Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Bhayandar Fire Brigade: अग्निशमन दलाच्या मदतीला ‘फायर फायटिंग ड्रोन’; उंच इमारतींतील आगीवर नियंत्रणाचा नवा प्रयोग

Mira Bhayandar Fire Brigade: मिरा-भाईंदर शहरातील उंच इमारतींमध्ये लागणाऱ्या आगीवर जलद आणि प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्यासाठी महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने ड्रोन तंत्रज्ञानाचा अभिनव प्रयोग केला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 22, 2026 | 12:42 PM
अग्निशमन दलाच्या मदतीला ‘फायर फायटिंग ड्रोन’; उंच इमारतींतील आगीवर नियंत्रणाचा नवा प्रयोग

अग्निशमन दलाच्या मदतीला ‘फायर फायटिंग ड्रोन’; उंच इमारतींतील आगीवर नियंत्रणाचा नवा प्रयोग

Follow Us
Follow Us:
  • उंच इमारतींतील आगीवर आता ‘ड्रोन’चा मारा!
  • हाय-राइज इमारतींच्या सुरक्षेसाठी MBMC हायटेक
  • ड्रोनद्वारे आग विझविण्याचे प्रात्यक्षिक
  • उंच इमारतींतील आगीवर नियंत्रणाचा नवा प्रयोग
 

विजय काते, भाईंदर : शहरातील उंच इमारतींमध्ये लागणाऱ्या आगीवर अधिक प्रभावी आणि जलदगतीने नियंत्रण मिळविण्यासाठी मिरा-भाईंदर महानगरपालिका अग्निशमन विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. उंच इमारतींवरील आगी विझविण्यासाठी ड्रोनच्या माध्यमातून अग्निशमन करण्याचे प्रात्यक्षिक अग्निशमन विभागाच्या वतीने सादर करण्यात आले.

या प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून उंच इमारतींच्या अशा ठिकाणी, जिथे पारंपरिक अग्निशमन यंत्रणेद्वारे पोहोचणे आव्हानात्मक ठरते, तेथे ड्रोनच्या सहाय्याने थेट आगीच्या ठिकाणी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्याची कार्यपद्धती दाखविण्यात आली. आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन दलाच्या जवानांचा धोका कमी करण्यासोबतच आगीवर जलद नियंत्रण मिळविण्यासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग होऊ शकतो. या वेळी महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा, अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत, उपायुक्त डॉ. सचिन बांगर आणि मुख्य अग्निशमन अधिकारी डॉ. प्रकाश बोराडे यांच्यासह सर्व सहाय्यक अग्निशमन अधिकारी, केंद्र अधिकारी तसेच अग्निशमन विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Mira Bhayandar News: ‘न्यायालयापेक्षा आमदाराचा आदेश मोठा आहे का?’ उच्च न्यायालयाचा MBMC आयुक्तांना सवाल

आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या दृष्टीने मिरा-भाईंदर अग्निशमन विभागाकडून हा उपक्रम राबविण्यात आला आहे. विशेषतः उंच इमारती, अरुंद जागा किंवा धोकादायक परिस्थितीत लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविताना ड्रोन तंत्रज्ञान भविष्यात अग्निशमन विभागासाठी उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे. या प्रात्यक्षिकामुळे मिरा-भाईंदर शहरातील अग्निशमन व्यवस्थेत आधुनिक तंत्रज्ञानाची भर पडत असून, ‘आग विझविण्यासाठी तंत्रज्ञानाची साथ आणि नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य’ असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला आहे.

पारंपरिक अग्निशमन यंत्रणा सहज पोहोचू शकत नाही अशा उंच मजल्यांपर्यंत ड्रोन पोहोचवून थेट आगीच्या ठिकाणी पाण्याचा मारा करण्याची क्षमता या प्रात्यक्षिकातून दाखविण्यात आली. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत आगीवर वेगाने नियंत्रण मिळविण्यास मदत होण्याबरोबरच अग्निशमन जवानांना पत्करावी लागणारी जोखीम कमी करण्यासाठीही हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरू शकते.

विशेषतः उंच इमारती, अरुंद जागा आणि प्रत्यक्ष पोहोचणे धोकादायक असलेल्या ठिकाणी ड्रोनचा वापर फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन शहराची अग्निशमन यंत्रणा अधिक सक्षम करणे आणि नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे, हा या प्रयोगामागील प्रमुख उद्देश आहे.

Mira Bhayandar BJP: स्वकीयांमुळेच महासभेत भाजपची कोंडी; नगरसेविका निला सोन्स यांची आक्रमक भूमिका चर्चेत

Web Title: Mira bhayandar fire brigade drone technology to control high rise building fires

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2026 | 12:42 PM

Topics:  

  • Drone
  • Fire
  • mira bhayandar

संबंधित बातम्या

Mira Bhayandar News: फेरीवाला ओळखपत्र वाटपाचा अधिकार ठेकेदाराला कोणी दिला? समितीला अंधारात ठेवून कार्डांचे वाटप
1

Mira Bhayandar News: फेरीवाला ओळखपत्र वाटपाचा अधिकार ठेकेदाराला कोणी दिला? समितीला अंधारात ठेवून कार्डांचे वाटप

Ramayana Set Fire: रणबीर कपूरच्या ‘रामायण’च्या सेटवर आग लागल्याने खळबळ; अनेक टीव्ही मालिकांच्या सेटचं नुकसान
2

Ramayana Set Fire: रणबीर कपूरच्या ‘रामायण’च्या सेटवर आग लागल्याने खळबळ; अनेक टीव्ही मालिकांच्या सेटचं नुकसान

Talat Aziz House Fire: गायक तलत अजीज यांच्या घराला भीषण आग; बाथरूमच्या खिडकीतून पत्नीची केली सुटका, ५ जणांवर रुग्णालयात उपचर सुरू
3

Talat Aziz House Fire: गायक तलत अजीज यांच्या घराला भीषण आग; बाथरूमच्या खिडकीतून पत्नीची केली सुटका, ५ जणांवर रुग्णालयात उपचर सुरू

Lotus Navratri Festival: गरब्याचा पास खरेदी करा अन् शेतकऱ्यांना मदत करा! लोटस नवरात्रोत्सवाची अनोखी मोहीम
4

Lotus Navratri Festival: गरब्याचा पास खरेदी करा अन् शेतकऱ्यांना मदत करा! लोटस नवरात्रोत्सवाची अनोखी मोहीम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.