Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur District Bank Election : सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीचं रणशिंग फुंकलं! मोहिते पाटलांच्या उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ

Solapur District Bank Election : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी करमाळ्यातून प्रचाराचं रणशिंग फुंकण्यात आलं आहे. श्री कमलाभवानी देवीचं दर्शन घेऊन स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलच्या प्रचाराला सुरुवात झाली. यावेळी मोहिते पाटलांनी पॅनलच्या उमेदवारांना ‘शिट्टी’ चिन्हावर मतदान करण्याचं आवाहन केलं.

  • By विवेक
Updated On: Nov 20, 2026 | 10:20 PM
Solapur Dcc bank election prachar

Solapur Dcc bank election prachar

Follow Us
Follow Us:
  • कमलाभवानी देवीच्या दर्शनाने प्रचाराचा शुभारंभ
  • रणजीतसिंह आणि धैर्यशील मोहिते पाटील यांची उपस्थिती
  • प्रचार शुभारंभाला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती
 

करमाळा (प्रतिनिधी) : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचं वातावरण आता तापू लागलं आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलने प्रचाराचा श्रीगणेशा केला आहे. करमाळा येथील श्री कमलाभवानी देवीच्या मंदिरात दर्शन घेऊन या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करण्यापूर्वी मोहिते पाटील यांच्यासह पॅनलच्या उमेदवारांनी श्री कमलाभवानी मातेचं दर्शन घेतलं. यावेळी उमेदवार डॉ. अनिकेत देशमुख, संग्रामसिंह जहागीरदार, शिवाजी पाटील, सिंधू सुरेश पाटील, अस्मिता गायकवाड आणि ॲड. दत्तात्रय खडतरे यांनी देवीच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले.

सहकार क्षेत्राच्या माध्यमातून शेतकरी, बँकेचे सभासद आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी काम करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. (Solapur District Bank Election)

Mumbai Bank Election : शिंदे गटाचा निर्णय ठरला! स्वबळावर लढणार की महायुतीसोबत? पुरंदर बंगल्यावर राजकीय खलबतं!

मोहिते पाटलांचं मतदारांना आवाहन

प्रचाराच्या शुभारंभानंतर रणजीतसिंह मोहिते पाटील आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मतदारांना पॅनलच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन केलं.

स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांना ‘शिट्टी’ या निवडणूक चिन्हावर मतदान करून विजयी करावं, असं आवाहन त्यांनी केलं. त्यामुळे सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोहिते पाटील गटाने प्रचाराला सुरुवात करत आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रचार शुभारंभाला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची गर्दी

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य सवितादेवी राजेभोसले, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, शहाजीराव देशमुख, डॉ. वसंतराव पुंडे, उदयसिंह मोरे पाटील, महेंद्र पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

तसंच विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि करमाळा तालुक्यातील मतदारांनीही मोठ्या संख्येने हजेरी लावली.
दरम्यान, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलला मतदारांचा किती प्रतिसाद मिळतो, याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. प्रचाराच्या पहिल्याच टप्प्यात मोहिते पाटलांनी घेतलेल्या पुढाकारामुळे निवडणुकीतील चुरस वाढण्याची शक्यता आहे.

Satara DCC Bank Election : ‘वरिष्ठांच्या सूचना देऊनही वेगळा निर्णय घेतला’; शिवेंद्रराजेंचा राष्ट्रवादी-शिवसेनेबाबत मोठा खुलासा!

💡

Frequently Asked Questions

  • Que: स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ कुठे झाला?

    Ans: करमाळा येथील श्री कमलाभवानी देवीच्या मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.

  • Que: प्रचार शुभारंभाला कोण उपस्थित होते?

    Ans: माजी आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि पॅनलचे उमेदवार यांच्यासह अनेक राजकीय पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

  • Que: स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलचं निवडणूक चिन्ह कोणतं आहे?

    Ans: स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलचं निवडणूक चिन्ह ‘शिट्टी’ आहे. याच चिन्हावर मतदान करून उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Web Title: Solapur district bank election swabhimani shetkari sahakar panel campaign vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 10:20 PM

Topics:  

  • Solapur News
  • Solapur Politics

संबंधित बातम्या

Sairat well dried up : संपूर्ण महाराष्ट्राला प्रेमाचं याड लावणारी विहीर आटली; ‘सैराट’मधील प्रसिद्ध विहिरीने गाठला तळ
1

Sairat well dried up : संपूर्ण महाराष्ट्राला प्रेमाचं याड लावणारी विहीर आटली; ‘सैराट’मधील प्रसिद्ध विहिरीने गाठला तळ

Solapur News: ऊसदरावरून शेतकरी संघटना आणि साखर कारखानदारांमध्ये मतभेद कायम; जयकुमार गोरेंच्या बैठकीतही तोडगा निघेना
2

Solapur News: ऊसदरावरून शेतकरी संघटना आणि साखर कारखानदारांमध्ये मतभेद कायम; जयकुमार गोरेंच्या बैठकीतही तोडगा निघेना

MSEDCL Launches Abhay Yojana: बारामती परिमंडलातील २.८१ लाख ग्राहकांसाठी महावितरणची ‘अभय योजना २०२६-२७’ लागू
3

MSEDCL Launches Abhay Yojana: बारामती परिमंडलातील २.८१ लाख ग्राहकांसाठी महावितरणची ‘अभय योजना २०२६-२७’ लागू

ऊस दरवाढीवर तोडगा नाहीच ! सोलापुरात कडाक्याच्या थंडीतही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुक्काम, रस्त्यावरच मांडल्या चुली
4

ऊस दरवाढीवर तोडगा नाहीच ! सोलापुरात कडाक्याच्या थंडीतही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुक्काम, रस्त्यावरच मांडल्या चुली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.