Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Monsoon Health News : पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका वाढला! उल्हासनगरच्या रुग्णालयात एका दिवसात आठ जण दाखल

पावसाळ्याच्या सुरुवातीलाच सर्पदंशाच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात एका दिवसात तब्बल आठ सर्पदंशग्रस्त दाखल झाल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. जून महिन्यात आतापर्यंत सर्पदंशाच्या ३२ घटना नोंदवण्यात आल्या आहेत. रुग्णांमध्ये महिला, पुरुष तसेच लहान मुलांचाही समावेश आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 27, 2026 | 04:59 PM
पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका वाढला! उल्हासनगरच्या रुग्णालयात एका दिवसात आठ जण दाखल (फोटो सौजन्य-ChatGPT)

पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका वाढला! उल्हासनगरच्या रुग्णालयात एका दिवसात आठ जण दाखल (फोटो सौजन्य-ChatGPT)

Follow Us
Follow Us:
  • पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका वाढला!
  • उल्हासनगरच्या रुग्णालयात एका दिवसात आठ जण दाखल
  • जूनमध्ये ३२ रुग्णांची नोंद, डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा इशारा
 

Ulhasnagar Central Hospital : पावसाळ्याच्या सुरुवातीलाच सर्पदंशाच्या वाढत्या घटनांनी आरोग्य यंत्रणेची चिंता वाढवली आहे. उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात अवघ्या एका दिवसात तब्बल आठ सर्पदंशग्रस्त उपचारासाठी दाखल झाल्याने प्रशासन आणि आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. विशेष म्हणजे, यापैकी काही रुग्णांना विषारी सापांनी दंश केला होता. मात्र, वेळेत वैद्यकीय उपचार मिळाल्याने सर्व रुग्णांचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना यश आले आहे.

रुग्णालयात दाखल झालेल्या आठ रुग्णांमध्ये तीन महिला, तीन पुरुष तसेच चार वर्षांची मुलगी आणि आठ वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. महिला रुग्ण वांगणी, अंबरनाथ आणि उल्हासनगर कॅम्प क्रमांक पाच येथील आहेत, तर पुरुष रुग्ण कर्जत, टिटवाळा आणि मुरबाड येथील असल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही बालके उल्हासनगरमधील आहेत. जून महिन्यात आतापर्यंत सर्पदंशाच्या एकूण ३२ घटना नोंदवण्यात आल्या असून, पावसाळ्यात सापांची बिळे पाण्याने भरल्यामुळे ते मानवी वस्त्यांकडे वळत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे ग्रामीण भागासह शहरी भागातही सर्पदंशाचा धोका वाढला आहे.

संजय दिना पाटील यांच्या कथित धमकीप्रकरणी पत्रकार संघ आक्रमक; कोरेगावात निषेध, पोलिसांकडे कारवाईची मागणी

डॉक्टरांनी नागरिकांना महत्त्वाचा इशारा देत सर्पदंश झाल्यानंतर कोणतेही घरगुती उपाय, झाडफूक किंवा अंधश्रद्धेचा आधार घेऊ नये, असे आवाहन केले आहे. साप चावल्यास संबंधित व्यक्तीला शांत ठेवून जखमेच्या भागाची हालचाल कमी करावी आणि तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करावे. योग्य वेळी उपचार आणि अँटी-स्नेक व्हेनम मिळाल्यास अनेक रुग्णांचे प्राण वाचू शकतात, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. सर्पदंशाच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांनी विशेष सावधगिरी बाळगण्याची गरज निर्माण झाली असून, घराच्या परिसरातील झुडपे, साचलेले पाणी आणि अंधाऱ्या जागांची नियमित स्वच्छता ठेवण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

सर्पदंश टाळण्यासाठी आणि साप चावल्यास कशी घ्यावी काळजी?

पावसाळ्यात घराच्या परिसरातील झुडपे, गवत आणि कचरा नियमित साफ ठेवा.

रात्री घराबाहेर जाताना टॉर्चचा वापर करा.

