Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ठाणे-मुलुंड दरम्यान नव्या स्थानकाला मिळणार ‘आनंद दिघे’ नाव; पालिकेचा ठराव एकमताने मंजूर

ठाणे-मुलुंड दरम्यान उभारण्यात येणाऱ्या नव्या रेल्वे स्थानकाला ‘आनंद दिघे’ यांचे नाव देण्याचा ठराव ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे ठाणेकरांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाल

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 21, 2026 | 12:14 PM
ठाणे-मुलुंड दरम्यान नव्या स्थानकाला ‘आनंद दिघे’ नाव; पालिकेचा ठराव एकमताने मंजूर

ठाणे-मुलुंड दरम्यान नव्या स्थानकाला ‘आनंद दिघे’ नाव; पालिकेचा ठराव एकमताने मंजूर

Follow Us
Follow Us:
  • ठाणे-मुलुंड दरम्यान नव्या रेल्वे स्थानकाला ‘आनंद दिघे’ नाव देण्याचा ठराव ठाणे महापालिकेत एकमताने मंजूर.
  • स्थानकाचा संपूर्ण खर्च रेल्वे उचलणार असून त्यामुळे ठाणे स्थानकावरील ताण कमी होणार.
  • नवीन स्थानकामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार असून वाहतूक व्यवस्था अधिक सुकर होणार.
मध्य रेल्वेच्या ठाणे-मुलुंड दरम्यान उभारण्यात येणाऱ्या नव्या रेल्वे स्थानकाला ‘आनंद दिघे यांचे नाव देण्याबावतचा अभिनंदनाचा ठराव बुधवारी झालेल्या ठाणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आला. ठाणे-मुलुंड दरम्यान वाढत्या प्रवासी संख्येच्या पार्श्वभूमीवर नवीन स्थानक उभारण्याचा निर्णय मध्य रेल्वेकडून घेण्यात आला आहे. या स्थानकासाठी येणारा संपूर्ण खर्च रेल्वे करणार असून या नव्या स्थानकामुळे ठाणे रेल्वे स्थानकावरील ताण कमी होऊन प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. नवीन ठाणे स्थानकासाठी २५० कोटींच्या वर खर्च येणार होता. स्मार्टसिटी बरोबर जो करार झाला होता त्यामध्ये सदरचा खर्च ठाणे महानगरपालिका आणि काम रेल्वे करणार असे ठरले होते, परंतु या कामाच्या मंजुरीला विलंब लागल्याने हा खर्च वाढला होता, यासाठी रेल्वे सातत्याने खर्चाची मागणी करत होते.

KDMC News: कल्याण लोकसभेचे श्रीकांत शिंदे यांचा नागरी सत्कार होणार, महापालिकेच्या महासभेत सर्वानुमते ठराव मंजूर

रेल्वेमंत्र्यांनी नवीन स्थानकाच्या खर्चास दिली मान्यता

यावर खासदार श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के यांनी रेल्वेमंत्र्यांना भेटून सदरचा खर्च रेल्वेने करावा याबाबत पाठपुरावा केला, कोविडनंतर ठाणे महानगरपालिकेची आर्थिक स्थिती बिकट झाल्याने हा खर्च रेल्वेने करावा अशी सातत्याची मागणी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली, याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील रेल्वे मंत्र्यांशी चर्चा केली. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या संदर्भात अनेक बैठका दिल्लीमध्ये घेतल्या तसेच खासदार श्रीकांत शिंदे व नरेश म्हस्के यांनी देखील वारंवार संसदेत ही मागणी केली, यानंतर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हा खर्च रेल्वे करेल असे मान्य केले, याबाबत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बोलवून देखील ही बाब सांगितली व तसा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी सादर केला असल्याचे सांगितले.

उपमुख्यमंत्री, खासदारांच्या अभिनंदनाचा ठराव

याबाबत खासदार श्रीकांत शिंदे व नरेश म्हस्के तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा करून ठाणे महानगरपालिकेवरील आर्थिक बोजा कमी केला, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के यांच्या अभिनंदनाचा ठराव बुधवारी झालेल्या महासभेत मांडण्यात आला व तो एकमताने मंजूर करण्यात आला.
या नवीन रेल्वे स्थानकाला धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव द्यावे अशी मागणी नरेश म्हस्के यांनी संसदेच्या सभागृहात केली, याबाबत ठराव महासभेत मांडण्यात आला आणि तो मंजूर करण्यात आला.

KDMC News : अनधिकृत नळजोडण्यांमुळे पाणी मिळेना; MIDCचा पाणी बिलावर ‘डिपॉझिट’ धक्का!

नवीन स्थानकामुळे वाहतूक व्यवस्था सुकर

आनंद दिघे यांनी ठाणे शहराच्या सामाजिक, राजकीय आणि विकासात्मक क्षेत्रात केलेले योगदान लक्षात घेता, त्यांच्या नावाने स्थानकाचे नामकरण करणे ही ठाणेकरांसाठी अभिमानाची बाब असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. या निर्णयामुळे ठाणे-मुलुंड परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, नवीन स्थानकामुळे वाहतूक व्यवस्था अधिक सुकर होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Hane municipal corporation approves anand dighe name for new thane mulund station

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 12:13 PM

Topics:  

  • Anand Dighe
  • Indian Railway
  • Thane news
  • thane railway station

संबंधित बातम्या

Thane News: मंगळुरू एक्सप्रेसमधून दारूची तस्करी; रेल्वे अटेंडंटकडून ७१ हजारांचा मद्यसाठा जप्त
1

Thane News: मंगळुरू एक्सप्रेसमधून दारूची तस्करी; रेल्वे अटेंडंटकडून ७१ हजारांचा मद्यसाठा जप्त

Bhiwandi News : ‘माझ्या मुलाला फाशी झाली पाहिजे’; भिवंडी प्रकरणातील आरोपी बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटीलच्या आईचा गंभीर आरोप
2

Bhiwandi News : ‘माझ्या मुलाला फाशी झाली पाहिजे’; भिवंडी प्रकरणातील आरोपी बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटीलच्या आईचा गंभीर आरोप

Thane Ring Metro: ठाणे रिंग मेट्रो थेट मुंबई, भिवंडी आणि कल्याणला जोडली जाणार; प्रवास होणार वेगवान
3

Thane Ring Metro: ठाणे रिंग मेट्रो थेट मुंबई, भिवंडी आणि कल्याणला जोडली जाणार; प्रवास होणार वेगवान

KDMC News : प्रसूतीदरम्यान नवजात बाळाचा मृत्यू; KDMCची मोठी कारवाई, RMO डॉक्टरला कामावरून हटवलं!
4

KDMC News : प्रसूतीदरम्यान नवजात बाळाचा मृत्यू; KDMCची मोठी कारवाई, RMO डॉक्टरला कामावरून हटवलं!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.