Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amravati News: विमानतळाच्या नाईट लॅण्डिंगला तांत्रिक अडथळे! नागरिकांचा हिरमोड; डीव्हीओआर यंत्रणा सज्ज तरीही प्रतीक्षा कायम

नाईट लॅण्डिंगसाठी डीजीसीएकडून विमानतळाची आणि विमान कंपनीची स्वतंत्र सुरक्षा पडताळणी केली जाते. विमानतळावरील धावपट्टी, प्रकाशयोजना, हवाई मार्ग, नेव्हिगेशन सुविधा आणि सुरक्षितता मानकांची पूर्तता झाल्यानंतरच रात्रीच्या उड्डाणास परवानगी दिली जाते.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 26, 2026 | 01:23 PM
विमानतळाच्या नाईट लॅण्डिंगला तांत्रिक अडथळे! नागरिकांचा हिरमोड; डीव्हीओआर यंत्रणा सज्ज तरीही प्रतीक्षा कायम

विमानतळाच्या नाईट लॅण्डिंगला तांत्रिक अडथळे! नागरिकांचा हिरमोड; डीव्हीओआर यंत्रणा सज्ज तरीही प्रतीक्षा कायम

Follow Us
Follow Us:

बेलोरा विमानतळावरून रात्रीच्या विमानसेवेची प्रतीक्षा आणखी लांबण्याची चिन्हे आहेत. नाईट लॅण्डिंग आणि टेकऑफसाठी आवश्यक असलेली डॉपलर व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी ओमनी डायरेक्शनल रेंज (डीव्हीओआर) यंत्रणा यशस्वीपणे कार्यान्वित झाली असली, तरी रात्री विमान कोणत्या हवाई मार्गाने बेलोरा विमानतळावर आणायचे, यावर एअर इंडिया आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) यांच्यात अद्याप एकमत झालेले नाही. त्यामुळे बेलोरावरील नाईट ऑपरेशनला हिरवा कंदील मिळण्यास विलंब होत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एअर इंडियाने डीजीसीएकडे रात्रीच्या विमानसेवेबाबत येणाऱ्या तांत्रिक अडचणींची सविस्तर माहिती दिली.(फोटो सौजन्य – AI)

‘रूफटॉप सोलर’ने उजळणार गरिबांचे घर! २५०० रुपयात वीजबिलातून सुटका; अतिरिक्त वीज विकून उत्पन्नाचीही संधी

बेलोरासाठी कोणता हवाई मार्ग सुरक्षित आणि व्यवहार्य ठरेल, तसेच कंपनीकडे त्या मार्गासाठी योग्य विमान उपलब्ध आहे का, याबाबतही डीजीसीएकडे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. यावर डीजीसीएने एअर इंडियाला अधिक सुलभ पर्यायांचा विचार करण्याच्या सूचना केल्या. त्याच प्रक्रियेमुळे अंतिम निर्णय रखडल्याचे समजते. सध्या एअर इंडियासमोर मोठे नियोजनात्मक आव्हान उभे आहे. बेलोरासाठी रात्रीची सेवा सुरू करायची झाल्यास अन्य विमानतळावरील ७२ आसनी विमान वळवावे लागेल किंवा स्वतंत्र विमान राखीव ठेवावे लागेल.

याशिवाय रात्रीच्या विमानसेवेला पुरेसा प्रवासी प्रतिसाद मिळेल का, आठवड्यातून दोन-तीन दिवस सेवा चालवणे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरेल का, अथवा दिवसाऐवजी केवळ रात्रीचीच फेरी ठेवावी का, अशा व्यावसायिक बाबींचाही विचार सुरू आहे.धावपट्टीवर रात्री सुरक्षित लॅण्डिंगसाठी अत्याधुनिक प्रकाशयंत्रणा धावपट्टीवर रात्री सुरक्षित लॅण्डिंगसाठी अत्याधुनिक प्रकाशयंत्रणा बसविण्यात आली. विमानातील नेव्हिगेशन प्रणालीला स्पष्टपणे दिसतील अशा लाईट्सची व्यवस्था करण्यात आली आहे. डीव्हीओआर प्रणालीही विमानाला अचूक दिशा देऊन सुरक्षित लॅण्डिंगसाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्यामुळे तांत्रिक बाबींवर अंतिम तोडगा निघाल्यानंतर बेलोरा विमानतळावर नाईट लॅण्डिंगचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.

Amravati News: अमृत जलपुरवठा योजनेचे ४४ टक्के काम पूर्ण! ९८५.२६ कोटींच्या प्रकल्पाला पावसामुळे ब्रेक; दिवाळीनंतर येणार वेग

नाईट लॅण्डिंगसाठी डीजीसीएकडून विमानतळाची आणि विमान कंपनीची स्वतंत्र सुरक्षा पडताळणी केली जाते. विमानतळावरील धावपट्टी, प्रकाशयोजना, हवाई मार्ग, नेव्हिगेशन सुविधा आणि सुरक्षितता मानकांची पूर्तता झाल्यानंतरच रात्रीच्या उड्डाणास परवानगी दिली जाते. सध्या बेलोरा विमानतळावर एअर इंडियाची दिवसाची विमानसेवा सुरू असली, तरी रात्रीच्या उड्डाणासाठी आवश्यक परवाना अद्याप मिळालेला नाही.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Technical hurdles for airport night landings citizens disappointed wait continues despite dvor system being ready

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 01:23 PM

Topics:  

  • airport
  • Amaravati
  • maharashtra

संबंधित बातम्या

साखर आयुक्तालयाचा सहकारी साखर कारखान्यांना दणका; केवळ ऊस पुरवठ्यावर सभासदत्व देता येणार नाही
1

साखर आयुक्तालयाचा सहकारी साखर कारखान्यांना दणका; केवळ ऊस पुरवठ्यावर सभासदत्व देता येणार नाही

गणेशम फेज २ सोसायटीत आग, दोन चिमुरड्यांची सुखरूप सुटका; मोठा अनर्थ टळला
2

गणेशम फेज २ सोसायटीत आग, दोन चिमुरड्यांची सुखरूप सुटका; मोठा अनर्थ टळला

Water Storage Crisis: पाणीटंचाईचे संकट गडद! धरणे-तलाव कोरडे; २२६ पैकी केवळ ५ प्रकल्पांत ५० टक्क्यांहून अधिक साठा
3

Water Storage Crisis: पाणीटंचाईचे संकट गडद! धरणे-तलाव कोरडे; २२६ पैकी केवळ ५ प्रकल्पांत ५० टक्क्यांहून अधिक साठा

विसर्जनप्रसंगी विद्यार्थ्यांवर काळाने घातला घाला; दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू
4

विसर्जनप्रसंगी विद्यार्थ्यांवर काळाने घातला घाला; दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.