Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘महाराष्ट्रात राहायचं असेल तर…’, परप्रांतीय रिक्षाचालकांच्या आंदोलनावरून वाद पेटला; मराठी एकीकरण समितीने दिला थेट इशारा

Marathi Language:परप्रांतीय रिक्षाचालकांच्या आंदोलनावर मराठी एकीकरण समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रात राहून व्यवसाय करायचा असेल तर राज्यातील नियम आणि कायद्यांचे पालन करावे लागेल, असे समितीचे गोवर्धन देशमुख यांनी म्हटले आहे. कायद्याला न जुमानता हुल्लडबाजी केली तर ती सहन केली जाणार नाही...

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 25, 2026 | 12:09 PM
'महाराष्ट्रात राहायचं असेल तर...', परप्रांतीय रिक्षाचालकांच्या आंदोलनावरून वाद पेटला; मराठी एकीकरण समितीने दिला थेट इशारा

'महाराष्ट्रात राहायचं असेल तर...', परप्रांतीय रिक्षाचालकांच्या आंदोलनावरून वाद पेटला; मराठी एकीकरण समितीने दिला थेट इशारा

Follow Us
Follow Us:
  • परप्रांतीय रिक्षाचालकांच्या आंदोलनावर मराठी एकीकरण समिती आक्रमक
  • “कायद्याला न जुमानता हुल्लडबाजी सहन करणार नाही
  • गोवर्धन देशमुखांचा रिक्षाचालकांना इशारा
विजय काते, भाईंदर : महाराष्ट्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊनही काही परप्रांतीयांकडून राज्यातील भाषा आणि नियमांविरोधात उघडपणे आंदोलन व मोर्चे काढले जात असल्याचा आरोप मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख यांनी केला आहे. कायद्याचे उल्लंघन करून रस्ते अडविणे, नागरिकांना वेठीस धरणे आणि हुल्लडबाजी करणाऱ्यांवर पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

मराठी भाषिक मुंबईच्या निर्मितीसाठी १०७ हुतात्म्यांनी बलिदान दिले, मात्र आज याच महाराष्ट्रात मराठी भाषेला विरोध केला जात असल्याचे देशमुख यांनी म्हटले आहे. अशा प्रकारचा विरोध शासनाने गांभीर्याने घेऊन कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.

Maharashtra Politics: ‘… अन्यथा बॅज तीन महिन्यांसाठी निलंबित करणार’; प्रताप सरनाईकांचा इशारा

परिवहन विभागाने मराठी भाषेच्या ज्ञानासंदर्भात असलेल्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी मागणीही समितीने केली आहे. संबंधित नियम अस्तित्वात असतानाही परवाने आणि लायसन्स देताना त्याची योग्य पडताळणी झाली का, याची चौकशी करण्याची गरज असल्याचे देशमुख यांनी म्हटले.

दरम्यान, आंदोलनादरम्यान काही रिक्षाचालकांकडून रस्ते अडविणे किंवा नागरिकांना त्रास देण्याचे प्रकार घडले असतील, तर त्यासंदर्भातील व्हिडीओ आणि इतर पुरावे समाजमाध्यमांवर उपलब्ध असल्याचा दावा समितीने केला आहे. पोलिसांनी उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज, व्हिडीओ आणि इतर पुराव्यांच्या आधारे संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

“कायद्याचे आणि शासनाच्या नियमांचे पालन करणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. आंदोलनाच्या नावाखाली नागरिकांना वेठीस धरले किंवा सार्वजनिक व्यवस्था बिघडवली, तर प्रशासनाने कोणतीही कुचराई न करता कारवाई करावी,” अशी भूमिका गोवर्धन देशमुख यांनी व्यक्त केली. मात्र, भाषेच्या प्रश्नावरून कोणत्याही समाजाविरोधात द्वेष किंवा संघर्ष निर्माण होऊ नये, तसेच कायदा हातात घेण्याऐवजी प्रशासनाने कायदेशीर मार्गाने परिस्थिती हाताळावी, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.

Pratap Sarnaik: आता रिक्षा-टॅक्सी चालकांची खैर नाही! मराठी बोलता आली नाही तर परवाना धोक्यात? सरनाईकांचा महत्त्वपूर्ण निर्णय

Web Title: Marathi ekikaran samiti warns migrant auto rickshaw drivers over protest maharashtra rules

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2026 | 12:09 PM

Topics:  

  • maharashtra
  • Marathi Language
  • mira bhayandar

संबंधित बातम्या

मिरा-भाईंदरमध्ये रिक्षाचालकांच्या आंदोलनावर मराठी एकीकरण समिती आक्रमक; ‘महाराष्ट्रात राहायचं असेल तर नियम पाळा’
1

मिरा-भाईंदरमध्ये रिक्षाचालकांच्या आंदोलनावर मराठी एकीकरण समिती आक्रमक; ‘महाराष्ट्रात राहायचं असेल तर नियम पाळा’

समुद्राच्या तळाशी दडलेला इतिहास उलगडणार! विजयदुर्ग, जंजिरासह देशातील ५ ठिकाणी पुरातत्व विभागाची शोधमोहीम
2

समुद्राच्या तळाशी दडलेला इतिहास उलगडणार! विजयदुर्ग, जंजिरासह देशातील ५ ठिकाणी पुरातत्व विभागाची शोधमोहीम

Tukaram Mundhe: आता क्रिकेटच्या मैदानाबाहेर FDAची ‘धडाकेबाज बॅटिंग’! MCAच्या फूड आउटलेट्सवर मुंढेंची कारवाई
3

Tukaram Mundhe: आता क्रिकेटच्या मैदानाबाहेर FDAची ‘धडाकेबाज बॅटिंग’! MCAच्या फूड आउटलेट्सवर मुंढेंची कारवाई

मुबलक साठा असताना अचानक साखरेची दरवाढ का? राजू शेट्टी यांचा हल्लाबोल; 20 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप
4

मुबलक साठा असताना अचानक साखरेची दरवाढ का? राजू शेट्टी यांचा हल्लाबोल; 20 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.