Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kalyan News : कल्याणमध्ये खळबळ! सामाजिक कार्यकर्त्यांकडून महिलेसोबत गैरवर्तन? खडकपाडा पोलिसांत गुन्हा; आरोप फेटाळत बदनामीचा दावा

कल्याणमध्ये एका महिलेने सामाजिक कार्यकर्ते सुजित जाधव आणि संकेश शिंदे यांच्यावर मारहाण व गैरवर्तनाचे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस तपास सुरू आहे. दरम्यान, दोन्ही सामाजिक कार्यकर्त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावत बदनामी करण्यासाठी कट रचल्याचा दावा केला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 03, 2026 | 12:50 PM
कल्याणमध्ये खळबळ! सामाजिक कार्यकर्त्यांकडून महिलेसोबत गैरवर्तन? खडकपाडा पोलिसांत गुन्हा; आरोप फेटाळत बदनामीचा दावा

कल्याणमध्ये खळबळ! सामाजिक कार्यकर्त्यांकडून महिलेसोबत गैरवर्तन? खडकपाडा पोलिसांत गुन्हा; आरोप फेटाळत बदनामीचा दावा

Follow Us
Follow Us:
  • कल्याणमध्ये महिलेचा दोन सामाजिक कार्यकर्त्यांवर मारहाण व गैरवर्तनाचा आरोप; गुन्हा दाखल
  • खडकपाडा पोलिसांत गुन्हा; आरोप फेटाळत सामाजिक कार्यकर्त्यांचा बदनामीचा दावा
  • कल्याण प्रकरण गाजले; महिलेचे गंभीर आरोप, सामाजिक कार्यकर्त्यांचे प्रत्यारोप
Kalyan News Marathi : कल्याणमध्ये एका महिलेने दोन सामाजिक कार्यकर्त्यांविरोधात मारहाण आणि गैरवर्तनाचे गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस विविध अंगांनी तपास करत आहेत. दरम्यान, संबंधित सामाजिक कार्यकर्त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावत हे प्रकरण बदनामी करण्यासाठी रचलेला कट असल्याचा दावा केला आहे.

तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार, एका महिलेच्या माध्यमातून तिला एका घरात बोलावण्यात आले. तेथे सामाजिक कार्यकर्ते सुजित जाधव आणि संकेश शिंदे उपस्थित होते. त्याठिकाणी तिचे एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध असल्याचा खोटा आरोप करण्यात आला. त्यानंतर तिच्याशी मारहाण करण्यात आली तसेच गैरवर्तन करण्यात आल्याचा आरोप महिलेने आपल्या तक्रारीत केला आहे. या तक्रारीच्या आधारे खडकपाडा पोलीस ठाण्यात संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस घटनास्थळावरील परिस्थिती, संबंधित व्यक्तींचे जबाब तसेच उपलब्ध पुराव्यांच्या आधारे या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

Kalyan News: मुलांसाठी खाऊ आणायला गेली अन् उघड्या वीजवाहिनीने घेतला जीव; पतीचा पोलिसांवरही गंभीर आरोप

दरम्यान, या प्रकरणातील आरोपी म्हणून नाव असलेले सामाजिक कार्यकर्ते सुजित जाधव यांनी आपल्यावरील सर्व आरोप स्पष्टपणे फेटाळले आहेत. हे आरोप राजकीय हेतूने आणि आपली प्रतिमा मलिन करण्यासाठी करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. पोलिसांनी निष्पक्ष आणि पारदर्शक तपास करावा, आपण तपासात पूर्ण सहकार्य करू आणि न्यायव्यवस्थेवर आपला पूर्ण विश्वास असल्याचेही त्यांनी सांगितले.

याशिवाय, तक्रारीत उल्लेख करण्यात आलेल्या घटनेच्या वेळी संबंधित महिलेचे पतीही घटनास्थळी उपस्थित होते. त्यामुळे महिलेने केलेले आरोप वस्तुस्थितीशी सुसंगत नसल्याचा दावाही सुजित जाधव यांनी केला आहे. या प्रकरणामुळे कल्याणमध्ये चर्चेला उधाण आले असून, महिलेचे आरोप आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा प्रतिवाद यामुळे प्रकरण अधिकच गाजत आहे. या संपूर्ण घटनेमागील सत्य पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

Kalyan Kinnar Mahotsav 2026 : समानता आणि समावेशकतेचा संदेश; कल्याणमध्ये ‘किन्नर महोत्सव 2026’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

Web Title: Kalyan woman alleges assault misconduct against two social workers khadakpada police case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 12:50 PM

Topics:  

  • kalyan
  • KDMC
  • police

संबंधित बातम्या

Kalyan Crime: ‘मी आणि माझी मुले सुरक्षित नाही’; पतीच्या दुसऱ्या लग्नानंतर महिलेचा मानसिक छळ? मुलांसह घरात लॉक करून राहण्याची वेळ
1

Kalyan Crime: ‘मी आणि माझी मुले सुरक्षित नाही’; पतीच्या दुसऱ्या लग्नानंतर महिलेचा मानसिक छळ? मुलांसह घरात लॉक करून राहण्याची वेळ

फुटपाथवर भंगार, हॉटेलच्या शेगड्या; कारवाईनंतर पुन्हा अतिक्रमण! स्टेशन परिसरातील फुटपाथ नेमका नागरिकांसाठी की व्यावसायिकांसाठी?
2

फुटपाथवर भंगार, हॉटेलच्या शेगड्या; कारवाईनंतर पुन्हा अतिक्रमण! स्टेशन परिसरातील फुटपाथ नेमका नागरिकांसाठी की व्यावसायिकांसाठी?

Kalyan Railway Police: धावत्या एक्सप्रेसमध्ये ‘मोबाईल चोर’ सुसाट! तासाभरात 5 महागडे फोन लंपास; आरोपी कल्याणमध्ये जेरबंद
3

Kalyan Railway Police: धावत्या एक्सप्रेसमध्ये ‘मोबाईल चोर’ सुसाट! तासाभरात 5 महागडे फोन लंपास; आरोपी कल्याणमध्ये जेरबंद

KDMC News: १२ वर्षांच्या संघर्षाला अखेर यश! २७ गावांतील ५०० कर्मचाऱ्यांचा केडीएमसी सेवेत समावेश
4

KDMC News: १२ वर्षांच्या संघर्षाला अखेर यश! २७ गावांतील ५०० कर्मचाऱ्यांचा केडीएमसी सेवेत समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.