जलशुद्धीकरण केंद्रातील पंपांची दुरुस्ती करा, विश्वनाथ भोईर यांची केडीएमसी आयुक्तांकडे मागणी
कल्याण : पाणीपुरवठा प्रकल्पाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे जसशुद्धीकरण केंद्र असते. निसर्गात उपलब्ध असलेल्या पाण्यावर योग्य प्रक्रिया करून ते वापरण्यालायक करण्याचे मुख्य काम येथे केले जाते. घरगुती वापर, औद्योगिक वापर इत्यादींसाठी आवश्यक असलेली पाण्याची शुद्धता येथे उत्पन्न करून ती सातत्याने राखली गेल्यामुळे नागरिकांचे आरोग्य, औद्योगिक प्रत उच्च दर्जाची रहाते. हीच बाब लक्षात घेऊन कल्याणमधील जलशुद्धीकरण केंद्रातील पंपांची दुरुस्ती करा, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडे केली आहे .
जलशुद्धीकरण केंद्रातील पंप जुने झाले आहेत. त्यामुळे नागरीकांना कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. त्याचा त्रास नागरीकांना सहन करावा लागतो. हे पंप दुरुस्त करण्यात यावे अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडे केली आहे. आमदार भोईर यांनी आज (25 जून) आयुक्त गोयल यांची भेट घेतली. आयुक्तांनी पंप दुरुस्ती टप्प्या टप्प्याने केली जाईल असे आश्वासन आमदार भोईर यांना दिले आहे. याशिवाय वारकरी भवनासाठी जागा आरक्षित आहे. या वारकरी भवनासाठी सगळ्या वारकऱ्यांनी एकत्रित यावे असे आवाहन आमदार भोईर यांनी केली आहे. या प्रश्नावरही आमदार भोईर यांनी आयुक्तांशी चर्चा केली. त्याचबरोबर कल्याण स्टेशन परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाची जागा स्मार्ट सिटी प्रकल्पात बाधित झाली आहे. बाधित जागा प्रकल्पाच्या रस्ते रुंदीकरणात गेली आहे. त्यामुळे उद्यानाचा आकार कमी झाला आहे. उद्याानाच्या जागे प्रकरणी लवादाकडे प्रकरण प्रलंबित आहे. त्याचा निकाल लागताच हा प्रश्नही निकाली निघणार असल्याचे आमदार भोईर यांनी सांगितले आहे.
१) शुद्धीकरण करणाऱ्या प्रत्येक यंत्रणेची सविस्तर माहिती त्याच्या रेखाचित्रांसह उपलब्ध असणे,
२) ही यंत्रणा चालविण्यासाठी आणि तिची देखभाल, दुरुस्ती इत्यादी करण्यासाठी पाळण्याच्या सविस्तर सूचना,
३) केंद्रामधील सर्व पाईप्स, व्हॉल्व्ह आणि इतर यंत्रणा तसेच पाणी वाहून नेणाऱ्या नाल्याची पूर्ण माहिती रेखाचित्रांसह,
४) दैनंदिन कामाचा (प्रत्येक कर्मचाऱ्याच्या) तपशील,
५) यंत्रणेची पहाणी करण्याचे आणि देखभालीचे वेळापत्रक,
६) केलेल्या कामाची सविस्तर नोंद,
७) वापरलेल्या रसायनांची आणि विजेच्या वापराची नोंद,
८) प्रयोगशाळेमधील उपकरणे, रसायने इत्यादींची यादी,
९) पाण्याचे नमुने घेऊन त्याचे पृथःकरण करण्याचे वेळापत्रक,
१०) केलेल्या पृथःकरणाची सविस्तर नोंद आणि त्याचे निष्कर्ष,
११) केंद्रामधील सुरक्षिततेचे नियम आणि त्यांची अंमलबजावणी इत्यादी.,
१२) केंद्राच्या कामाचे मासिक, त्रैमासिक आणि वार्षिक अहवाल,
१३) केंद्रातील प्रत्येक कर्मचाऱ्याचे प्रशिक्षण… यासारख्या गोष्टी उपलब्ध असणं आवश्यक आहे.