
फोटो सौजन्य- istock
सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अश्विन मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीपुरवठ्याशी संबंधित समस्यांचा नियमित आढावा घेतला जात आहे. विविध नोडमधील पाणीटंचाई दूर करण्यासाठी उच्चस्तरीय बैठका घेऊन संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना दिल्या जात आहेत. टँकरद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्यात पारदर्शकता आणणे आणि प्रत्येक टँकरच्या हालचालींवर लक्ष ठेवणे हा या उपाययोजनांचा प्रमुख उद्देश आहे.
सिडकोकडून पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व ३४ टैंकर्सवर जीपीएस प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे टँकरचा मार्ग, त्याचे ठिकाण आणि पाणी वितरणाची ठिकाणे यावर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. याशिवाय सर्व ११ प्रमुख टँकर भरणा केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आली असून, दररोज किती पाणी वितरित झाले, याच्या नोंदींचेही निरीक्षण केले जात आहे.
नागरिकांना नियमित, पुरेसा आणि न्याय्य पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी सिडको प्रशासन प्रयत्नशील असून, नागरिकांनी तसेच गृहनिर्माण संस्थांनी पाण्याचा जपून वापर करावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.
पाण्याचा काटकसरीने वापर व्हावा आणि नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या गरजांना प्राधान्य मिळावे, यासाठी सिडकोने बांधकाम व विकासकामांसाठी विकासकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास मनाई केली आहे. तसेच टँकरद्वारे पुरविण्यात येणाऱ्या पाण्याचा वापर एखाद्या गृहनिर्माण संस्थेकडून जलतरण तलावासाठी होत असल्याचे आढळल्यास संबंधित सोसायटीचा टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा तात्काळ बंद करण्यात येणार आहे.
पाणीपुरवठ्यातील संभाव्य गैरप्रकार रोखण्यासाठी सिडकोच्या दक्षता विभागाकडून यापूर्वी प्राप्त झालेल्या तक्रारींची तपासणी सुरू आहे. पाणी वितरणात अनियमितता किंवा गैरवापर झाल्याचे सिद्ध झाल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाईसह कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)
Ans: पाणीपुरवठ्यात पारदर्शकता आणण्यासाठी सिडकोने टँकरना GPS प्रणाली बसवली असून, भरणा केंद्रांवर CCTV कॅमेरे लावले आहेत.
Ans: टँकरचा मार्ग, ठिकाण आणि पाणी वितरणाची ठिकाणे यावर लक्ष ठेवणे हा GPS प्रणाली बसवण्यामागचा उद्देश आहे.
Ans: पिण्याच्या पाण्याच्या गरजांना प्राधान्य मिळावे आणि पाण्याचा काटकसरीने वापर व्हावा, यासाठी बांधकाम व विकासकामांसाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास मनाई करण्यात आली आहे