Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ambernath: अंबरनाथमध्ये मतदार यादीचा ‘सावळा गोंधळ’! एकाच वॉर्डात शहराच्या विविध भागांतील नावे; माविआचे गंभीर आरोप

अंबरनाथ नगरपालिकेच्या अंतिम मतदार यादीत मोठा गोंधळ. एकाच वॉर्डात शहराच्या विविध भागांतील आणि उल्हासनगरच्या माजी नगरसेवकांची नावे. महाविकास आघाडी आणि मनसेचे गंभीर आरोप, यादी शुद्ध करूनच निवडणूक घेण्याची मागणी.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Nov 02, 2025 | 08:17 PM
अंबरनाथमध्ये मतदार यादीचा 'सावळा गोंधळ'! (Photo Credit - X)

अंबरनाथमध्ये मतदार यादीचा 'सावळा गोंधळ'! (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:
  • उल्हासनगरच्या माजी नगरसेवक, महापौरांची नावेही अंबरनाथमध्ये
  • यादीतील ‘खेळ’ पाहून राजकीय पक्ष संतप्त
  • शुद्धीकरणाची मागणी
अंबरनाथ (शहर प्रतिनिधी): नगरपालिका निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता असतानाच, अंबरनाथमधील अंतिम मतदार यादीतील ‘सावळ्या गोंधळा’मुळे शहरातील इच्छुक नगरसेवक आणि सामान्य मतदारांमध्ये संभ्रम व संताप निर्माण झाला आहे. एकाच वॉर्डात शहरातील इतर वीस ते पंचवीस वॉर्डांतील ५० ते १०० मतदारांची नावे टाकण्यात आल्याचे धक्कादायक पुरावेच महाविकास आघाडी आणि मनसेने समोर आणले आहेत. ३१ ऑक्टोबर रोजी जाहीर झालेल्या अंतिम मतदार यादीतून हा प्रकार समोर आला आहे. यादीतील हा ‘खेळ’ पाहून लोकशाही आणि मतदारांचा अपमान होत असल्याचा गंभीर आरोप महाविकास आघाडीने केला आहे.

नक्की हा प्रकार तरी काय?

एका वॉर्डातील नावे लगतच्या वॉर्डात काही प्रमाणात इकडची तिकडे होऊ शकतात. मात्र, अतिशय जास्त अंतरावर आणि वॉर्डाच्या सीमेपासून पूर्णपणे वेगळ्या भागात असलेल्या वॉर्डातील नावे दुसऱ्याच वॉर्डात टाकण्यात आल्याने नक्की हा प्रकार तरी काय, असा संतप्त सवाल उपस्थित झाला आहे.

मनसेचे शहराध्यक्ष यांचे आरोप

मनसेचे शहराध्यक्ष शैलेश शिर्के यांनी पत्रकार परिषदेत आरोप केला की, “काही उमेदवार निवडून येऊ शकत नाहीत, त्यामुळे त्यांनी प्रत्येक वॉर्डातील काही मतदार शहरातील इतर वॉर्डात ‘फिरवले’. शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागातील ४०-५० मतदार दुसऱ्या वॉर्डात टाकण्याचे काम केले आहे. ज्या वॉर्डात इच्छुक उमेदवार आहे, त्याचे नाव दुसऱ्या वॉर्डात टाकण्यात आले आहे.”

Thane News : – ठाण्यातील दिवा मतदार यादी घोटाळ्याने प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह ?

माजी नगरसेवकांची नावेही दुसऱ्या वॉर्डात

या गोंधळात स्थानिक माजी नगरसेवकांची नावे देखील इतर वॉर्डात टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सेना आणि भाजपच्या काही माजी नगरसेवकांचे नावे दुसऱ्या वॉर्डात टाकल्याने त्यांच्यासमोरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांनी सर्वात मोठा खुलासा करताना सांगितले की, “उल्हासनगरातील काही माजी नगरसेवक आणि माजी महापौरांची नावे देखील अंबरनाथच्या मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत.” प्रदीप पाटील यांनी या संदर्भात मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या लक्षात हा प्रकार आणून दिला. मुख्याधिकाऱ्यांनीही हे मान्य करून लेखी अर्ज देण्यास सांगितले आहे.

निवडणुकीपूर्वी शुद्धीकरणाची मागणी

महाविकास आघाडी (शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, काँग्रेस) आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी पत्रकार परिषदेत याबाबत पुरावे समोर आणले. मतदार यादीतील हा सावळा गोंधळ आधी दूर करावा आणि मगच पारदर्शकपणे निवडणुका घेण्यात याव्यात. घाईघाईने निवडणूक घेऊन मतदार आणि लोकशाहीचा अपमान करू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

३ वर्षांत ३ हजार ९०० कोटी कुठे खर्च? ठाण्याच्या विकासावरून भाजपाचा शिंदेवर निशाणा, मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी

Web Title: Dark confusion in the voter list in ambernath names from different parts of the city in the same ward

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2025 | 08:17 PM

Topics:  

  • Ambernath
  • MNS
  • MVA

संबंधित बातम्या

Ambernath News : मुलाच्या मृत्यू प्रकरणात आरोपी महिला डॉक्टरचा जीव संपवण्याचा प्रयत्न; सामाजिक कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप
1

Ambernath News : मुलाच्या मृत्यू प्रकरणात आरोपी महिला डॉक्टरचा जीव संपवण्याचा प्रयत्न; सामाजिक कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.