Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Bhayandar Dahi Handi: ‘संस्कृतीची हंडी’ ते ‘मराठी हंडी’; मीरा-भाईंदरमध्ये दहीहंडीचा दणका

Mira Bhayandar Dahi Handi: मीरा-भाईंदरमध्ये यंदा दहीहंडी उत्सवाचा मोठा जल्लोष पाहायला मिळणार असून शहरात तब्बल 338 ठिकाणी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 88 सार्वजनिक तर 250 खासगी दहीहंडींचा समावेश आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 04, 2026 | 05:46 PM
‘संस्कृतीची हंडी’ ते ‘मराठी हंडी’; मीरा-भाईंदरमध्ये दहीहंडीचा दणका

‘संस्कृतीची हंडी’ ते ‘मराठी हंडी’; मीरा-भाईंदरमध्ये दहीहंडीचा दणका

Follow Us
Follow Us:
  • मीरा-भाईंदरमध्ये दहीहंडीचा जल्लोष!
  • 88 सार्वजनिक, 250 खासगी हंड्या
  • 1,989 पोलिसांचा बंदोबस्त
विजय काते, मीरा-भाईंदर : गोपाळकाला आणि दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मीरा-भाईंदर शहरात यंदा मोठ्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. भाजप, मनसे, शिवसेनेसह विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि सार्वजनिक मंडळांच्या माध्यमातून शहराच्या विविध भागांत दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. गोविंदा पथकांच्या थरारासोबतच सांस्कृतिक कार्यक्रम, नामवंत कलाकार आणि गायकांच्या उपस्थितीमुळे यंदाचा उत्सव अधिक भव्य होणार आहे.

मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील आकडेवारीनुसार, परिमंडळ-१ मध्ये ८८ सार्वजनिक आणि २५० खासगी, परिमंडळ-२ मध्ये ७१ सार्वजनिक आणि २७८ खासगी, तर परिमंडळ-३ मध्ये ८४ सार्वजनिक आणि ४४८ खासगी दहीहंडींचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे परिमंडळनिहाय एकूण २४३ सार्वजनिक आणि ९७६ खासगी, म्हणजे तब्बल १,२१९ दहीहंडी होतात. उपलब्ध आकडेवारीनुसार शहरात दहीहंडी उत्सवाची मोठी रेलचेल पाहायला मिळणार आहे.

Jalgaon News: गोविंदा आला रे…! जळगावात नारीशक्तीचा जल्लोष, 685 युवती फोडणार 15 दहीहंड्या, तयारी जोरात

प्रताप सरनाईकांची ‘संस्कृतीची हंडी’ ठरणार आकर्षण

ठाणे जिल्ह्यातील मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून गेल्या वर्षापासून मीरा-भाईंदरमध्ये ‘संस्कृतीची हंडी’ आयोजित केली जात आहे. यंदा हा कार्यक्रम अधिक दिमाखदार पद्धतीने आयोजित करण्यात आला असून, विविध सुप्रसिद्ध कलाकार आणि गायकांची उपस्थिती आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. महाराष्ट्रात परिवहन विभागाच्या माध्यमातून मराठी भाषेच्या प्रसारासाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा संदेशही या दहीहंडीच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ‘लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी’ अशा आशयाचे फलक शहराच्या विविध भागांत लावण्यात आले आहेत. त्यामुळे दहीहंडी उत्सवाला सांस्कृतिक आणि मराठी अस्मितेची जोड मिळाली आहे.

भाजपची भव्य हंडी; मनसेची ‘मराठी हंडी’

भाजपच्या कार्यालयासमोरही मोठ्या प्रमाणात भव्य दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर मनसेच्या वतीने *‘मराठी हंडी’*चे आयोजन करण्यात आले असून, या माध्यमातून मराठी भाषेचा आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचा संदेश देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

यंदाच्या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दहीहंडीच्या प्रारंभी महाराष्ट्रातील दिवंगत राजकीय नेते तसेच मीरा-भाईंदर शहरातील दिवंगत वरिष्ठ मंडळींना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. त्यामुळे उत्सवाच्या जल्लोषासोबत कृतज्ञतेची भावना व्यक्त करणारा उपक्रमही यावेळी पाहायला मिळणार आहे.

