Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 27 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Road News: मीरा रोडच्या पूनम सागर सोसायटीत घोणस सापाची एंट्री; रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण

मीरा रोड परिसरातील पूनम सागर सोसायटीच्या C-10, C-11 आणि C-12 इमारतींच्या आवारात शनिवारी रात्री अत्यंत विषारी घोणस (Russell's Viper) साप आढळल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांनी तातडीने अग्निशमन विभाग आणि सर्पमित्रांना माहिती दिल्यानंतर प्रशिक्षित पथकाने सापाचे सुरक्षितपणे रेस्क्यू करून परिसरातील धोका टाळला

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 27, 2026 | 04:26 PM
मीरा रोडच्या पुनम सागर सोसायटीत मध्यरात्री घोणस सापाचा शिरकाव

मीरा रोडच्या पुनम सागर सोसायटीत मध्यरात्री घोणस सापाचा शिरकाव

Follow Us
Follow Us:
  • मीरा रोडच्या पुनम सागर सोसायटीत मध्यरात्री घोणस सापाचा शिरकाव
  • अग्निशमन विभाग व सर्पमित्रांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला
  • सर्पमित्रांनी केले सुरक्षित रेस्क्यू
विजय काते, मीरा रोड : मीरा रोड परिसरातील पुनम सागर सोसायटीच्या C-10, C-11 आणि C-12 इमारतींच्या आवारात शनिवारी रात्री सुमारे 11.35 वाजण्याच्या सुमारास जगातील अत्यंत विषारी सापांपैकी एक असलेला घोणस (Russell’s Viper) आढळून आल्याने संपूर्ण परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. रात्रीच्या वेळी अनेक रहिवासी सोसायटीच्या परिसरात वावरत असताना हा साप दिसून आल्याने नागरिकांची एकच धावपळ उडाली.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सोसायटीच्या आवारात अचानक साप दिसताच नागरिकांनी प्रसंगावधान राखत त्याच्यापासून सुरक्षित अंतर ठेवले आणि तातडीने अग्निशमन विभाग तसेच सर्पमित्रांना माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे कर्मचारी आणि सर्पमित्र काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पोहोचल्यानंतर परिसर सुरक्षित करण्यात आला. त्यानंतर प्रशिक्षित पथकाने अत्यंत सावधगिरीने आणि कौशल्याने घोणस सापाचे रेस्क्यू करून त्याला सुरक्षितपणे पकडले. ही संपूर्ण कारवाई शांततेत आणि कोणालाही इजा न होता पार पडली. साप पकडल्यानंतर सोसायटीतील रहिवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.

Mira Road News: 11 व्या मजल्यावरून टॉवर क्रेन कोसळली; 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू, अनेक वाहनांचा चक्काचूर

घोणस (Russell’s Viper) हा भारतातील ‘बिग फोर’ अर्थात सर्वाधिक विषारी सापांच्या गटातील एक साप मानला जातो. त्याच्या दंशामुळे गंभीर आरोग्यविषयक गुंतागुंत निर्माण होऊ शकते. त्यामुळे अशा सापांचा सामना करताना कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू नये, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, पावसाळ्यात सापांचे नैसर्गिक अधिवास पाण्याने भरल्यामुळे ते सुरक्षित जागेच्या शोधात मानवी वस्तीकडे वळतात. त्यामुळे सोसायट्या, बागा, पार्किंग परिसर, झुडपे तसेच पाण्याचा साठा असलेल्या ठिकाणी साप दिसण्याच्या घटना वाढतात.

या घटनेनंतर नागरिकांनीही अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली आहे. परिसर स्वच्छ ठेवणे, झुडपे वेळोवेळी कापणे, कचरा किंवा अवजड साहित्य साचू न देणे तसेच रात्रीच्या वेळी परिसरात वावरताना टॉर्चचा वापर करणे, अशा उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, अग्निशमन विभाग आणि सर्पमित्रांच्या तत्पर व धाडसी कारवाईमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला असून, सोसायटीतील रहिवाशांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करत आभार व्यक्त केले. नागरिकांनी अशा घटना घडल्यास सापाला पकडण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न न करता तात्काळ अग्निशमन विभाग अथवा प्रशिक्षित सर्पमित्रांना माहिती द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

MIRA BHAYANDAR: काशिमीरा परिसरात पार्किंगच्या वादातून गुंडगिरी; तरुण आणि आईवर जीवघेणा हल्ला

Web Title: Highly venomous russells viper rescued from mira road poonam sagar society

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 04:26 PM

Topics:  

  • maharashtra
  • Mira Road

संबंधित बातम्या

E-Toilet आहे की मृत्यूचा सापळा? माथेरानमध्ये पुन्हा ई-टॉयलेटमध्ये पर्यटक अडकला; ३८.७० लाखांच्या प्रकल्पावर प्रश्नचिन्ह
1

E-Toilet आहे की मृत्यूचा सापळा? माथेरानमध्ये पुन्हा ई-टॉयलेटमध्ये पर्यटक अडकला; ३८.७० लाखांच्या प्रकल्पावर प्रश्नचिन्ह

Maharashtra Farmer Suicide: अजून किती बळी जाणार? कर्जमाफीच्या यादीत नाव नसल्याने शेतकऱ्याची आत्महत्या; हृदयद्रावक घटना
2

Maharashtra Farmer Suicide: अजून किती बळी जाणार? कर्जमाफीच्या यादीत नाव नसल्याने शेतकऱ्याची आत्महत्या; हृदयद्रावक घटना

Mumbai News: घाटकोपर पूर्व-पश्चिम प्रवास सुखकर होणार! कोंडीतूनही होणार सुटका, केबल-स्टेड’ पुलाचे काम वेगाने
3

Mumbai News: घाटकोपर पूर्व-पश्चिम प्रवास सुखकर होणार! कोंडीतूनही होणार सुटका, केबल-स्टेड’ पुलाचे काम वेगाने

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री केंद्रात जाणार का? विचारलेल्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनी एका उत्तरात राजकारण संपवल
4

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री केंद्रात जाणार का? विचारलेल्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनी एका उत्तरात राजकारण संपवल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.