
के. डी. रेसिडेन्सी हॉटेलवर पोलिसांचा छापा; बेकायदा पार्टीप्रकरणी 7 आयोजकांवर गुन्हा
Kalyan News : कल्याणमधील नामांकित के. डी. रेसिडेन्सी हॉटेलमध्ये परवानगीविना आयोजित करण्यात आलेल्या मोठ्या पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला. पार्टी सुरू असताना पोलिसांनी कारवाई करत हॉटेलमध्ये उपस्थित असलेल्या जवळपास 65 तरुण तरुणींना ताब्यात घेतले. काही तरुण करून पळून गेले या प्रकरणात केडी हॉटेलचे मॅनेजर उमेश शेट्टी आयोजक अंश लोखंडे शाहीन खान अंजली सिंग अथर्व गायकर पियुष सोनवणे आणि इतर दोन विरोधात गुन्हा दाखल करून पुढे तपास सुरू केला आहे
हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा पुरवठा करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई केली; मात्र छाप्यादरम्यान पोलिसांना ड्रग्स सापडले नसल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, या पार्टीसाठी दारू पार्टीची आवश्यक परवानगी हॉटेल व्यवस्थापनाकडे नसल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. तसेच अशा प्रकारचा मोठा इव्हेंट आयोजित करण्यासाठीही आवश्यक परवानगी घेण्यात आली नव्हती. तरीदेखील हॉटेल व्यवस्थापनाकडून मोठ्या प्रमाणात पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
या पार्टीमध्ये काही हाय-प्रोफाईल कुटुंबातील तरुणांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी पार्टीतील उपस्थित तरुणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली.
या प्रकरणी पार्टी आयोजित करणाऱ्या 7 आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे आहे. या पार्टीमध्ये ड्रग्स पुरवला गेला आहे का याचा देखील तपास पोलीस करीत आहेत.