Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवी मुंबई पालिकेच्या प्रभाग रचनेवर ठाकरे गटाचा आक्षेप, थेट कोर्टात दाद मागण्याचा दिला इशारा

भाजपा व शिंदे गटाच्या प्रभावाखाली ही प्रभाग रचना केली गेल्याचा स्पष्ट आरोप ठाकरे गटाचे उपशहरप्रमुख समीर भगवान यांनी केला. याबाबत ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाला इत्यंभूत माहिती देणारे पत्र देण्यात येणार असल्याचे सांगितले.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Aug 25, 2025 | 08:17 AM
नवी मुंबई पालिकेच्या प्रभाग रचनेवर ठाकरे गटाचा आक्षेप, थेट कोर्टात दाद मागण्याचा दिला इशारा
Follow Us
Close
Follow Us:

Navi Mumbai – सिद्धेश प्रधान : नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महापालिकेतर्फे प्रारुप प्रभागरचना शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आली आहे. पालिकेने जाहीर केलेल्या प्रारुप प्रभागरचनेत २८ प्रभाग असून १११ नगरसेवक असणार आहेत.  न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरु केली आहे. पालिकेने जाहीर केलेल्या प्रारुप प्रभाग रचनेवर हरकती व सूचना घेण्याची मुदत ४ सप्टेंबरपर्यत देण्यात आली आहे. मात्र या प्रभाग रचना जाहीर झाल्यावर ठाकरे गटाने मात्र यावर आक्षेप घेतला. भाजपा व शिंदे गटाच्या प्रभावाखाली ही प्रभाग रचना केली गेल्याचा स्पष्ट आरोप ठाकरे गटाचे उपशहरप्रमुख समीर भगवान यांनी केला. याबाबत ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाला इत्यंभूत माहिती देणारे पत्र देण्यात येणार असल्याचे समीर बागवान यांनी सांगितले.

नवी मुंबई महापालिकेच्या निवडणूक विभागाने प्रारुप प्रभागरचना जाहीर केली असून या प्रभागरचनेत २७ प्रभाग हे ४ नगरसेवकांचे असून उर्वरीत १ प्रभाग हा ३ नगरसेवकांचा असणार आहे.पुढील काही दिवसात संबंधीत प्रभागरचनेची माहिती घेऊन हरकती सूचना येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पालिकेने जाहीर केलेल्या प्रारुप प्रभागरचनेत नवी मुंबई महापालिकेत १४ गावांच्या सहभागासह प्रारुप प्रभागरचना जाहीर करण्यात आली आहेे. मात्र असे असले तरी प्रभागात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात असताना १४ गावांची लोकसंख्या वाढून देखील पूर्वीइतकेच १११ वॉर्डच पालिकेने तयार केले असल्याने भुवया उंचावल्या आहेत.  हरकती सूचना घेण्याची मुदत ४ सप्टेंबरपर्यंत देण्यात आली आहे.

Iran Weapons Factories : ‘आम्ही अनेक देशांमध्ये उभारल्या आहेत वेपन फॅक्टरी’ वेळ आल्यावरच उघड करू; इराणचा वादग्रस्त दावा

अखेर १४ गावांचा समावेश झाला

१४ गावांचा समावेश नवी मुंबईत करू नये, यासाठी वनमंत्री गणेश नाईक यांनी या ठाम विरोध केला होता. शासनाने ६ हजार कोटी विकासासाठी द्यावेत, अतिक्रमण हटवावे, नियोजन प्राधिकरण नेमावे आणि मगच या गावांचा समावेश नवी मुंबई पालिकेत करावा अशी भूमिका नाईक यांनी घेतली होती. यावेळी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आरोप देखील केले होते. मात्र अखेर शिंदेंच्या आग्रही भूमिकेपुढे नाईकांना झुकावे लागल्याचे बोलले जात आहे

 तर दुसरीकडे या १४ गावांमध्ये शिंदे गटाचे प्राबल्य असल्याने नाईक विरोध करत असल्याची चर्चा देखील रंगली होती. मात्र यात १४ गावांमधील ग्रामस्थ भरडले जात होते. अखेर या ग्रामस्थांना नवी मुंबई पालिकेच्या निवडणुकांमध्ये मतदानाचा अधिकार प्राप्त झाला आहे. प्रारुप प्रभागरचनेत प्रभाग क्रमांक १४ मध्ये या १४ गावांचा समावेश आहे. जुन्या एमआयडीसी पावणे गाव, श्रमिकनगर अडवली भुतवली ,कातकरीपाडा तुर्भे स्टोअरमधील काही भाग तसेच गणपतीपाडा व वारलीपाडा या भागांचा सहभाग आहे.

