Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhiwandi News : अरे बापरे! शोरमा-पिझ्झा खाल्ल्याने १०७ जणांना अन्न विषबाधा; ३६ तासांनंतर नेत्यांची रुग्णालय भेट

भिवंडीतील खंडूपाडा परिसरातील 'फेमस शोरमा' दुकानातून चिकन शोरमा आणि पिझ्झा खाल्ल्यानंतर अन्न विषबाधा झालेल्या रुग्णांची संख्या १०७ वर पोहोचली आहे. अवघ्या ३६ तासांत रुग्णसंख्या शंभरी पार गेल्याने उपजिल्हा रुग्णालयावर मोठा ताण निर्माण झाला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 20, 2026 | 04:21 PM
अरे बापरे! शोरमा-पिझ्झा खाल्ल्याने १०७ जणांना अन्न विषबाधा; ३६ तासांनंतर नेत्यांची रुग्णालय भेट

अरे बापरे! शोरमा-पिझ्झा खाल्ल्याने १०७ जणांना अन्न विषबाधा; ३६ तासांनंतर नेत्यांची रुग्णालय भेट

Follow Us
Follow Us:
  • भिवंडीत अन्न विषबाधेचे संकट गडद
  • ‘फेमस शोरमा’मुळे बाधितांची संख्या १०७ वर
  • उपजिल्हा रुग्णालयावर ताण
  • आयुक्त अद्याप रुग्णालयात पोहोचले नाहीत
Bhiwandi Food Poisoning News Marathi : भिवंडी शहरातील खंडूपाडा परिसरातील ‘फेमस शोरमा’ या खाद्यपदार्थांच्या दुकानातून चिकन शोरमा आणि पिझ्झा खाल्ल्यानंतर अन्न विषबाधेची गंभीर घटना घडली आहे. या प्रकरणातील बाधितांची संख्या आता १०७ वर पोहोचली असून, अवघ्या ३६ तासांत रुग्णसंख्या शंभरी पार गेल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. ३६ तास उलटल्यानंतर महापौर नारायण चौधरी आणि आमदार महेश चौघुले यांनी रुग्णालयाला भेट दिली, पण आयुक्त अद्याप अनुपस्थित आहेत.

नेमके काय घडले?

प्राथमिक माहितीनुसार, खंडूपाडा परिसरातील अनेक नागरिकांनी ‘फेमस शोरमा’ दुकानातून चिकन शोरमा आणि पिझ्झा खाल्ले होते. त्यानंतर अनेकांना अचानक उलट्या, मळमळ, पोटदुखी, जुलाब आणि अशक्तपणा यांसारखी लक्षणे जाणवू लागली. काही तासांतच बाधितांची संख्या वाढत गेल्याने त्यांना तातडीने भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र महापालिका आयुक्त अनमोल सागर यांनी अद्याप रुग्णालयाला भेट न दिल्याने त्यांच्या कार्यत्परतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

‘निरोगी मन, सुलभ जीवन’ जागृती मोहीम! योग दिनानिमित्त मुंबईत ५० ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन; आध्यात्मिक उन्नतीचे प्रयत्न

रुग्णालयावर वाढला ताण

एकाच वेळी मोठ्या संख्येने रुग्ण दाखल झाल्याने भिवंडी उपजिल्हा रुग्णालयावर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आणि अन्य आरोग्य कर्मचारी रुग्णांवर उपचार करण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहेत. काही रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत असली, तरी बाधितांची वाढती संख्या चिंतेचा विषय ठरत आहे.

महापौर आणि आमदारांची रुग्णालयाला भेट

घटनेला सुमारे ३६ तास उलटल्यानंतर भिवंडीचे महापौर नारायण चौधरी आणि भाजप आमदार महेश चौघुले यांनी उपजिल्हा रुग्णालयाला भेट देत रुग्णांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यांनी डॉक्टर आणि प्रशासनाकडून परिस्थितीचा आढावा घेत आवश्यक उपचार आणि सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. सद्यस्थितीत अन्नातून विषबाधा झालेल्या रुग्णांचा आकडा १०७ वर पोहचला आहे. सर्वांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे. परंतु इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण दाखल झाल्याने रुग्णालय प्रशासनाची धावपळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणी दुकानदारावर गुन्हा दाखल होऊन FDA ने दुकान सील केले आहे.

