Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 31 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhiwandi Building Collapsed: भिवंडी दुर्घटनेवर सरकार ॲक्शन मोडमध्ये! दोषींवर कठोर कारवाईचे आदेश, मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत

Bhiwandi Building Collapsed: भिवंडीतील इमारत कोसळल्याच्या दुर्घटनास्थळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. मृतांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांनी जखमींच्या उपचारांची माहिती घेतली. या प्रकरणात त्वरित गुन्हा दाखल करून जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 31, 2026 | 01:13 PM
भिवंडी दुर्घटनेवर सरकार ॲक्शन मोडमध्ये! मुख्यमंत्र्यांची घटनास्थळी भेट, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश, मृतांच्या वारसांना 5 लाखांची आर्थिक मदत

भिवंडी दुर्घटनेवर सरकार ॲक्शन मोडमध्ये! मुख्यमंत्र्यांची घटनास्थळी भेट, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश, मृतांच्या वारसांना 5 लाखांची आर्थिक मदत

Follow Us
Follow Us:
  • भिवंडी इमारतीच्या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्य
  • भिवंडी दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांची तातडीची भेट
  • दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश
Bhiwandi Building Collapsed News Marathi: मुंबईजवळील भिवंडी शहरातील बालाजी नगर परिसरात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास चार मजली निवासी इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, अनेक रहिवासी अद्याप ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.

‘कोहिनूर’ इमारतीत सुरू होते दुरुस्तीचे काम

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘कोहिनूर’ नावाची ही चार मजली इमारत भिवंडीतील बालाजी नगर येथे होती. इमारतीत दुरुस्तीचे काम सुरू असताना रात्री सुमारे 11.30 वाजण्याच्या सुमारास अचानक इमारत कोसळली. या इमारतीत एकूण 48 खोल्या होत्या. प्रत्येक मजल्यावर 12 खोल्या असून अनेक कुटुंबे येथे वास्तव्यास होती.

भिवंडीत मोठी दुर्घटना; चार मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली, 7 जणांचा मृत्यू

मुख्यमंत्र्यांची तातडीची भेट

भिवंडीतील चार मजली निवासी इमारत कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला. दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांनी जखमींच्या प्रकृतीची माहिती घेतली आणि बचावकार्याचा आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून बचाव आणि मदतकार्य अधिक वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच या दुर्घटनेबाबत तात्काळ गुन्हा दाखल करून जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिले. धोकादायक घोषित करण्यात आलेल्या इमारतीबाबत निष्काळजीपणा झाला का, याची सखोल चौकशी करण्याचेही निर्देश त्यांनी दिले.

भिवंडीत एक इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
या प्रकरणात तत्काळ गुन्हा दाखल करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, असे आदेश महापालिका…
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 31, 2026

मंत्री गिरीश महाजन यांचीही घटनास्थळी भेट

राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनीही दुर्घटनास्थळी भेट देऊन प्रशासनाकडून सुरू असलेल्या बचावकार्याचा आढावा घेतला. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त करत मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. याशिवाय, दुर्घटनेत जखमी झालेल्या सर्व नागरिकांवर तातडीने आणि दर्जेदार वैद्यकीय उपचार करण्यात यावेत, तसेच आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.

जबाबदारी निश्चित करण्यावर सरकारचा भर

दुर्घटनेनंतर राज्य सरकारने या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. इमारत धोकादायक घोषित झाल्यानंतरही ती पूर्णपणे रिकामी का करण्यात आली नाही, दुरुस्तीच्या कामांमध्ये नियमांचे पालन झाले का आणि संबंधित अधिकारी किंवा इमारत व्यवस्थापनाची जबाबदारी काय होती, याची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. दरम्यान, एनडीआरएफ, अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनाकडून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध सुरू असून, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

Maharashtra Rain Update: पुढील 24 तास महत्त्वाचे! ‘या’ जिल्ह्यांत अतिवृष्टीची शक्यता, हवामान विभागाने जारी केला अलर्ट

Web Title: Cm devendra fadnavis visits bhiwandi building collapse site orders strict action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 01:13 PM

Topics:  

  • bhiwandi
  • devendra fadnavis

संबंधित बातम्या

Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 9 जणांचा मृत्यू
1

Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 9 जणांचा मृत्यू

‘2 ते 4 वर्षात ड्रग्ज फ्री मुंबई…’, राज्य सरकारच्या नशामुक्ती अभियानाचा शुभारंभ; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
2

‘2 ते 4 वर्षात ड्रग्ज फ्री मुंबई…’, राज्य सरकारच्या नशामुक्ती अभियानाचा शुभारंभ; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

‘फडणवीस साहेब, किती अंधभक्ती करणार?’ धर्मेंद्र प्रधानांच्या समर्थनावरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
3

‘फडणवीस साहेब, किती अंधभक्ती करणार?’ धर्मेंद्र प्रधानांच्या समर्थनावरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

‘फडणवीस केंद्रात गेले तर धर्मेंद्र प्रधानांपेक्षाही जास्त…’; हर्षवर्धन सपकाळांचा खोचक टोला
4

‘फडणवीस केंद्रात गेले तर धर्मेंद्र प्रधानांपेक्षाही जास्त…’; हर्षवर्धन सपकाळांचा खोचक टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.