Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MBMC Schools: शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार? शाळांची धक्कादायक आकडेवारी, 9,613 वरून विद्यार्थी संख्या थेट 5,042 वर

MBMC Schools: मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी पटसंख्येत अवघ्या एका वर्षात तब्बल 4,571 विद्यार्थ्यांची घट झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. 2025-26 मध्ये 9,613 असलेली पटसंख्या 2026-27 मध्ये सध्या 5,042 वर आली आहे. शिक्षण विभागाने आधार कार्ड अपलोडिंग आणि यू-डायस ऑनलाइन नोंदींचे कारण दिले असले...

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 09, 2026 | 02:11 PM
शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार? शाळांची धक्कादायक आकडेवारी, 9,613 वरून विद्यार्थी संख्या थेट 5,042 वर; हजारो विद्यार्थ्यांचा हिशोब कुठे?

शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार? शाळांची धक्कादायक आकडेवारी, 9,613 वरून विद्यार्थी संख्या थेट 5,042 वर; हजारो विद्यार्थ्यांचा हिशोब कुठे?

Follow Us
Follow Us:
  • पालिका शाळांची पटसंख्या निम्म्यावर
  • शिक्षण विभागाचा ‘आधार’चा आधार!
  • प्रशासनाच्या कारभारावर संतप्त सवाल
विजय काते, भाईंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या कारभाराचा भोंगळपणा उघड करणारी धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. मागील काही वर्षांपासून सातत्याने वाढणारी पालिका शाळांमधील विद्यार्थी पटसंख्या यंदा अचानक जवळपास निम्म्यावर आल्याने शिक्षण व्यवस्थेचीच पोलखोल झाली आहे. २०२५-२६ मध्ये ९ हजार ६१३ असलेली विद्यार्थी संख्या २०२६-२७ मध्ये सध्या केवळ ५ हजार ४२ वर आली आहे. म्हणजे तब्बल ४ हजार ५७१ विद्यार्थ्यांची नोंद कमी! एवढ्या मोठ्या घसरणीने पालिका प्रशासनाच्या नियोजनावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.(MBMC Schools)

विशेष म्हणजे, गेल्या तीन वर्षांत पटसंख्या सातत्याने वाढत होती. २०२३-२४ मध्ये ८,९४२, २०२४-२५ मध्ये ९,४५४ आणि २०२५-२६ मध्ये ९,६१३ विद्यार्थी पालिका शाळांमध्ये नोंदले गेले. मात्र नव्या शैक्षणिक वर्षात अचानक ही संख्या ५,०४२ वर घसरली. अवघ्या एका वर्षात जवळपास ४७.५ टक्के घट झाल्याने हा केवळ तांत्रिक घोळ आहे की शिक्षण विभागाच्या नियोजनाचा फज्जा, असा सवाल उपस्थित होत आहे.

Pratap Sarnaik: ‘आमदार मोठा की कायदा?’ बेकायदा बांधकामांवरून प्रताप सरनाईकांचा नरेंद्र मेहतांवर निशाणा

हजारो विद्यार्थी कुठे गेले?

पालिका प्रशासनाकडून या धक्कादायक घसरणीचे खापर आधार कार्ड अपलोडिंग आणि यू-डायसच्या ऑनलाइन नोंदीवर फोडण्यात आले आहे. सध्या यू-डायसमध्ये आधार कार्ड अपलोड झालेल्या विद्यार्थ्यांचीच संख्या दिसत असल्याचा दावा शिक्षण विभागाने केला आहे. काही विद्यार्थी ऑनलाइन नोंदीबाहेर असून काही विद्यार्थी गावी गेल्यामुळे शाळेत उपस्थित नसल्याचेही सांगण्यात आले आहे.

मात्र हा खुलासा प्रशासनाच्या अडचणी अधिक वाढवणारा ठरत आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होऊनही विद्यार्थ्यांच्या आधार नोंदी पूर्ण झाल्या नाहीत, तर त्यासाठी जबाबदार कोण? पालिका शाळांमध्ये प्रत्यक्ष किती विद्यार्थी शिकत आहेत, याची अचूक माहिती शिक्षण विभागाकडे नसेल तर कोट्यवधी रुपयांचे शैक्षणिक नियोजन नेमके कोणत्या आधारावर केले जाते?

‘सप्टेंबरअखेर आकडा वाढेल’ म्हणजे सध्याची आकडेवारी फक्त दिखावा?

शिक्षण विभागाच्या म्हणण्यानुसार विद्यार्थ्यांची अंतिम पटसंख्या ३० सप्टेंबरनंतर निश्चित होणार आहे. त्यामुळे सध्याची ५,०४२ ही संख्या अंतिम नसल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र प्रश्न असा आहे की मागील वर्षी जुलै महिन्यात ९,६१३ विद्यार्थी नोंदले गेले असताना यंदा त्याच कालावधीत निम्म्याहून कमी संख्या कशी काय?

