Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Bhavan Mauritius : सातासमुद्रापार मराठी संस्कृतीचा सन्मान; ८ कोटींच्या निधीतून मॉरिशसमध्ये महाराष्ट्र भवन विस्तार

मॉरिशसमधील मोका येथे महाराष्ट्र भवनाच्या विस्तारासाठी पायाभरणी सोहळा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडला. ८ कोटींचा निधी मिळाल्याने मराठी संस्कृतीच्या जतनाला चालना मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 24, 2026 | 04:48 PM
सातासमुद्रापार मराठी संस्कृतीचा सन्मान; ८ कोटींच्या निधीतून मॉरिशसमध्ये महाराष्ट्र भवन विस्तार

सातासमुद्रापार मराठी संस्कृतीचा सन्मान; ८ कोटींच्या निधीतून मॉरिशसमध्ये महाराष्ट्र भवन विस्तार

Follow Us
Follow Us:

महाराष्ट्र आणि मॉरिशस या दोन्ही प्रदेशांमधील मैत्रीचे नाते पिढ्यानपिढ्यांचे असून सातासमुद्रापार राहूनही येथील मराठी जनसमुदायाने आपली सांस्कृतिक नाळ अतिशय अभिमानाने जपली आहे, असे गौरवोद्गार भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मॉरिशस येथे काढले. मॉरिशसमधील मोका येथे महाराष्ट्र भवनाच्या विस्तारित वास्तूचा पायाभरणी सोहळा नुकताच चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. महाराष्ट्राचे मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र भवन वास्तूच्या विस्तारासाठी ८ कोटी रुपयांचा निधी मिळाला असल्याबाबद्दल उपस्थितांनी कृतज्ञता व्यक्त केली.

प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मॉरिशस दौऱ्यात उच्चस्तरीय मान्यवरांच्या भेटीगाठी घेत भारत-मॉरिशस संबंध अधिक दृढ केले. या दौऱ्यात चव्हाण यांनी मॉरिशसचे राष्ट्राध्यक्ष धरमबीर गोखुल यांच्या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीत भारत-मॉरिशस मैत्री, ब्ल्यू इकॉनॉमी, पर्यटन, AI आणि सायबर सुरक्षा यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. “मॉरिशस हा भारताचा लहान भाऊ आहे,” असे सांगत राष्ट्राध्यक्षांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच भारताने दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

Satara News : साताऱ्यात वातावरण तापलं! SP तुषार दोशी यांना बडतर्फ करण्यासाठी शिवसेनेचा मूकमोर्चा

त्याच बरोबर मॉरिशसचे परराष्ट्र मंत्री धनंजय रामफुल, आयटी व इनोव्हेशन मंत्री डॉ. अविनाश रामतोहूल आणि कला व सांस्कृतिक मंत्री महेंद्र गोंदीया यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठका पार पडल्या. डॉ. रामतोहूल यांनी फर्ग्युसन कॉलेजमधील त्यांच्या शिक्षणाच्या आठवणी सांगत कृत्रिम बुद्धिमत्तेवर त्यांनी लिहिलेले पुस्तक भेट दिले. महाराष्ट्रातील रेशनिंग व्यवस्थेत जीपीएस तंत्रज्ञानाद्वारे पारदर्शकता आणण्याच्या निर्णयांचे त्यांनी विशेष कौतुक केले. तसेच मॉरिशसला आफ्रिकेसाठी एआय क्षेत्राचे ‘प्रवेशद्वार’ बनवण्यासाठी भारताचे सहकार्य आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. याचबरोबर सांस्कृतिक देवाण-घेवाण, वाचनालय, जागरी नृत्याचे युनेस्को नामांकन यांसारख्या विषयांवरही सकारात्मक चर्चा झाली.

