Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashok Kharat Case : अशोक खरातविरुद्ध दहावा गुन्हा दाखल; बनावट सापाची भीती दाखवून 5 कोटींची फसवणूक

पुण्यातील बिल्डर राजेंद्र जासूद यांनी ही तक्रार दिली आहे. यापूर्वी वावी पोलिस ठाण्यात अशोक खरात यानेच राजेंद्र जासूद आणि दिनेश परब यांच्याविरोधात 5 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा खोटा गुन्हा दाखल केला होता.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 27, 2026 | 03:22 PM
Ashok Kharat Case : खरातने अनेक महिलांवर केले अत्याचार; हेल्पलाईनवर खरातविरोधात तक्रारीच तक्रारी

Ashok Kharat Case : खरातने अनेक महिलांवर केले अत्याचार; हेल्पलाईनवर खरातविरोधात तक्रारीच तक्रारी

Follow Us
Follow Us:

मुंबई : नाशिकमधील कथित स्वयंघोषित बाबा अशोक खरात याच्याविरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात दहावा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी 8 गुन्हे थेट खरातविरुद्ध असून, 2 संबंधित आहेत. मृत्यूची भीती दाखवून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी आता त्याच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे.

पुण्यातील बिल्डर राजेंद्र जासूद यांनी ही तक्रार दिली आहे. यापूर्वी वावी पोलिस ठाण्यात अशोक खरात यानेच राजेंद्र जासूद आणि दिनेश परब यांच्याविरोधात 5 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा खोटा गुन्हा दाखल केला होता. आता त्याच प्रकरणात खरातविरुद्धच खंडणीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तक्रारीनुसार, लॉजिस्टिक व्यवसाय सुरू करून देण्याच्या नावाखाली ‘अवतार पूजा’ साठी जासूद यांच्याकडून मर्सिडीज कार घेतली. २०१८ मध्ये ही कार खरातला देण्यात आली. त्यानंतर ‘परिस’ शक्ती मिळवण्यासाठी २१ देशांचा प्रवास करणे आवश्यक असून, अन्यथा नागदेवतेच्या दंशाने मृत्यू होईल, असे सांगून त्यांना घाबरवण्यात आले.

गुरुसेवा आणि मृत्यूची भीती दाखवत अमेरिकेतील उपचार खर्चासाठी भाग पाडण्यात आले, ज्यासाठी जासूद यांनी २९.८१ लाख रुपये खर्च केले. २०१८ ते डिसेंबर २०२५ दरम्यान विविध मार्गांनी ४ ते ५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. १ ऑक्टोबर २०१८ रोजी रात्री ८ वाजता पूजेच्या बहाण्याने इशानेश्वर मंदिरामागे अंधारात नेऊन ‘नागदर्शन’ घडवण्याचे सांगत बनावट साप दाखवून घाबरवण्यात आले.

प्राचीन शिवमंदिर पाडण्याचा कट

स्वयंघोषित बाबा अशोक खरात याचा वावी येथील प्राचीन शिवमंदिराबाबत आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वावी गावात १२ व्या शतकातील यादवकालीन प्राचीन शिवमंदिर आहे. या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी ग्रामस्थांनी खरातला आमंत्रित केले होते; मात्र मंदिर दुरुस्त करण्याऐवजी त्याने ते पूर्णपणे पाडण्याचा सल्ला दिला. त्याने ग्रामस्थांना सांगितले की हे मंदिर येथे ठेवू नका, ते पाडून टाका आणि त्यातील देवताही हटवा.

शिवलिंगाकडे पाय करून राहिला उभा

इतकेच नव्हे, तर खरात शिवलिंगाकडे पाय करून उभा राहिला आणि त्यात आता कोणतीही ऊर्जा शिल्लक नसल्याचा दावा केला. तसेच मंदिरात ५० टक्के नकारात्मक ऊर्जा असल्याचे सांगून लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या. लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी खरात बनावट मोबाईल अॅपचा वापर करत होता. हे अॅप कोणत्याही वस्तूचे वय किंवा त्यातील’ ऊर्जा’ मोजण्याचा दावा करत होते. तो अलेक्सासारख्या कमांड देऊन हे अॅप चालवत असे आणि लोकांची दिशाभूल करत असे.

Ashok Kharat : “महिलांसोबत जे केलं तो विधीचाच भाग, जबरदस्ती नाही: पोलीस कोठडीत भोंदूबाबा खरातने उधळली मुक्ताफळं

Web Title: Tenth case registered against ashok kharat fraud of 5 crore perpetrated by threatening with a fake snake

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 03:22 PM

Topics:  

  • Ashok Kharat Case
  • crime news
  • Nashik Crime

संबंधित बातम्या

Pune News : पिंपळवंडीत भरदिवसा घरफोडी; शिक्षिकेच्या घराचे कुलूप तोडून सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास
1

Pune News : पिंपळवंडीत भरदिवसा घरफोडी; शिक्षिकेच्या घराचे कुलूप तोडून सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!
2

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
3

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक
4

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.