‘मानाची हंडी’ म्हणून राहुल पाटील मित्र मंडळाची हंडी चर्चेत

मीरा-भाईंदरमधील विविध सार्वजनिक मंडळांकडूनही दहीहंडीचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये गेल्या वर्षापासून ‘मानाची हंडी’ म्हणून नावाजलेल्या राहुल पाटील मित्र मंडळाच्या दहीहंडीची विशेष चर्चा आहे. या हंडीला मुंबईतील दिग्गज दहीहंडी पथके उपस्थित राहणार असल्याने गोविंदा पथकांच्या थरारक सलामी आणि मानवी मनोरे पाहण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

१,९८९ पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

दहीहंडी उत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार असल्याने मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. या बंदोबस्तामध्ये ३ पोलीस उपअधीक्षक, ८ वरिष्ठ अधिकारी, ४६ पोलीस निरीक्षक, २०२ अधिकारी, १,५१० पोलीस अंमलदार आणि २२० होमगार्ड, असे एकूण १,९८९ पोलीस अधिकारी-कर्मचारी सहभागी असणार आहेत.
याशिवाय SRPFची १ कंपनी, RCPच्या २ प्लाटून आणि स्ट्रायकिंग फोर्सच्या २ प्लाटून सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. गर्दी नियंत्रण, वाहतूक नियमन, संवेदनशील ठिकाणांवरील बंदोबस्त आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जाणार आहे.

दहीहंडीच्या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक आणि गोविंदा पथके सहभागी होणार असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठीही पोलिसांकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे. गर्दीच्या ठिकाणी पोलिसांची गस्त वाढविण्यात येणार असून आयोजकांनाही सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राजकीय पक्षांचा झेंडा, मराठी संस्कृतीचा संदेश, कलाकारांची उपस्थिती, गोविंदा पथकांचा थरार आणि तब्बल १,९८९ पोलिसांचा बंदोबस्त यामुळे यंदाची मीरा-भाईंदरमधील दहीहंडी उत्सवाची रंगत आणखी वाढणार आहे.

Navi Mumbai Dahi Handi: अनधिकृत बॅनरबाजीचा नवी मुंबईत धुमाकूळ, पालिकेच्या बुडीत महसूलाला जबाबदार कोण?

Web Title: Dahi handi celebrations at 338 locations in mira bhayandar 1989 police deployed for security

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 05:46 PM

Topics:  

  • Dahi Handi
  • maharashtra
  • mira bhayandar

संबंधित बातम्या

Purandar Airport : …ही जबाबदारी आमची नाही; पुरंदर विमानळाच्या जागा निवडीवरून अधिकाऱ्यांमध्ये टोलवाटोलवी
1

Purandar Airport : …ही जबाबदारी आमची नाही; पुरंदर विमानळाच्या जागा निवडीवरून अधिकाऱ्यांमध्ये टोलवाटोलवी

Bhandara News: बाजारपेठेवर चढला जन्माष्टमीचा रंग! मूर्तिकारांची लगबग; पूजासाहित्य, सजावटीच्या वस्तूंनी बाजार फुलला
2

Bhandara News: बाजारपेठेवर चढला जन्माष्टमीचा रंग! मूर्तिकारांची लगबग; पूजासाहित्य, सजावटीच्या वस्तूंनी बाजार फुलला

Pratap Sarnaik: प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या नियमबाह्य रिक्षांवर कारवाईचा बडगा; प्रताप सरनाईकांचे निर्देश
3

Pratap Sarnaik: प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या नियमबाह्य रिक्षांवर कारवाईचा बडगा; प्रताप सरनाईकांचे निर्देश

Engineering Admission 2026 : इंजिनिअरिंग प्रवेशाची चौथी फेरी जाहीर! या फेरीत किती विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार?
4

Engineering Admission 2026 : इंजिनिअरिंग प्रवेशाची चौथी फेरी जाहीर! या फेरीत किती विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.