Aaditya Thackeray on Eknath Shinde: “शिंदेंनी महाराष्ट्राला लुटले!”- रस्त्यांवरील खड्ड्यांवरून आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

उपशहरप्रमुख समीर बागवान म्हणाले की, निवडणुका आयोगाच्या अटी प्रभाग रचना तयार करताना पायदळी तुडवल्या गेल्या आहेत. नवी मुंबई पालिका क्षेत्रात ८ विभाग कार्यालये आहेत. प्रशासकीय दृष्ट्या नागरिक एका विभागाशी जोडले गेले आहेत. त्या विभागातील नागरिक त्या कार्यालयात जाऊन आपल्या स्थानिक नागरी समस्या मांडत असतात. त्याच विभाग कार्यालयाकडे हद्दीप्रमाणे त्या समस्या सोडविण्याची जबाबदारी असते. मात्र प्रभाग रचनेत एका विभाग कार्यालयातील वॉर्ड दुसऱ्या विभाग कार्यालयात घुसविण्यात आले आहेत. उदा. सिवुडमधील नागरीक बेलापुर विभाग कार्यालयात जातात. तर प्रभाग रचनेत सिवुड भाग नेरूळ मध्ये जोडण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम आहे. भविष्यात दोन्ही ठिकाणी दोन पाय ठेवलेले असताना प्रभाग समितीचा कारभार कसा हाकला जाणार ? तसेच तुर्भे स्टोअर भागात तर बाजूबाजूला असलेले भाग आहेत. मात्र त्यातील एक भाग नेरुळशी तर दूसरा भाग डोंगर पार करून १४ गावांशी जोडला गेला आहे. अशा अनेक तक्रारी येत आहेत. प्रतिनियूक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांना पालिकेची भौगोलिक स्थिती माहीत नसल्याने पालिका अधिकाऱ्यांनी देखील त्याचा फायदा घेत राजकीय पक्षांना मदत केल्याचा आमचा स्पष्ट आरोप आहे. या बाबत आम्ही लढा देणार आहोत. 

 

Web Title: Thackeray group objects to navi mumbai municipality ward structure warns of direct appeal to court

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2025 | 08:15 AM

Topics:  

  • maharashtra
  • Maharashtra Politics
  • Navi Mumbai
  • thane

संबंधित बातम्या

Bhiwandi : वेतन आयोगाच्या फरकासाठी संघर्ष कृती समिती आक्रमक; काम बंद आंदोलनाचा इशारा
1

Bhiwandi : वेतन आयोगाच्या फरकासाठी संघर्ष कृती समिती आक्रमक; काम बंद आंदोलनाचा इशारा

Navi Mumbai : प्रभाग रचनेत सत्ताधाऱ्यांचा हस्तक्षेप? ठाकरे गटाचा गंभीर आरोप
2

Navi Mumbai : प्रभाग रचनेत सत्ताधाऱ्यांचा हस्तक्षेप? ठाकरे गटाचा गंभीर आरोप

अंग पुसायचा टॉवेल तरी…; हॉस्पिटलच्या उद्घाटनावेळी अजित पवारांच्या वक्तव्याने हशा पिकला
3

अंग पुसायचा टॉवेल तरी…; हॉस्पिटलच्या उद्घाटनावेळी अजित पवारांच्या वक्तव्याने हशा पिकला

Thane : रिपाइं एकतावादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नानासाहेब इंदिसे यांची निवड
4

Thane : रिपाइं एकतावादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नानासाहेब इंदिसे यांची निवड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.