जर प्रत्यक्ष विद्यार्थी शाळेत शिक्षण घेत असतील, तर त्यांची नावे, आधार क्रमांक आणि शैक्षणिक नोंदी ऑनलाइन करण्यासाठी प्रशासनाला इतका वेळ का लागतोय? ‘आधार अपलोड झाला नाही’ या एका कारणामागे संपूर्ण यंत्रणेचा हलगर्जीपणा लपवण्याचा प्रयत्न तर होत नाही ना? अशी चर्चा पालकांमध्ये सुरू झाली आहे.

कोट्यवधींचा खर्च, पण विद्यार्थ्यांची नोंदही व्यवस्थित नाही!

मीरा-भाईंदर महापालिका दरवर्षी शिक्षण विभागावर कोट्यवधी रुपये खर्च करते. विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य दिले जाते, शाळांच्या सुविधा वाढवण्याचे दावे केले जातात आणि दर्जेदार शिक्षणाचे धोरण राबवले जात असल्याचे प्रशासन सांगते. पण दुसरीकडे शाळांमध्ये नेमके किती विद्यार्थी आहेत, याचीच अचूक ऑनलाइन नोंद वेळेत उपलब्ध होत नसेल, तर या संपूर्ण व्यवस्थेच्या कार्यक्षमतेचे ऑडिट करण्याची वेळ आली आहे.

शाळानिहाय आकडे जाहीर करण्याची मागणी

आता पालिका प्रशासनाने केवळ सर्वसाधारण स्पष्टीकरण देण्याऐवजी प्रत्येक शाळेची मागील वर्षाची आणि यंदाची पटसंख्या, आधार अपलोडची संख्या, ऑनलाइन व ऑफलाइन विद्यार्थ्यांची स्वतंत्र संख्या आणि प्रत्यक्ष उपस्थित विद्यार्थ्यांची संख्या जाहीर करावी, अशी मागणी होत आहे. कारण ९,६१३ वरून ५,०४२ असा थेट घसरलेला आकडा हा किरकोळ तांत्रिक फरक नसून तब्बल ४,५७१ विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. हे विद्यार्थी प्रत्यक्षात शाळेत आहेत की नोंदणी प्रक्रियेतच हरवले आहेत, याचे उत्तर शिक्षण विभागाने शहराला द्यावे.

सप्टेंबरअखेर पटसंख्या वाढण्याची आशा दाखवून प्रशासनाची जबाबदारी संपणार नाही. आकडे वाढले तर ते विद्यार्थी आतापर्यंत कुठे होते आणि आकडे वाढले नाहीत तर हजारो विद्यार्थ्यांनी पालिका शाळांकडे पाठ का फिरवली, याचा जाब प्रशासनाला द्यावाच लागणार आहे!

SIR Form Controversy: SIR फॉर्म प्रकरणावरून खळबळ! मतदारांचे SIR फॉर्म सफाई कर्मचाऱ्याकडे कसे? तेजस्वी पाटील यांचा गंभीर सवाल

Web Title: Mira bhayandar municipal school student enrollment drops 47 percent udise aadhaar records

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2026 | 02:11 PM

Topics:  

  • mira bhayandar
  • School
  • Student

संबंधित बातम्या

Zilla Parishad School: भिंतींना तडे, छताला गळती; धोकादायक इमारतीत ६८ विद्यार्थ्यांचे भविष्य, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी
1

Zilla Parishad School: भिंतींना तडे, छताला गळती; धोकादायक इमारतीत ६८ विद्यार्थ्यांचे भविष्य, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी

Pratap Sarnaik: ‘आमदार मोठा की कायदा?’ बेकायदा बांधकामांवरून प्रताप सरनाईकांचा नरेंद्र मेहतांवर निशाणा
2

Pratap Sarnaik: ‘आमदार मोठा की कायदा?’ बेकायदा बांधकामांवरून प्रताप सरनाईकांचा नरेंद्र मेहतांवर निशाणा

SIR Form Controversy: SIR फॉर्म प्रकरणावरून खळबळ! मतदारांचे SIR फॉर्म सफाई कर्मचाऱ्याकडे कसे? तेजस्वी पाटील यांचा गंभीर सवाल
3

SIR Form Controversy: SIR फॉर्म प्रकरणावरून खळबळ! मतदारांचे SIR फॉर्म सफाई कर्मचाऱ्याकडे कसे? तेजस्वी पाटील यांचा गंभीर सवाल

मीरा-भाईंदरमध्ये दहीहंडीचा थरार! जय महाराष्ट्र, जय मल्हारने रचला आठ थरांचा विक्रम
4

मीरा-भाईंदरमध्ये दहीहंडीचा थरार! जय महाराष्ट्र, जय मल्हारने रचला आठ थरांचा विक्रम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.