फोटो सौजन्य -iStock
वर्धा जिल्ह्यातील देवळी शहरात असणाऱ्या सोनेगाव रस्त्यावर भरदिवसा एका ४५ वर्षीय व्यक्तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. या धक्कादायक घटनेचा एक व्हिडीओ देखील सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. या घटनेमुळे वर्धा शहरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी कोणीही आरोपीला अडवण्याचा प्रयत्न केला नाही या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळावरच हत्या करणाऱ्या आरोपीला अटक केली. भरदिवसा झालेल्या या हत्यामुळे वर्धा शहरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे.
मृत व्यक्ति देवळी शहरात त्याच्या कामानिमित्त आला होता. तो काम आटपून पुन्हा गावी जाण्यासाठी सोनेगाव रस्त्यावर रिक्षाची वाट बघत होता. यावेळी एक तरूण त्याच्याकडे आला आणि त्या तरूणाने पैशाची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्याने तरूणाने या व्यक्तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. या वाद वाढत जात तरूणाने त्या व्यक्तिची दगडाने ठेचून हत्या केली. या घटनेवेळी नागरिकांनी घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मात्र कोणीही त्या तरूणाला अडवले नाही. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा एक व्हिडीओ देखील सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून आरोपीला अटक केली. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
सोलापूरमध्ये देखील एक धक्कादायक घटना घडली आहे. सोलापूर तालुक्यातील तेलगाव येथे पतीने पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अनैतिक संबंधाच्या संशयातून या दोघांमध्ये वाद झाला होता. हाच वाद मनात ठेऊन पतीने पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केली. या घटनेमुळे सोलापुरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.