Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News: गणेश विसर्जनासाठी ठाणे महापालिका सज्ज; १३ सप्टेंबरपर्यंत घाटांवरील कामे पूर्ण करण्याचे आदेश

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने विसर्जन घाटांवरील तयारीला वेग दिला आहे. भाविकांना सुरक्षित आणि सुविधाजनक विसर्जन करता यावे, यासाठी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी विविध विसर्जन घाटांची पाहणी करून कामांचा आढावा घेतला. तसेच घाटांवरील सर्व कामे १३ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 09, 2026 | 09:25 AM
फोटो सौजन्य- गुगल

फोटो सौजन्य- गुगल

Follow Us
Follow Us:
  • गणेश विसर्जनासाठी ठाणे महापालिका सज्ज
  • १३ सप्टेंबरपर्यंत घाटांवरील कामे पूर्ण करण्याचे आदेश
  • महापौरांनी केली मासुंदा तलाव, दत्तघाट, कृत्रिम तलावांची पाहणी
 

 

येत्या सोमवारी श्रीगणेशाचे आगमन होत असून, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेने गणेशमूर्ती विसर्जनाची तयारी वेगाने सुरू केली आहे. गणेश विसर्जनाच्या वेळी भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, तसेच विसर्जन घाटांवर आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा वेळेत उपलब्ध व्हाव्यात, यासाठी सुरू असलेल्या कामांचा महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी प्रत्यक्ष पाहणी दौरा करून आढावा घेतला. विसर्जन घाटांवरील सर्व कामे रविवार १३ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करावीत, असे स्पष्ट आदेश त्यांनी महापालिका प्रशासनाला दिले.

या पाहणी दौऱ्यावेळी वागळे प्रभाग समिती सभापती एकता भोईर, माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती सभापती सिद्धार्थ ओवळेकर, नगरसेवक संजय वाले, विकास रेपाळे, प्रशांत सोनग्रा, उपनगर अभियंता मोहन कलाल, कार्यकारी अभियंता ऋषिकेश जवळकर, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, मुख्य पर्यावरण अधिकारी विद्या सावंत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

महापौरांनी केली मासुंदा तलाव, दत्तघाट, कृत्रिम तलावांची पाहणी

महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी मंगळवारी मासुंदा तलाव येथील दत्त घाट, रायलादेवी येथील कृत्रिम तलाव तसेच गायमुख येथील विसर्जन घाटांची पाहणी केली. यापूर्वी शुक्रवारी त्यांनी कोपरी, कोलशेत आणि पारसिक येथील विसर्जन घाटांचीही पाहणी केली होती. यावेळी कोपरी प्रभाग समिती सभापती मीनल संखे, कळवा प्रभाग समिती सभापती विजया लासे, माजिवडा मानपाडा प्रभाग समिती सिद्धार्थ ओवळेकर, नगरसेवक अनिता गौरी, संजय भोईर, उषा भोईर आदी उपस्थित होते. या पाहणीदरम्यान घाटांवरील सुरू असलेली कामे, भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधा, सुरक्षेची व्यवस्था, वाहतूक नियोजन आणि स्वच्छतेबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

Thane News: एकीकडे हृदयाची झडप, दुसरीकडे रक्तस्रावाचा धोका; डॉक्टरांच्या प्रयत्नांनी ७१ वर्षीय महिलेवर यशस्वी TAVI

विसर्जन घाटावर आरतीसाठी स्वतंत्र व्यवस्था करा

दीड दिवसांच्या गणेशमूतींपासून अनंत चतुर्दशीपर्यंत विविध दिवशी गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. त्यामुळे विसर्जन घाटांवर सातत्याने भाविकांची गर्दी होत असते. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने घाटांच्या परिसरात आवश्यक त्या सुविधा तत्काळ उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना महापौरांनी दिल्या, महापालिकेच्या तलावांना बॅरिकेडिंग करणे, विसर्जन घाटावर आरतीसाठी स्वतंत्र व्यवस्था करणे, पावसाची शक्यता लक्षात घेऊन वेदरशेड उभारणे, तसेच भाविकांसाठी मोबाईल टॉयलेटची सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले.

Pratap Sarnaik: ‘आमदार मोठा की कायदा?’ बेकायदा बांधकामांवरून प्रताप सरनाईकांचा नरेंद्र मेहतांवर निशाणा

स्वीकार केंद्रांचा लाभ घ्यावा

ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून विसर्जन घाटांबरोबरच विविध ठिकाणी गणेशमूर्ती स्वीकार केंद्रे उभारण्यात आली आहेत. भाविकांनी या केंद्रांचा लाभघ्यावा आणि पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन घाटांवर मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होते. ही गर्दी लक्षात घेता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपल्या गणेश विसर्जन मिरवणुका शक्य तितक्या लवकर काढाव्यात. विसर्जनाची प्रक्रिया वेळेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी महापालिका, पोलीस विभाग आणि वाहतूक विभागाकडून वेळोवेळी सूचनांचे मंडळांनी आणि भाविकांनी काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महापौरांनी केले.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Thane ganesh visarjan preparations immersion ghats

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2026 | 09:25 AM

Topics:  

  • Ganeshotsav 2026
  • thane
  • Thane news

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026 : गणेशाच्या नैवेद्यासाठी बनवा हेल्दी आणि टेस्टी ‘ड्रायफ्रुट्स मोदक’, काही मिनिटांची रेसिपी
1

Ganeshotsav 2026 : गणेशाच्या नैवेद्यासाठी बनवा हेल्दी आणि टेस्टी ‘ड्रायफ्रुट्स मोदक’, काही मिनिटांची रेसिपी

Mumbai Ganesh Murti Collapse : गणेशोत्सवाला पुन्हा एकदा गालबोट! कुर्ल्यात स्पीड ब्रेकरवर तोल गेला अन् गणेशमूर्ती रस्त्यावर कोसळली
2

Mumbai Ganesh Murti Collapse : गणेशोत्सवाला पुन्हा एकदा गालबोट! कुर्ल्यात स्पीड ब्रेकरवर तोल गेला अन् गणेशमूर्ती रस्त्यावर कोसळली

Kokan Ganeshotsav: कोकणवासीयांना मोठं गिफ्ट! गणेशोत्सवात ‘या’ महामार्गांवर टोलमाफी जाहीर
3

Kokan Ganeshotsav: कोकणवासीयांना मोठं गिफ्ट! गणेशोत्सवात ‘या’ महामार्गांवर टोलमाफी जाहीर

Thane News: एकीकडे हृदयाची झडप, दुसरीकडे रक्तस्रावाचा धोका; डॉक्टरांच्या प्रयत्नांनी ७१ वर्षीय महिलेवर यशस्वी TAVI
4

Thane News: एकीकडे हृदयाची झडप, दुसरीकडे रक्तस्रावाचा धोका; डॉक्टरांच्या प्रयत्नांनी ७१ वर्षीय महिलेवर यशस्वी TAVI

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.