Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ramesh Mhatre Case: डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंची तुरुंगातून सुटका, मात्र ‘या’ अटींचे जाळे कायम, काय आहे कोर्टाचे आदेश?

Ramesh Mhatre Case: डॉक्टर मारहाण प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह चार आरोपींना जामीन मंजूर केला आहे. आरोपपत्र दाखल होईपर्यंत महाराष्ट्राबाहेर राहण्याचे निर्देश देण्यात आले असून, संबंधित परराज्यातील स्थानिक पोलिस ठाण्यात आठवड्यातून तीन वेळा हजेरी लावण्याची अटही न्यायालयाने घातली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 07, 2026 | 12:27 PM
डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेची तुरुंगातून सुटका, मात्र 'या' अटींचे जाळे कायम, काय आहे कोर्टाचे आदेश?

डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेची तुरुंगातून सुटका, मात्र 'या' अटींचे जाळे कायम, काय आहे कोर्टाचे आदेश?

Follow Us
Follow Us:
  • डॉक्टर मारहाण प्रकरणात उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
  • शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रेंसह चार आरोपींना दिलासा
  • आठवड्यातून तीनदा पोलिस ठाण्यात हजेरी बंधनकारक
Ramesh Mhatre Case News In Marathi : डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरांवर झालेल्या मारहाण प्रकरणात तपासाला महत्त्वाचे वळण मिळाले आहे. डॉक्टर मारहाण प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह चार आरोपींना मोठा दिलासा देत जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने जामीन मंजूर करताना काही कठोर अटीही घातल्या आहेत.

महाराष्ट्राबाहेर राहण्याचे आदेश

न्यायालयाच्या आदेशानुसार, आरोपपत्र दाखल होईपर्यंत रमेश म्हात्रे यांनी महाराष्ट्राबाहेर राहावे लागणार आहे. तसेच ते ज्या राज्यात वास्तव्यास असतील, तेथील स्थानिक पोलिस ठाण्यात आठवड्यातून तीन वेळा हजेरी लावणे बंधनकारक असेल. परिणामी आता रमेश म्हात्रे आरोप दाखल होईपर्यंत गोव्यामध्ये राहणार असल्याची माहिती समोर येते.

या प्रकरणात रमेश म्हात्रे यांच्यासह चार आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला असून, तपासात सहकार्य करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाने घातलेल्या सर्व अटींचे पालन करणे आरोपींसाठी अनिवार्य राहणार आहे.

रमेश म्हात्रेंना मोठा धक्का; मुंबई उच्च न्यायालयाने जामीन रद्द करत तातडीने शरण येण्याचे दिले निर्देश

घटनेचा व्हिडीओ व्हायरल

डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. डॉक्टर, परिचारिका आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर झालेल्या कथित हल्ल्यानंतर वैद्यकीय संघटनांनीही कठोर कारवाईची मागणी केली होती. शास्त्रीनगर रुग्णालयात घडलेल्या या घटनेत डॉ. वैभव साळुंखे, महिला डॉक्टर डॉ. सृष्टी बाविस्कर तसेच रुग्णालयातील कर्मचारी यांच्याशी मारहाण, धक्काबुक्की आणि शिवीगाळ झाल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिक आणि वैद्यकीय क्षेत्रातून संतापाची लाट उसळली.

सुरुवातीला विष्णुनगर पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली होती. मात्र, विरोधक आणि डॉक्टर संघटनांनी रमेश म्हात्रे यांच्यावरही कारवाईची मागणी केल्यानंतर पोलिसांनी त्यांनाही अटक केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू करण्यात आला.

या घटनेनंतर रमेश म्हात्रे यांच्या भूतकाळातील गंभीर गुन्ह्यांचीही चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. त्यांच्यावर यापूर्वी हत्येचा प्रयत्न, अपहरणासारख्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद असल्याचा उल्लेख विविध माध्यमांत करण्यात आला आहे. त्यामुळे डॉक्टरांवरील हल्ल्याच्या प्रकरणात त्यांच्याविरोधातील कारवाईकडे विशेष लक्ष लागले आहे. या प्रकरणातील सर्वात चर्चेचा मुद्दा म्हणजे, ज्या वैद्यकीय क्षेत्राने रमेश म्हात्रे यांना भूतकाळात जीवदान दिले, त्याच क्षेत्रातील डॉक्टरांवर हल्ला केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

2008 मध्ये झालेल्या जीवघेण्या गोळीबारात रमेश म्हात्रे गंभीर जखमी झाले होते. गोळी शर्टच्या खिशातील पेनाला लागूनही त्यांच्या पोटात घुसली होती. त्यावेळी डोंबिवलीतील खाजगी रुग्णालयातील डॉ. मिलिंद शिरोडकर यांनी तातडीची शस्त्रक्रिया करून त्यांचे प्राण वाचवले होते. डॉक्टर मारहाण प्रकरणामुळे राज्यभरात मोठी चर्चा रंगली होती. आता उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, पुढील सुनावणी आणि आरोपपत्र दाखल होण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेंना अटक

Web Title: Doctor assault case shiv sena corporator ramesh mhatre granted bail by bombay high court

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 12:27 PM

Topics:  

  • Bombay High Court
  • Dombivli

संबंधित बातम्या

Bombay HC : ‘सण कोणताही असो, नियम एकच!’ ध्वनीप्रदूषणावर हायकोर्टाची महत्त्वाची भूमिका
1

Bombay HC : ‘सण कोणताही असो, नियम एकच!’ ध्वनीप्रदूषणावर हायकोर्टाची महत्त्वाची भूमिका

High Court Big Decision : फ्लॅटधारकांसाठी हायकोर्टाचा ऐतिहासिक निर्णय! इमारतीसह संपूर्ण जमिनीवर सोसायट्यांचाच हक्क
2

High Court Big Decision : फ्लॅटधारकांसाठी हायकोर्टाचा ऐतिहासिक निर्णय! इमारतीसह संपूर्ण जमिनीवर सोसायट्यांचाच हक्क

Ganeshotsav 2026: अरे देवा! गणेशोत्सवातील DJ, लाऊडस्पीकर अन् ढोल-ताशांचा आवाज हायकोर्टात; नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीची मागणी
3

Ganeshotsav 2026: अरे देवा! गणेशोत्सवातील DJ, लाऊडस्पीकर अन् ढोल-ताशांचा आवाज हायकोर्टात; नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीची मागणी

Disha Salian Case : ‘फालतू चारित्र्यहनन बस्स झालं!’ दिशा सालियन प्रकरणावर उद्धव ठाकरे संतापले
4

Disha Salian Case : ‘फालतू चारित्र्यहनन बस्स झालं!’ दिशा सालियन प्रकरणावर उद्धव ठाकरे संतापले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.