Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Barvi Dam: बारवी धरणातील पाणीसाठा 73.58 टक्क्यांचा टप्पा पार, ठाणे जिल्ह्याची चिंता कमी

जुलैच्या उत्तरार्धात झालेल्या दमदार पावसामुळे बारवी धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढला आहे. अवघ्या सात दिवसांत 19.35 टक्क्यांची वाढ होत धरण 73.58 टक्के भरले असून, ठाणे जिल्ह्यावरील संभाव्य पाणीटंचाईचे संकट आता बऱ्याच अंशी कमी झाले आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 27, 2026 | 09:25 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • जुलैच्या उत्तरार्धातील दमदार पावसामुळे बारवी धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ
  • रविवारी सकाळपर्यंत धरण 73.58 टक्के भरले
  • धरणातील वाढत्या जलसाठ्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा
 

पावसाळ्याच्या सुरुवातीला दडी मारल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र जुलै महिन्याच्या उत्तरार्धात पावसाने पुन्हा एकदा दमदार पुनरागमन केले आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारवी धरण प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार, रविवार सकाळी धरणातील पाणीसाठ्याने ७३ टक्क्यांचा टप्पा ओलांडला आहे. अवघ्या आठवडाभरात पाणीसाठ्यात जवळपास २० टक्क्यांची भरघोस वाढ झाल्याने ठाणे जिल्ह्यावरील पाणीटंचाईचे सावट आता बऱ्याच अंशी दूर झाले आहे. यंदा लांबलेला पाऊस आणि परिणामी धरणाने गाठलेला तळ पाहता बारवी धरण भरण्याचा प्रवास अत्यंत संथ आणि चढ-उतारांचा राहिला. संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यानंतर, जुलैच्या पहिल्या आठवड्यात ८ जुलै रोजी २४७.८० मिमी.

एकीकडे बारवी धरण क्षेत्रात पाऊस सुरू असतानाच, दुसरीकडे उल्हास नदीच्या उगम क्षेत्रातही पावसाची संततधार सुरू आहे. रायगड जिल्ह्यात आणि कर्जत-नेरळ पट्ट्यात सुरू असलेल्या पावसामुळे उल्हास नदीच्या पाणीपातळीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. रविवारी सकाळी ८ वाजता बदलापूरमध्ये उल्हास नदीची पाणीपातळी १४.३८ मीटर इतकी नोंदवली गेली. नदीची इशारा पातळी १६.५० मीटर असल्याने सुरक्षित पातळीवर वाहत असली, तरी पावसाचा जोर कायम राहिल्यास पातळीत आणखी वाढ होईल.

ठाणे जिल्ह्यातील धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा; बारवी धरण ५९ टक्क्यांवर …

सात दिवसांत धरणाच्या पाणीसाठ्यात झाली आणखी वाढ

धरणाने थेट ४४ टक्क्यांवर झेप घेतली होती. मात्र, त्यानंतर पावसाने मोठी विश्रांती घेतली. १० ते १५ जुलै या काळात पावसाचे प्रमाण नगण्य राहिल्याने धरण ५० टक्क्यांच्या उंबरठ्यावर रेंगाळले होते. १६ जुलैला धरणाने कसेबसे ५० टक्के गाठले, १९ जुलै रोजी पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने साठा ५४.२३ टक्क्यांवर पोहोचला, त्यानंतर मात्र गेल्या सात दिवसांत धरण क्षेत्रात पावसाने अक्षरशः धडाका लावला असून, साठ्यात थेट १९.३५ टक्क्यांची मोठी उसळी घेत रविवार २६ जुलै रोजी सकाळी हा साठा ७३.५८ टक्क्यांवर पोहोचला आहे.

जिल्ह्यासाठी बारवी धरण महत्त्वाचे

बारवी धरणातून अंबरनाथ बदलापूर, उल्हासनगर महापालिका, कल्याण ग्रामीण, मीरा-भाईंदर, ठाणे एमआयडीसी, तळोजा एमआयडीसी या भागांना पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे ठाणे जिल्ह्यासाठी बारवी धरण महत्त्वाचे मानले जाते.