शेतात, बागेत किंवा पाणथळ भागात काम करताना बूट आणि पूर्ण कपडे घाला.

घराच्या आजूबाजूला उंदरांचा वावर कमी ठेवा, कारण उंदरांच्या मागे साप वस्तीत येतात.

जमिनीवर किंवा उघड्यावर झोपणे टाळा.

लाकूड, दगड किंवा कचऱ्याचे ढीग हाताळताना विशेष काळजी घ्या.

साप चावल्यास काय करावे?

घाबरून जाऊ नका आणि रुग्णाला शांत ठेवा.

चावलेल्या अवयवाची हालचाल शक्य तितकी कमी करा.

रुग्णाला तातडीने जवळच्या रुग्णालयात घेऊन जा.

शक्य असल्यास सापाचा रंग किंवा स्वरूप लक्षात ठेवा; मात्र साप पकडण्याचा प्रयत्न करू नका.

रुग्णाला आडवे झोपवून धीर द्या.

काय करू नये?

जखमेवर चिरा मारू नका.

विष शोषून काढण्याचा प्रयत्न करू नका.

जखमेवर घट्ट दोरी किंवा कपडा बांधू नका.

हळद, माती, औषधी पाने किंवा इतर घरगुती उपाय करू नका.

झाडफूक, मंत्रतंत्र किंवा अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका.

डॉक्टरांच्या मते, सर्पदंशानंतर पहिल्या काही तासांत योग्य वैद्यकीय उपचार मिळाल्यास रुग्णाचे प्राण वाचण्याची शक्यता खूप वाढते. त्यामुळे साप चावल्यास विलंब न करता तातडीने रुग्णालय गाठणे हाच सर्वात सुरक्षित उपाय आहे.

१५ वर्षीय मुलगी आणि ७ वर्षीय चिमुरडीवरील अत्याचाराने हादरले कल्याण; महिलांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र पोलीस चौकीची मागणी

Web Title: Eight snakebite cases in one day at ulhasnagar central hospital doctors issue important warning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 04:59 PM

Topics:  

  • Hospital
  • Monsoon
  • Ulhasnagar

संबंधित बातम्या

JP Nadda Health Update: केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा AIIMS मध्ये दाखल; कोरोनरी अँजिओग्राफीसह विविध तपासण्या
1

JP Nadda Health Update: केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा AIIMS मध्ये दाखल; कोरोनरी अँजिओग्राफीसह विविध तपासण्या

KDMC News: शास्त्रीनगर रुग्णालयात धक्कादायक प्रकार; अल्पवयीन मुलीचा प्रेग्नन्सी रिपोर्ट पॉझिटिव्ह, बाहेरील टेस्ट मात्र निगेटिव्ह
2

KDMC News: शास्त्रीनगर रुग्णालयात धक्कादायक प्रकार; अल्पवयीन मुलीचा प्रेग्नन्सी रिपोर्ट पॉझिटिव्ह, बाहेरील टेस्ट मात्र निगेटिव्ह

Lilavati Hospital : मुंबईतील प्रसिद्ध लीलावती हॉस्पिटल आता परदेशात! कझाकस्तानमध्ये सुरू करणार रुग्णसेवा; काय आहे प्लॅनिंग?
3

Lilavati Hospital : मुंबईतील प्रसिद्ध लीलावती हॉस्पिटल आता परदेशात! कझाकस्तानमध्ये सुरू करणार रुग्णसेवा; काय आहे प्लॅनिंग?

Surya Hospital: पालकांनो सावधान! खेळण्यात दडला जीवघेणा धोका, २ वर्षांच्या चिमुकल्याने गिळले शक्तिशाली चुंबक; आतड्यांना पडली छिद्रे
4

Surya Hospital: पालकांनो सावधान! खेळण्यात दडला जीवघेणा धोका, २ वर्षांच्या चिमुकल्याने गिळले शक्तिशाली चुंबक; आतड्यांना पडली छिद्रे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.