या दौऱ्याचा विशेष ठळक भाग म्हणजे मोका येथे “महाराष्ट्र भवन” विस्तारित वास्तूचा शिलान्यास सोहळा. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ८ कोटी रुपयांच्या निधीतून उभारल्या जाणाऱ्या या वास्तूमुळे जागतिक स्तरावर मराठी अस्मिता अधिक बळकट होणार आहे. या वास्तूतील सभागृहाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्यास स्थानिक समाजाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशनतर्फे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम, “महा गणेशोत्सव २०२५” निमित्त अनुदान वितरण आणि भारताचे मॉरिशसमधील उच्चायुक्त अनुराग श्रीवास्तव यांच्यासमवेत ‘बिहार फेस्टिव्हल’ला दिलेली भेट या माध्यमातून सातासमुद्रापार भारतीय संस्कृतीचा जागर अधिक बळकट झाला. या सर्व घडामोडींमुळे महाराष्ट्र-मॉरिशस स्नेहबंधाचा नवा अध्याय लिहिला जात असल्याचा ठाम विश्वास व्यक्त करण्यात आला.

मॉरिशसमधील खासदार अर्विन बाबाजी, मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशनचे मुख्य धर्मगुरु गुरुजी संताराम राजू, मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशनचे अध्यक्ष बलराज नारू, मॉरिशस मराठी कल्चरल सेंटर ट्रस्टचे अध्यक्ष धनीराव भिवाजी, मॉरिशसमधील मराठी स्पिकिंग युनियनचे अध्यक्ष भालचंद्र गोविंद अशा अनेक उचचपदस्थ मराठी मंडळींशी दौऱ्याच्या निमित्ताने विविध विषयांवर रविंद्र चव्हाण यांनी चर्चा केली. तसेच मेलरोझ श्री गजानन सरस्वती मंदिर, माँट रोचेस मराठी मित्र मंडळी, विठोबा रखुमाई मराठा मंदिर, डागोटियर मराठी शिव मंदिर, लेसपेरान्स मराठी गणोबा मंदिर, प्रोव्हिडेन्स मराठी मित्र मंडळ आणि पाल्मा मराठी सभा या संस्थांना महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्यावतीने चव्हाण यांनी अनुदानाचे धनादेश सुपूर्द केले.

Mumbai Metro 9 : काशिगाव मेट्रो स्थानक सज्ज, लवकरच मिरा-भाईंदरकरांचा प्रवास होणार आरामदायी

Web Title: Marathi culture honoured abroad maharashtra bhavan expansion mauritius 8 crore

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 04:48 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • india
  • Ravindra Chavan

संबंधित बातम्या

मुंबईची मैदानं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरे मैदानात; फडणवीस सरकारला दाखवलं ‘रेड कार्ड’
1

मुंबईची मैदानं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरे मैदानात; फडणवीस सरकारला दाखवलं ‘रेड कार्ड’

Akshay Kumar Acer: लॅपटॉपपासून AC-वॉशिंग मशीनपर्यंत! ‘House of Acer’साठी अक्षय कुमारचा ब्रँडसोबत हातमिळवणी
2

Akshay Kumar Acer: लॅपटॉपपासून AC-वॉशिंग मशीनपर्यंत! ‘House of Acer’साठी अक्षय कुमारचा ब्रँडसोबत हातमिळवणी

ड्रग्जविरोधी लढ्याला बळ! ‘कॅम्पस कनेक्ट’चा शुभारंभ; पोलीस आयुक्त मिलिंद भारंबेंच्या कामगिरीचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक
3

ड्रग्जविरोधी लढ्याला बळ! ‘कॅम्पस कनेक्ट’चा शुभारंभ; पोलीस आयुक्त मिलिंद भारंबेंच्या कामगिरीचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

Devendra Fadnavis: कौशल्य विकासासाठी महाराष्ट्राचे महत्त्वाचे पाऊल; ‘टाटा स्ट्राइव्ह’ ठरणार तरुणांसाठी फायदेशीर
4

Devendra Fadnavis: कौशल्य विकासासाठी महाराष्ट्राचे महत्त्वाचे पाऊल; ‘टाटा स्ट्राइव्ह’ ठरणार तरुणांसाठी फायदेशीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.