Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 8 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Heritage: घोडबंदर किल्ल्याचे पावित्र्य धोक्यात? ‘रिल्स’च्या वाढत्या वापरावरून चिंता; कडक सुरक्षेची मागणी

Maharashtra Heritage: ठाणे जिल्ह्यातील ऐतिहासिक घोडबंदर किल्ल्याचा सोशल मीडिया ‘रिल्स’ आणि व्हिडिओ निर्मितीसाठी होत असलेल्या वापराबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व, वास्तूचे पावित्र्य आणि वारसा जपण्यासाठी प्रशासनाने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 08, 2026 | 11:39 AM
घोडबंदर किल्ल्याचे पावित्र्य धोक्यात? ‘रिल्स’च्या वाढत्या वापरावरून चिंता; कडक सुरक्षेची मागणी

घोडबंदर किल्ल्याचे पावित्र्य धोक्यात? ‘रिल्स’च्या वाढत्या वापरावरून चिंता; कडक सुरक्षेची मागणी

Follow Us
Follow Us:
  • घोडबंदर किल्ल्याचा ‘रिल्स’साठी वापर; ऐतिहासिक वारसा जपण्याची मागणी
  • किल्ल्याचे पावित्र्य आणि ऐतिहासिक महत्त्व धोक्यात येत असल्याचा आरोप
  • कडक सुरक्षा व्यवस्थेची मागणी
विजय काते, भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातील ऐतिहासिक घोडबंदर किल्ल्याचा सोशल मीडिया रिल्स आणि व्हिडीओ तयार करण्यासाठी वापर केला जात असल्याने इतिहासप्रेमींमधून नाराजी व्यक्त होत आहे. किल्ल्याच्या ऐतिहासिक वास्तूचे जतन करण्याऐवजी तेथे मनोरंजनाच्या उद्देशाने चित्रीकरण केले जात असल्याने किल्ल्याचे पावित्र्य आणि ऐतिहासिक महत्त्व धोक्यात येत असल्याचा आरोप मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी केला आहे.

घोडबंदर किल्ला हा मीरा-भाईंदर परिसराच्या ऐतिहासिक वारशाचा महत्त्वाचा भाग आहे. या किल्ल्याला भेट देण्यासाठी इतिहासप्रेमी, पर्यटक आणि नागरिक येत असतात. मात्र, अलीकडच्या काळात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रिल्स आणि व्हिडीओ बनविण्यासाठी किल्ल्याचा वापर वाढत असल्याचे देशमुख यांनी म्हटले आहे. काही ठिकाणी शिस्तीचे पालन न करता चित्रीकरण केले जात असल्याने किल्ल्याच्या वास्तूचे नुकसान होण्याची शक्यता असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली.

एफआरपीची चुकीची आकडेवारी देणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करा; साखर आयुक्तांकडे मागणी

गड-किल्ले हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे प्रतीक आहेत. त्यामुळे या वास्तूंकडे केवळ पर्यटनस्थळ म्हणून न पाहता त्यांचे ऐतिहासिक महत्त्व आणि पावित्र्य जपणे आवश्यक आहे, असे देशमुख यांनी सांगितले. किल्ल्याच्या परिसरात रिल्सचे चित्रीकरण, मद्यपान तसेच अन्य शिस्तभंगाच्या घटना घडत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

या पार्श्वभूमीवर मराठी एकीकरण समितीच्या वतीने महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. घोडबंदर किल्ल्याच्या परिसरात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

किल्ला परिसरात नियमित पोलीस गस्त वाढवावी, आवश्यक ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था करावी, तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी देशमुख यांनी केली आहे. किल्ल्याच्या संवर्धनासाठी आवश्यक नियमांची प्रभावी अंमलबजावणी करून नागरिकांमध्ये ऐतिहासिक वारशाबाबत जनजागृती करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

घोडबंदर किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी आणि किल्ल्याचे पावित्र्य, वास्तूचे संरक्षण तसेच ऐतिहासिक वारसा अबाधित राहण्यासाठी तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी केली आहे.

दादर कबुतरखान्याचा कायापालट करण्याची तयारी! ताडपत्रीच्या जागी पारदर्शक ॲक्रेलिक शीट लावणार; हिरवळ विकसित करण्यावर भर

Web Title: Maharashtra heritage ghodbunder fort reels historical heritage preservation security demand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 11:39 AM

Topics:  

  • fort
  • maharashtra
  • thane

संबंधित बातम्या

ST Employees Salary: एसटी कर्मचाऱ्यांचा पगार पुन्हा लांबणीवर; ‘कर्मचाऱ्यांचे संसार वेठीस धरू नका’, ७ तारखेचा पगार आता १० ऑगस्टला?
1

ST Employees Salary: एसटी कर्मचाऱ्यांचा पगार पुन्हा लांबणीवर; ‘कर्मचाऱ्यांचे संसार वेठीस धरू नका’, ७ तारखेचा पगार आता १० ऑगस्टला?

Fasting Food Prices: यंदा श्रावणातील उपवासही महागणार!फळांसह किराणा मालाच्या दरात मोठी वाढ; जाणून घ्या नवे दर
2

Fasting Food Prices: यंदा श्रावणातील उपवासही महागणार!फळांसह किराणा मालाच्या दरात मोठी वाढ; जाणून घ्या नवे दर

Milk Price Hike: दूध दरवाढीचा सर्वसामान्यांच्या खिशाला फटका; गाई-म्हशीचं दूध ‘इतक्या’ रुपयांनी महागलं; 11 ऑगस्टपासून नवे दर लागू
3

Milk Price Hike: दूध दरवाढीचा सर्वसामान्यांच्या खिशाला फटका; गाई-म्हशीचं दूध ‘इतक्या’ रुपयांनी महागलं; 11 ऑगस्टपासून नवे दर लागू

परवाना रद्द करण्याच्या एफडीएच्या कारवाईवर हायकोर्टाची नाराजी; म्हणाले, ‘डास मारण्यासाठी तलवार?’
4

परवाना रद्द करण्याच्या एफडीएच्या कारवाईवर हायकोर्टाची नाराजी; म्हणाले, ‘डास मारण्यासाठी तलवार?’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.