Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News : अपघाताला बसणार आळा? सिग्लनजवळ रम्बलर पट्ट्यांचा प्रायोगिक तत्त्वावर होणार वापर

वाढते अपघात पाहात ठाण्यात एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. घोडबंदर रोडवरील पाच वाहतूक सिग्नलजवळ प्रायोगिक तत्त्वावर रम्बलर बसविण्याचे काम करण्यात येणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 25, 2025 | 03:43 PM
अपघाताला बसणार आळा? सिग्लनजवळ रम्बलर पट्ट्यांचा प्रायोगिक तत्त्वावर होणार वापर (फोटो सौजन्य-X)

अपघाताला बसणार आळा? सिग्लनजवळ रम्बलर पट्ट्यांचा प्रायोगिक तत्त्वावर होणार वापर (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

ठाणे : घोडबंदर रोडवरील पाच वाहतूक सिग्नलजवळ प्रायोगिक तत्त्वावर रम्बलर (वेग नियंत्रक पट्ट्या) लावण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. हा प्रयोग यशस्वी झाल्यास घोडबंदर रोडवरील सर्वच सिग्नलजवळ त्यांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे अपघात टाळण्यासाठी सिग्नलजवळ वाहनांचा वेग कमी करून अवजड वाहने नियंत्रित करण्याची आवश्यकता असल्याचे मत जस्टिस फॉर घोडबंदर रोडच्या प्रतिनिधींनी बैठकीत मांडले. या सूचनेचा अवलंब करण्यासाठी महापालिकेचा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वाहतूक पोलीस यांनी संयुक्तपणे पाच ठिकाणांची निवड करावी. तेथे प्रायोगिक तत्त्वावर ही व्यवस्था करावी, असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले. हा प्रयोग करताना वाहन चालकांना दिसेल अशा पद्धतीने त्याचा इशारा देणारी पाटी, रिफ्लेक्टर्स आदी गोष्टी शास्त्रशुद्ध पद्धतीने कराव्यात. इंडियन रोड कॉंग्रेसने निर्धारित केलेल्या सर्व मार्गदर्शक नियमांचे पालन करावे, असेही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.

जलशुद्धीकरण केंद्रातील पंपांची दुरुस्ती करा, विश्वनाथ भोईर यांची केडीएमसी आयुक्तांकडे मागणी

घोडबंदर रस्ता आणि परिसरातील नागरी कामांविषयी चर्चा करण्यासाठी जस्टिस फॉर घोडबंदर रोडच्या प्रतिनिधींसोबत बैठकीचे आयोजन महापालिका आयुक्त कार्यालय येथे मंगळवारी (२४ जून) करण्यात आले होते. आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, नगर रचना सहाय्यक संचालक संग्राम कानडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे, पोलीस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट, उपनगर अभियंता विकास ढोले, सुधीर गायकवाड, शुभांगी केसवानी, घोडबंदर रोडचे समन्वय अधिकारी आणि कार्यकारी अभियंता संजय कदम यांच्यासह एमएमआरडीए, मेट्रो यांचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत, वाघबीळ येथील अंतर्गत रस्ता, भाईंदरपाडा आणि साईनगर येथील सेवा रस्त्याची दुरावस्था, रोझा गार्डिनिया येथील प्रस्तावित वाहतूक बेट आदी विषय प्रतिनिधींनी मांडले. त्यावर, कालबद्ध कार्यक्रम घेऊन पूर्तता करण्याचे निर्देश आयुक्त राव यांनी संबंधित विभागांना दिले. तसेच, रस्त्यावरील राडा रोडा, वायरी, अनावश्यक बॅरिकेड्स आदी काढून टाकरण्यासाठी महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, मेट्रो आणि एमएमआरडीए यांनी संयुक्तपणे सर्वंकष स्वच्छता मोहीम (डीप क्लिन ड्राईव्ह) घ्यावी,असेही आयुक्त राव यांनी सांगितले.

घनकचरा समस्या, लोकसहभागाची आवश्यकता

गायमुख आणि परिसरातील कचऱ्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी बहुपर्यायी उपाययोजना करण्याची आवश्यकता प्रतिनिधींनी व्यक्त केली. तसेच, काही मोठ्या गृहसंकुलांनी छोटेखानी कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्याची तयारी दर्शवल्याचेही या प्रतिनिधींनी सांगितले. घनकचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी व्यापक लोकसहभागाची आवश्यकता असून त्यासाठी महापालिका प्रयत्न करीत आहे, असे आयुक्त राव यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच, ज्या गृहसंकुलांनी घनकचरा व्यवस्थापनात रस दाखवला आहे, त्यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्याकडे बैठक आयोजित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

रिक्षा स्टॅण्डसाठी संयुक्त सर्वेक्षण

ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व रिक्षा थांब्यांचे वाहतूक पोलीस, परिवहन विभाग आणि महापालिका यांच्यामार्फत संयुक्त पाहणी करण्याचे या बैठकीत ठरले. रिक्षा थांब्यांच्या जागा निश्चित करून त्यांचे नियमन करण्यात येईल, असे पोलीस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट यांनी सांगितले.

भाजपच्या मंडळींना आणीबाणीवर बोलण्याचा काय अधिकार? भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये जुंपली

Web Title: Experimental use of rambler straps will be done near siglan as instructed by municipal commissioner saurabh rao

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2025 | 03:43 PM

Topics:  

  • thane
  • Thane news
  • TMC

संबंधित बातम्या

दहशतवाद ठेचलाच पाहिजे! गणेशोत्सवानिमित्त ठाण्यात देशभक्तीचा उत्साह वाढवणाऱ्या देखाव्याची जोरदार चर्चा
1

दहशतवाद ठेचलाच पाहिजे! गणेशोत्सवानिमित्त ठाण्यात देशभक्तीचा उत्साह वाढवणाऱ्या देखाव्याची जोरदार चर्चा

Thane News : ” …तर सोमवारपासून अर्धनग्न बेमुदत उपोषण”; महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचा इशारा
2

Thane News : ” …तर सोमवारपासून अर्धनग्न बेमुदत उपोषण”; महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचा इशारा

Kalyan News : 22 तास वीज खंडित; संतप्त व्यापाऱ्यांचा महावितरणविरोधात आंदोलन
3

Kalyan News : 22 तास वीज खंडित; संतप्त व्यापाऱ्यांचा महावितरणविरोधात आंदोलन

ठाणे महानगरपालिकेच्या भरतीत मुदतवाढ! अर्ज कर्त्यांनो, वाढ्त्या मुदतीचा घ्या फायदा
4

ठाणे महानगरपालिकेच्या भरतीत मुदतवाढ! अर्ज कर्त्यांनो, वाढ्त्या मुदतीचा घ्या फायदा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.