आज मुंबईमध्ये पार पडलेल्या ठाकरे बंधूंच्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मीराभाईंदर शहरासह संपूर्ण महाराष्ट्रात मराठी अस्मितेला नवी संजीवनी मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे. मेळाव्याने मराठी जनतेमध्ये नवचैतन्य निर्माण केले असून, मराठी माणसाला आणि महाराष्ट्राला नव्या संधीचे दार खुले झाल्याची भावना व्यक्त होत आहे.मीराभाईंदर शहरात अलीकडच्या काळात घडलेल्या हिंदी-मराठी वादाच्या पार्श्वभूमीवर, मंच शहराध्यक्ष संदीप राणे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख दीपेश गावंडे यांनी आजच्या ठाकरे मेळाव्याचे भरभरून कौतुक केले. त्यांनी ८ जुलै रोजी होणाऱ्या मराठी भाषेच्या आणि अस्मितेच्या आंदोलनासाठी मराठी जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.विशेष म्हणजे, या आंदोलनाला मीराभाईंदरमधील फेरीवाल्यांकडूनही पाठिंबा मिळत आहे. मराठी फेरीवाल्यांनी ठामपणे सांगितले की, “महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी बोलावीच लागेल.” त्यांनीही आंदोलनात सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.८ जुलैचे हे आंदोलन मीराभाईंदरमध्ये मराठी अस्मिता टिकवण्यासाठी निर्णायक ठरणार असल्याचे जाणकारांचे मत आहे. ठाकरे मेळाव्याच्या उत्साहात या आंदोलनाची तयारी आता जोमाने सुरू झाली असून, मराठी जनतेमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे.