Mhaswad Municipality Elections : नगराध्यक्षपदासाठी आता पाच महिला रिंगणात; अर्ज माघारीनंतरच होणार चित्र स्पष्ट
दरम्यान ठाणे महापालिकेवर ६६ जागांवर महिला नगरसेविका निवडणून जाणार असल्याने ठाणे महापालिकेवर महिला राज येणार असल्याचे आहे. ठाणे महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (ह) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) आणि सर्वसाधारण महिला यांच्यासाठी आरक्षण निश्चित करण्याकरीता मंगळवारी सोडत काढण्यात आली. राम गणेश गडकरी रंगायतन येथे मंगळवारी (12 नोव्हेंबर) सकाळी ११ वाजता आरक्षण सोडतीला सुरवात झाली. या आरक्षण सोडतीत अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. परंतु काही मोजक्या मात्र महत्त्वाच्या दिग्गजांना यात फटका बसल्याचे स्पष्ट दिसत आहे. प्रभाग 1 क्रमांकमध्ये साधना जोशी शिंदे सेनेच्या माजी नगरसेविकेला आरक्षणाचा फटका बसला आहे. याठिकाणी अनुसुचित जमाती पुरुष आरक्षण आले आहे. दुसरीकडे प्रभाग क्रमांक दोन मध्येही भाजाच्या कविता पाटील यांना फटका बसला आहे. नागरीकांचा मागस प्रवर्ग पुरुषांसाठी आरक्षित आहे. त्यामुळे त्यांना याठिकाणी कदाचित आपल्या घरातील कोणालातरी लढवावे लागणार आहे.
प्रभाग क्रमांक ३ मध्ये शिंदे सेनेचे मधुकर पावशे यांना फटका बसला आहे. तर माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनाही फटका बसला असला तरी त्या बाजूच्या वॉर्डातून लढू शकणार आहेत. येऊरला देखील शिंदेसेनेचे नरेंद्र सुरकर यांचा बॉर्ड महिलेला गेला आहे. त्यामुळे याठिकाणी देखील त्यांना पर्याय शोधावा लागणार आहे. प्रभाग क्रमांक ६ मध्ये राष्ट्रवादीचे दिंगबर ठाकूर आता शिंदे सेनेत असून त्यांना फटका बसला असून येथे महिला आरक्षण पडले आहे.
प्रभाग क्रमांक 8 मध्ये शिंदे सेनेचे जुने माजी नगरसेवक देवराम भोईर यांना देखील आरक्षण सोडतीचा फटका बसला आहे. आता त्यांनी पर्याय वॉर्ड शोधावा लागणार आहे. या कुटुंबातील सदस्यांची अदलाबदल करून वॉर्ड मिळावा लागणार आहे. प्रभाग क्रमांक १० अ हून मागील कित्येक वर्ष अजित पवार गटाचे दिग्गज समजले जाणार नजीब मुल्ला यांना देखील फटका बसला आहे.परंतु त्यांना अन्य वॉर्डातून लढण्याची संधी मिळणार आहे. प्रभाग क्रमांक 11 मध्ये दिपा गावंड यांना देखील आरक्षणाचा फटका बसला आहे.
याच प्रभागात कृष्णा पाटील यांच्या पत्नी नंदा पाटील आणि मिलिंद पाटणकर देखीत आहेत, परंतु आता पाटील यांच्या भावाने देखील तिकीट मागितले आहे. त्यामुळे या प्रभागातून आता तिकीट देतांना भाजपाची मोठी दमछाक होणार आहे. प्रभाग क्रमांक 15 अ मध्ये भाजपाच्या सुर्वण कांबळे यांच्यासह ब वार्डातील एकनाथ भोईर यांना देखील मोठा फटका बसला आहे. त्यांनी तर महापौर पदाचे स्वप्न पाहिले होते. परंतु आता त्यांना आजूबाजूचा पर्याय देखील नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ते कोणता पर्याय निवडणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. 16 अ मध्ये मनीषा कांबळे यांना तर 22 अ मध्ये भाजपाचे सुनील हंडोरे यांना फटका बसला आहे. दिव्याचा विचार केल्यास राष्ट्रवादीतून शिंदे सेनेत गेलेल्या प्रभाग 29 अ मधील बाबाजी पाटील यांना देखील आरक्षणाचा फटका बसला आहे.
शरद पवार गटाचे खंद्दे समर्थक मानले जाणारे शाणु पठाण यांना देखील आरक्षणाचा फटका बसला आहे. ३२ क मधून ते मागील वेळेस निवडून आले होते. परंतु आता हा वॉर्ड महिलेसाठी आरक्षित झाल्याने त्यांना आता आपल्या मुलीला संधी द्यावी लागणार असल्याचे दिसत आहे.






