Pune Election 2026 NCP : ठरलं तर! पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार; रोहित पवारांनी स्पष्टचं सांगितलं
Pune Election 2026 NCP राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या युतीच्या चर्चा फिस्कटल्या होत्या. जागावाटपावरून दोन्ही राष्ट्रवादीत मोठे मतभेदही झाले होते. पण अखेर पिंपरी-चिंचवड आणि पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याबाबत एकमत झाले असल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात आज दुपारी दोन्ही राष्ट्रवादीकडून पुण्यात पत्रकार परिषद होऊ शकते. या पत्रकार परिषदेत दोन्ही राष्ट्रवादींच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे. अशातच पुणे महानगरपालिकेत अजित पवार गट 125 तर शरद पवार गट 40 जागांवर लढेल, अशी चर्चाही राजकीय वर्तुळातून समोर आली आहे.
Ladki Bahin Yojana: दोन महिन्यांचा हप्ता अद्याप बाकी अन् त्यातच 47 हजार…; सरकार अॅक्शन मोडमध्ये
दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीचा निर्णय झाल्यानंतर झालेल्या सभेत बोलताना अजित पवार म्हणाले की, ‘पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ आणि तुतारी एकत्र लढणार आहेत. कुटुंब पुन्हा एकत्र येत आहे. दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं, असी कार्यकर्ते आणि नागरिकाची इच्छा होती. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी कठोर आणि व्यवहारिका निर्णय घेण्याची गरज असता. त्यामुळे आम्ही राज्याच्या हितासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे.
अजित पवार यांच्या पाठोपाठ आमदार रोहित पवार यांनीदेखील दोन्ही ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढणार असल्याचे म्हटले आहे. ” पुणे आण पिंपरी चिंचवड महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादीत एकत्र निवडणूक लढवणार आहेत. उद्या एबी फॉर्म वाटप केलं जाईल, त्यानंतर जागावाटपाचे चित्र स्पष्ट होईल. कार्यकर्त्यांशी झालेल्या चर्चेतून आम्ही तुतारी चि्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. तर अजितदादा त्यांच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत.
Maharashtra Politics : नामांकन तोंडावर, युती अंधातरीच; भाजप-काँग्रेसची ‘मौन रणनीती’ मित्रपक्षांसाठी
शरद पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्याकडे पिंपरी-चिंचवडची जबाबदारी आणि पुण्याची जबाबदारी माझ्याकडे दिली आहे. उद्या तुतारी आणि घड्याळ चिन्हावरून एबी फॉर्मवाटप केले जाईल. त्यानंतर कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या हे स्पष्ट होईल. पुणे महापालिकेत ज्यांची सत्ता होती. त्यांनी कामं केली नाहीत. असा आरोपही रोहित पवारांनी केली. प्रशांत जगताप चांगले कार्यकर्ते होते. पण त्यांचे पक्ष सोडण्याचे कारण वेगळे आहे. अशी टिप्प्णीही रोहित पवार यांनी यावेळी केली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येणाऱ्या महापालिका निवडणुकीत अजित पवार गट सुमारे १२५ जागा, तर शरद पवार गट ४० जागा लढवणार असल्याचा प्राथमिक फॉर्म्युला ठरल्याची चर्चा आहे. दोन्ही गटांनी पुण्यातील स्थानिक प्रश्न, विकासकामे आणि नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी एकत्र येत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट एकत्र येणार असल्याची घोषणा आधीच झाल्यानंतर आता पुण्यातही तसाच निर्णय झाल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या घडामोडींचा महायुती आणि महाविकास आघाडीच्या राजकीय समीकरणांवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