महापालिका आयुक्तांच्या अनुपस्थितीवर प्रश्नचिन्ह

दरम्यान, या गंभीर घटनेनंतरही भिवंडी महापालिका आयुक्त अनमोल सागर यांनी अद्याप रुग्णालयाला भेट दिलेली नाही, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यतत्परतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, स्थानिक नागरिक आणि काही सामाजिक संघटनांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

प्रशासनाकडून तपास सुरू

या प्रकरणाची दखल घेत आरोग्य विभाग आणि स्थानिक प्रशासनाने संबंधित खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. अन्न विषबाधेचे नेमके कारण काय, अन्नपदार्थांच्या साठवणुकीत किंवा स्वच्छतेत काही त्रुटी होत्या का, याचा तपास सुरू असून अहवालानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.

या घटनेमुळे भिवंडी शहरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच बाहेरील खाद्यपदार्थ खाताना स्वच्छता आणि अन्नाच्या गुणवत्तेबाबत अधिक सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

यावेळी भाजपा आमदार महेश चौघुले यांनी FDA च्या कारभारावर टीका केली. मोठ्या हॉटेल्सवर दिखाऊ कारवाई करून FDA फक्त खिसे भरण्यात व्यस्त असल्याचा आरोप त्यांनी केला. छोट्या दुकानांवर लक्ष देण्याची खरी गरज असल्याचे त्यांनी सांगितले. फॉरेन्सिक रिपोर्टनुसार गुन्ह्यातील कलमे वाढवून आणखी कठोर कारवाई केली जाणार असल्याचेही ते म्हणाले.

Navi Mumbai Airport : नवी मुंबईकरांसाठी खुशखबर! आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ‘या’ दिवशी विमाने घेणार टेक ऑफ

Web Title: Bhiwandi food poisoning case famous shawarma outlet patients cross 107

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2026 | 04:21 PM

Topics:  

  • bhiwandi
  • FDA
  • food

संबंधित बातम्या

Wardha News : सणासुदीच्या काळात एफडीएची मोठी कारवाई, ५९ आस्थापनांची केली तपासणी तर ४ परवाने केले निलंबित
1

Wardha News : सणासुदीच्या काळात एफडीएची मोठी कारवाई, ५९ आस्थापनांची केली तपासणी तर ४ परवाने केले निलंबित

IAS Tukaram Mundhe सोशल मीडियावरही ‘सिंघम’, Instagram वर मुंढेंची क्रेझ! फॉलोअर्समध्ये फडणवीस-शिंदेंनाही टाकले मागे
2

IAS Tukaram Mundhe सोशल मीडियावरही ‘सिंघम’, Instagram वर मुंढेंची क्रेझ! फॉलोअर्समध्ये फडणवीस-शिंदेंनाही टाकले मागे

FDA Action : रुग्णांच्या ताटात झुरळ; एफडीएची धडक कारवाई, राम कॅटरर्सचे उपाहारगृह सील
3

FDA Action : रुग्णांच्या ताटात झुरळ; एफडीएची धडक कारवाई, राम कॅटरर्सचे उपाहारगृह सील

Mathura Peda Recipe: यंदाच्या जन्माष्टमीला कान्हासाठी बनवा मथुरेचे प्रसिद्ध पेढे! जाणून घ्या ‘ही’ सोपी रेसिपी
4

Mathura Peda Recipe: यंदाच्या जन्माष्टमीला कान्हासाठी बनवा मथुरेचे प्रसिद्ध पेढे! जाणून घ्या ‘ही’ सोपी रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.