गोकुळाष्टमीपूर्वी मोठा दिलासा! दोन लाख गोविंदांना विमा संरक्षणाची शक्यता; एकनाथ शिंदेंचे तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास धरण लवकरच भरेल

धरणातील पाणीसाठा ५० टक्केपर्यंत पोहोचण्यास १४ जुलै उजाडला. १९ जुलैनंतर मात्र पावसाचा वेग काहीसा वाढत असल्याने धरणाच्या पाण्यात समाधानकारक वाढ झाली आहे. १९ जुलैपर्यंत धरणात ५४ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला होता. २१ जुलैला त्यामध्ये वाढ होऊन तो ५७.४१ टक्क्यांवर तर २२ जुलैला ५९.२४ टक्के व २३ जुलैला ६८.१० टक्क्यांवर पोहबला. आणि २६ जुलैला त्यामध्ये आणखी वाढ होऊन तो ७३.५८ टक्क्यांवर पोहचला आहे. मागील वर्षी याच दिवशी धरणात ८५.२५ टक्के इतका पाणीसाठा होता. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा काहीसा कमी आहे. परंतु पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास लवकरच धरण पूर्ण क्षमतेने भरेल, अशी चिन्हे दिसू लागली आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: बारवी धरणातील सध्याचा पाणीसाठा किती आहे?

    Ans: रविवारी सकाळपर्यंत बारवी धरणातील पाणीसाठा 73.58 टक्के नोंदवण्यात आला आहे.

  • Que: बारवी धरणातून कोणत्या भागांना पाणीपुरवठा केला जातो?

    Ans: बारवी धरणातून अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, कल्याण ग्रामीण, मीरा-भाईंदर, ठाणे एमआयडीसी आणि तळोजा एमआयडीसी परिसराला पाणीपुरवठा केला जातो.

  • Que: यंदाचा पाणीसाठा मागील वर्षाच्या तुलनेत कसा आहे?

    Ans: मागील वर्षी याच कालावधीत धरणात 85.25 टक्के पाणीसाठा होता. यंदा तो कमी असला तरी अलीकडील पावसामुळे जलसाठ्यात वेगाने वाढ होत आहे.

Web Title: Barvi dam water level 73 percent water storage thane district relief

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 09:25 AM

Topics:  

  • Dam Water Level
  • maharashta
  • thane

संबंधित बातम्या

Thane News: डोंबिवली, कल्याण, दिव्यातून गावाकडे जाण्यासाठी मोफत एसटी; ५० हजार भाविकांना लाभ
1

Thane News: डोंबिवली, कल्याण, दिव्यातून गावाकडे जाण्यासाठी मोफत एसटी; ५० हजार भाविकांना लाभ

Thane News: सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी खूशखबर! ठाणे महानगरपालिकेत ‘प्रभारी अधिकारी’ पदासाठी वॉक-इन इंटरव्ह्यू
2

Thane News: सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी खूशखबर! ठाणे महानगरपालिकेत ‘प्रभारी अधिकारी’ पदासाठी वॉक-इन इंटरव्ह्यू

FDA News: घाणेरडी फरशी, झुरळे-उंदीर अन् वापरलेले तेल! फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 आस्थापनांवर FDAची धडक कारवाई
3

FDA News: घाणेरडी फरशी, झुरळे-उंदीर अन् वापरलेले तेल! फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 आस्थापनांवर FDAची धडक कारवाई

Thane News: गणेश विसर्जनासाठी ठाणे महापालिका सज्ज; १३ सप्टेंबरपर्यंत घाटांवरील कामे पूर्ण करण्याचे आदेश
4

Thane News: गणेश विसर्जनासाठी ठाणे महापालिका सज्ज; १३ सप्टेंबरपर्यंत घाटांवरील कामे पूर्ण करण्याचे आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.