हृदयविकाराच्या झटक्याने 10 वर्षांच्या मुलाचा मृत्यू
कोल्हापूरच्या कोडोलीमधील घटना
आईच्या कुशीतच सोडले प्राण
कोल्हापूर: सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. सर्वत्र आनंदाचे, उत्साहाचे वातावरण आहे. मात्र याच दरम्यान कोल्हापूरमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कोडोली गावात एका 10 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. गणेश मंडळाच्या मंडपात खेळून खेळून दमलेल्या मुलाचा मृत्यू झाला आहे. हे प्रकरण नक्की काय आहे ते जाणून घेऊयात.
नेमके प्रकरण काय?
कोल्हापूर जिल्ह्यातील कोडोली जिल्ह्यात एका दहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. गणेश मंडळाच्या मंडपात खेळून खेळून दमलेला एक 10 वर्षांचा मुलगा आईकडे गेला. मात्र आईच्या कुशीत झोपटच त्याने आपले प्राण सोडले आहेत. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला आहे. खेळता खेळत अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने तो मुलगा घरी गेला. त्यानंतर तो आईच्या कुशीत जाऊन झोपला. मात्र आईच्या कुशीतच त्याने प्राण सोडले आहेत. आईला काही कळण्याच्या आतच मुलाने आपले प्राण सोडले आहे.
सर्वत्र गणेशोत्सवाच्या आनंदाचे वातावरण सुरू असतानाच कोल्हापूर जिल्ह्यातील वारणानगर कोडोली येथील श्रवण गावडे या दहा वर्षाच्या मुलाचा खेळता खेळता हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुर्दैवी अंत झाला आहे. आईच्या मांडीवरच झोपला असताना त्याची प्राणज्योत मालवली. त्याच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे संपूर्ण गावात शोक काळा पसरले आहे.
कोल्हापुरात खळबळ! रिक्षा चालकाचा गळा चिरलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
रिक्षा चालकाचा गळा चिरलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
कोल्हापुरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कोेल्हापूर शहरातील उपनगरातील हनुमाननगर, पाचगाव रोड परिसरात रिक्षाचालक मोहन पोवार याचा गळा चिरलेला आणि अर्धवट जळलेला मृतदेह आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. रिक्षाचालक पोवार याच्या मृत्यूमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा तातडीने घटनास्थळी दाखल झाला. पंचनामा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. गु