकांसमोर आर्थिक ताळमेळ साधण्याचे आव्हान निर्माण झाले होते. त्यामुळे अखेर चहा-कॉफीच्या दरात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
आनंदाची बातमी! नांदेड जिल्ह्यातील 13 हजार शेतकरी कर्जमुक्त; तब्बल 106 कोटी…
माढा तालुका हॉटेल असोसिएशनच्या नव्या दरानुसार, साधा चहा १५ रुपये, ब्लॅक चहा १५ रुपये आणि कॉफी २५ रुपये असा दर निश्चित करण्यात आला आहे. स्पेशल चहाचे दर मात्र हॉटेलच्या दर्जानुसार वेगवेगळे राहणार आहेत.
ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडू नये म्हणून अनेक वर्षे दरवाढ टाळण्यात आली होती. मात्र, वाढत्या खर्चामुळे आता दरवाढ करणे आवश्यक झाल्याचे हॉटेल व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
हॉटेल असोसिएशनने १० रुपयांत दर्जेदार दुधाचा चहा देणे शक्य आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे. असोसिएशनच्या माहितीनुसार, एका कप दर्जेदार अस्सल दुधाचा चहा तयार करण्यासाठी सरासरी ११ रुपयांपर्यंत खर्च येतो. यामध्ये हॉटेलचे भाडे, वीज, पाणी, कामगारांचे वेतन आणि इतर व्यावसायिक खर्चाचा समावेश नाही.
त्यामुळे केवळ स्वस्त दरात चहा मिळतो म्हणून तो दर्जेदार असेलच असे नाही, असे असोसिएशनचे म्हणणे आहे. काही ठिकाणी दुधाचे प्रमाण कमी करून किंवा दुधात पाणी मिसळून कमी दरात चहा विकला जात असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. मात्र, हा दावा सर्वच हॉटेल व्यावसायिकांना लागू नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
चहा किती रुपयांचा आहे यापेक्षा तो कोणत्या दर्जाचा आहे, याकडे ग्राहकांनी लक्ष द्यावे, असे आवाहन हॉटेल असोसिएशनने केले आहे. चहापत्तीचा वास किंवा रंग चांगला आहे म्हणून ती दर्जेदार असेलच असे नाही. काही उत्पादनांमध्ये सुगंधासाठी फ्लेवरिंगचा वापर केला जाऊ शकतो.
त्यामुळे ग्राहकांनी विश्वासार्ह स्रोताकडून मिळणारी दर्जेदार चहापत्ती, चांगल्या गुणवत्तेचे दूध आणि स्वच्छ वातावरणात तयार केलेल्या चहाला प्राधान्य द्यावे, असे असोसिएशनने म्हटले आहे.
चहाचा कप स्वस्त असण्यापेक्षा तो स्वच्छ, दर्जेदार आणि आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे एक-दोन रुपये अधिक मोजावे लागले तरी दर्जेदार चहाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरवाढीमुळे माढा तालुक्यातील चहाप्रेमींच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार असला, तरी वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय आवश्यक असल्याचे हॉटेल व्यावसायिकांचे म्हणणे आहे. आता या दरवाढीला ग्राहकांकडून कसा प्रतिसाद मिळतो, याकडे हॉटेल व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे.