Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dombivli News: आणखी किती जणांचा जीव धोक्यात जाणार? गोग्रासवाडीतील अनधिकृत गोठ्याच्या दलदलीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Dombivli News: गोग्रासवाडी परिसरातील अनधिकृत गोठ्यामुळे निर्माण झालेल्या दलदलीत पुन्हा एक व्यक्ती अडकल्याची घटना समोर आली आहे. वारंवार अशा घटना घडत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, संबंधित अनधिकृत गोठ्यावर महापालिका प्रशासन ठोस कारवाई कधी करणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 02, 2026 | 04:13 PM
आणखी किती जणांचा जीव धोक्यात जाणार? गोग्रासवाडीतील अनधिकृत गोठ्याच्या दलदलीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

आणखी किती जणांचा जीव धोक्यात जाणार? गोग्रासवाडीतील अनधिकृत गोठ्याच्या दलदलीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Follow Us
Follow Us:
  • गोग्रासवाडीतील अनधिकृत गोठ्याच्या दलदलीत पुन्हा एक व्यक्ती अडकला
  • महापालिका प्रशासनावर प्रश्नचिन्ह
  • गोग्रासवाडीत पुन्हा धक्कादायक प्रकार!
Dombivli News: डोंबिवलीतील गोग्रासवाडी परिसरातील अनधिकृत गोठ्यामुळे निर्माण झालेली दलदल आणि अस्वच्छतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात याच परिसरात एका शाळकरी मुलीच्या अंगावर बैल धावून आल्याने ती घाबरून पळत असताना अनेक वर्षांपासून साचलेल्या शेणाच्या दलदलीत अडकली होती. त्यावेळी स्थानिक नागरिकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून तिला सुखरूप बाहेर काढले होते. आता पुन्हा एकदा याच दलदलीत एक व्यक्ती अडकल्याची घटना घडली आहे.

मग महापालिका प्रशासन आणखी किती गंभीर घटनांची वाट पाहत आहे?

गोग्रासवाडी परिसरात अनेक वर्षांपासून एक अनधिकृत गोठा सुरू आहे. या गोठ्यामध्ये स्वच्छतेचे कोणतेही निकष पाळले जात नसल्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी आणि अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे. अनेक वर्षांपासून साचलेल्या शेणामुळे येथे मोठ्या प्रमाणात दलदल तयार झाली आहे. या परिस्थितीचा त्रास परिसरातील नागरिकांना सातत्याने सहन करावा लागत आहे.

Nagpur News : ३ दिवसांत DRIच्या दोन धडक कारवाया; बिबट्याच्या कातडी तस्करीसह अॅम्फेटामाइन रॅकेटचा पर्दाफाश

विशेष म्हणजे, या गोठ्याच्या आसपासच प्राचीन कृष्ण मंदिर, पंचमुखी व दक्षिणमुखी मारुती मंदिर, मोठे जैन मंदिर आणि प्रकाश विद्यालय आहे. त्यामुळे या परिसरात दररोज शेकडो विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची वर्दळ असते. अशा वर्दळीच्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आणि दलदल असणे ही अत्यंत गंभीर बाब आहे.

आरोग्याचा प्रश्नही तितकाच गंभीर!

या गोठ्यातील अस्वच्छतेमुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा प्रश्न वारंवार उपस्थित करूनही महापालिका प्रशासनाकडून केवळ तात्पुरती कारवाई केली जाते. गेल्या वर्षी शाळकरी मुलगी दलदलीत अडकल्यानंतरही अशाच प्रकारची तात्पुरती कारवाई करण्यात आली होती. मात्र, काही दिवसांतच परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’ झाली.

गोमातेच्या नावाखाली सुरू असलेल्या या अनधिकृत व्यवसायावर कारवाई कधी?

या गोठ्यातील अनेक गायी सकाळच्या वेळी वेगवेगळ्या व्यक्तींकडून मंदिर परिसरात आणल्या जातात. तेथे गोमातेचे दर्शन घेण्यासाठी येणारे भाविक गाईंना चारा खाऊ घालतात. त्यानंतर दुपारनंतर या गायी पुन्हा गोठ्यात आणल्या जातात. या व्यवहारातून आर्थिक फायदा मिळवला जात असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळत आहे. या गायींची देखभाल आणि स्वच्छतेबाबत मात्र कोणतीही योग्य व्यवस्था दिसून येत नाही.

गायी पाळण्याला, वासरे ठेवण्याला किंवा गोशाळा चालवण्याला कोणाचाही विरोध नाही. मात्र, त्यासाठी आवश्यक स्वच्छता, आरोग्यविषयक नियम आणि नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. गोमातेच्या सेवेमागे नागरिकांच्या आरोग्याची आणि सुरक्षिततेची पायमल्ली होणे कदापि योग्य नाही.

पितृपक्षात भाविकांची मोठी गर्दी; मात्र दलदलीचा धोका कायम!

सध्या पितृपक्ष सुरू असून हिंदू धर्मीय नागरिक मोठ्या श्रद्धेने आपल्या पितरांच्या स्मरणार्थ गाईंना चारा खाऊ घालण्यासाठी या परिसरात येत आहेत. मात्र, या ठिकाणी असलेल्या दलदलीचा अंदाज न आल्यामुळे भाविकांनाही धोका निर्माण होत आहे. पुन्हा एखादी गंभीर दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार?

महापालिका प्रशासनाला काही थेट प्रश्न!

१. वारंवार तक्रारी करूनही या अनधिकृत गोठ्यावर कायमस्वरूपी कारवाई का केली जात नाही?

२. गेल्या वर्षी एका शाळकरी मुलीच्या जीवाला धोका निर्माण झाला, तरीही प्रशासनाने ठोस पावले का उचलली नाहीत?

३. आता पुन्हा एक व्यक्ती दलदलीत अडकण्याची घटना घडल्यानंतरही प्रशासन आणखी किती काळ निष्क्रिय राहणार?

४. या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची आणि सुरक्षिततेची जबाबदारी कोणाची?

५. या अनधिकृत गोठ्यातील जनावरांचे योग्य ठिकाणी स्थलांतर करून परिसर स्वच्छ करण्याची कारवाई कधी होणार?

विशेष म्हणजे, गोग्रासवाडी गोशाळेचा स्वतःच्या मालकीचा अधिकृत गोठा असून तेथे जनावरांची योग्य प्रकारे देखभाल केली जाते. त्या गोठ्यामुळे परिसरातील नागरिकांना कोणताही त्रास होत नाही. मग या अनधिकृत गोठ्याबाबतच प्रशासनाकडून ठोस कारवाई का केली जात नाही?

महापालिका प्रशासनाने आता तरी डोळे उघडावेत!

गोग्रासवाडी परिसरातील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून या समस्येचा सामना करत आहेत. वारंवार तक्रारी करूनही केवळ तात्पुरती मलमपट्टी केली जात असेल, तर त्याचा काहीही उपयोग नाही. आता या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची वेळ आली आहे.

या अनधिकृत गोठ्यातील जनावरांचे योग्य ठिकाणी स्थलांतर करावे, परिसरातील दलदल पूर्णपणे साफ करावी आणि नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

गेल्या वर्षी एका शाळकरी मुलीचा जीव धोक्यात आला आणि आता पुन्हा एका व्यक्तीला या दलदलीचा सामना करावा लागला. आणखी एखाद्याचा जीव गेल्यानंतरच महापालिका प्रशासन जागे होणार आहे का?

हा प्रश्न आज गोग्रासवाडीतील प्रत्येक नागरिक विचारत आहे. या गंभीर समस्येची जबाबदारी निश्चित करून तातडीने कायमस्वरूपी कारवाई करणे ही महापालिका प्रशासनाची जबाबदारी आहे.

कोल्हापुरात धक्कादायक प्रकार; अडीच कोटी दिल्यानंतरही पैशांची मागणी, दोन वर्षांच्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न

Web Title: Gograswadi illegal cowshed swamp man trapped again civic administration under question

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2026 | 04:13 PM

Topics:  

  • Dombivli
  • KDMC
  • maharashtra

संबंधित बातम्या

ST Bus News: एसटी प्रवाशांसाठी गुड न्यूज! ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ पास आता घरबसल्या ऑनलाइन
1

ST Bus News: एसटी प्रवाशांसाठी गुड न्यूज! ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ पास आता घरबसल्या ऑनलाइन

Farmers Protest: ‘आमच्या हक्काचे पैसे द्या’; 21 कोटींचे ऊस बिल थकीत; शेतकरी आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंंदोलन
2

Farmers Protest: ‘आमच्या हक्काचे पैसे द्या’; 21 कोटींचे ऊस बिल थकीत; शेतकरी आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंंदोलन

Maharashtra Drought 2026: दुष्काळाचा आणखी एक बळी! 34 वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या; मृतदेह थेट जिल्हाधिकारी कार्यालयात
3

Maharashtra Drought 2026: दुष्काळाचा आणखी एक बळी! 34 वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या; मृतदेह थेट जिल्हाधिकारी कार्यालयात

Pune : पुणे जिल्ह्यातील ८ तालुक्यांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा; शेती कर्जवसुलीला स्थगिती
4

Pune : पुणे जिल्ह्यातील ८ तालुक्यांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा; शेती कर्जवसुलीला स्थगिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.