Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मीरा रोड येथे उभारणार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पूर्णाकृती पुतळा! मंत्री संजय शिरसाट यांचे तातडीने काम सुरू करण्याचे निर्देश

मीरा रोड घोडबंदर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार आहे. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी २ कोटींचा निधी मंजूर करत कामाला गती देण्याचे आदेश दिले आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 08, 2026 | 09:04 PM
मीरा रोड येथे उभारणार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पूर्णाकृती पुतळा! मंत्री संजय शिरसाट यांचे तातडीने काम सुरू करण्याचे निर्देश
Follow Us
Follow Us:

 

  • मीरा रोड येथे उभारणार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पूर्णाकृती पुतळा!
  • मंत्री संजय शिरसाट यांचे तातडीने काम सुरू करण्याचे निर्देश
मुंबई, दि. ८: राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा मीरा रोड घोडबंदर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय इमारतीच्या आवारात उभारला जाणार आहे. या प्रकल्पाशी संबंधित प्रशासकीय व तांत्रिक प्रक्रिया वेळेत पूर्ण करून पुतळा उभारणीचे काम तातडीने सुरू करावे, असे निर्देश सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिले.

मंत्री शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली याबाबत बैठक झाली. बैठकीस परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त राधाबिनोद शर्मा, सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव सो.ना बागुल, मिरा भाईंदर महानगरपालिकेचे शहर अभियंता दीपक खांबित तसेच संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Dr. Babasaheb Ambedkar jayanti 2026: डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे ‘हे’ प्रेरणादायी विचार आजच्या तरुण पिढीसाठी ठरतील मौल्यवान

मंत्री शिरसाट म्हणाले, निर्धारित जागेवर पुतळा उभारणीच्या कामाला वेग देण्यासाठी महानगरपालिकेने सर्व संबंधित बाबींची पूर्तता तातडीने करावी. यामध्ये आवश्यक परवानग्या, ना हरकत प्रमाणपत्रे, तांत्रिक आराखडे तसेच अंमलबजावणीची प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी. पुतळा उभारणीसाठी २ कोटी इतक्या निधीस मंजुरी देण्यात आली असून, या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी पुढील कार्यवाही करावी.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, शासनाच्या २ मे २०१७ रोजीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुतळा उभारणीसाठी आवश्यक परवानग्या, ना हरकत प्रमाणपत्रे तसेच संबंधित कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासह बहुउद्देशीय इमारत उभारण्यासाठी सुमारे १३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, या कामाची अंमलबजावणी मीरा-भाईंदर महानगरपालिकेमार्फत सुरू आहे.

DR. B.R. Ambedkar : चवदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या वेळी अंगावर काटा आणणारे बाबासाहेबांचे ‘ते’ शब्द

Web Title: Dr babasaheb ambedkar statue mira road ghodbunder sanjay shirsat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 09:04 PM

Topics:  

  • dr babasaheb amdekar
  • Mira Road
  • Pratap Saranaik
  • Sanjay Shirsat

संबंधित बातम्या

Nagpur News : दीक्षाभूमीवर २४ तास CCTVचा ‘वॉच’; धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या तयारीला मनपा आयुक्तांचा वेग
1

Nagpur News : दीक्षाभूमीवर २४ तास CCTVचा ‘वॉच’; धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या तयारीला मनपा आयुक्तांचा वेग

Pratap Sarnaik : ‘मराठी संवाद भाषा’; अमराठी चालकांनी अभियानात सहभागी व्हावे, परिवहनमंत्र्यांचे आवाहन
2

Pratap Sarnaik : ‘मराठी संवाद भाषा’; अमराठी चालकांनी अभियानात सहभागी व्हावे, परिवहनमंत्र्यांचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.