मुंबई : मध्य रेल्वेची (Central Railway) जलद मार्गवरील वाहतूक विस्कळीत (Traffic Disrupted) झाली आहे. यामुळे आठवड्याच्या सुरुवातीलाच प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. करीरोड स्थानकाजवळ (Curry Road) तांत्रिक बिघाड (Technical Failure) झाल्यामुळे ही वाहतूक विस्कळीत झाली आहे. करीरोड स्थानकाजवळ एक एक्स्प्रेस थांबली असून त्यामागे लोकलदेखील रखडली आहे.
आठवड्याचा आज पहिलाच दिवस (First Day Of Week) आहे. यामुळे कामावर जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी दिसत आहे. त्यातच जलद मार्गावरील रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून याचा थेट फटका प्रवाशांना बसला आहे. रेल्वेच्या या कारभारामुळे कामावर जाणाऱ्यांना नाहक त्रास होत आहे. तांत्रिक बिघाडामुळे तासाभरापासून जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून, जलद मार्गावरील अनेक रेल्वे खरडल्या आहेत.