Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Bhayandar School : 642 विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम? SIR कामासाठी शाळेतील सर्व 10 शिक्षकांची नियुक्ती; मनसेचा संताप

राज्यभर सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) प्रक्रियेसाठी शिक्षकांची नियुक्ती केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. मिरा-भाईंदर महापालिका शाळा क्रमांक 19 मधील सर्व 10 शिक्षक SIR कामासाठी नियुक्त झाल्याने 642 विद्यार्थ्यांचे नियमित अध्यापन ठप्प....

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 16, 2026 | 02:25 PM
642 विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम? SIR कामासाठी शाळेतील सर्व 10 शिक्षकांची नियुक्ती; मनसेचा संताप

642 विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम? SIR कामासाठी शाळेतील सर्व 10 शिक्षकांची नियुक्ती; मनसेचा संताप

Follow Us
Follow Us:
  • SIR प्रक्रियेसाठी सर्व शिक्षक तैनात
  • 642 विद्यार्थ्यांचे शिक्षण ठप्प झाल्याचा मनसेचा आरोप
  • मनपा शाळा क्रमांक 19 मधील सर्व 10 शिक्षक SIR कामावर
विजय काते, मिरा रोड : राज्यभर सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) प्रक्रियेसाठी शिक्षकांची नियुक्ती करण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) केला आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेचे शहराध्यक्ष संदीप राणे यांनी काशिमीरा येथील मिरा-भाईंदर महानगरपालिका शाळा क्रमांक 19 (माशाचा पाडा) येथे भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

या शाळेत 642 विद्यार्थी शिक्षण घेत असून केवळ 10 शिक्षक कार्यरत आहेत. मात्र, SIR प्रक्रियेसाठी या शाळेतील सर्व 10 शिक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे नियमित अध्यापन ठप्प झाल्याचा आरोप मनसेने केला आहे. शाळेला भेट दिल्यानंतर संदीप राणे यांनी मुख्याध्यापकांकडे याबाबत जाब विचारला. त्यावेळी मुख्याध्यापकांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार शिक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याचे सांगत, यासंदर्भात महापालिका आयुक्तांशी चर्चा करण्याचे सुचविले.

मतदार ओळखपत्र खरंच रद्द होणार का? निवडणूक आयोगाचा महत्त्वपूर्ण खुलासा

यावेळी संदीप राणे म्हणाले, “शाळा सुरू होऊन जवळपास महिना झाला आहे. मात्र शिक्षक SIR प्रक्रियेत गुंतल्याने विद्यार्थ्यांचे नियमित शिक्षण होत नाही. आधीच शिक्षकांची कमतरता असताना एका शाळेतील सर्व शिक्षकांना इतर कामासाठी नियुक्त करणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ आहे.” मनसेने या निर्णयाचा निषेध करत, मिरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देऊन शिक्षकांना तातडीने पुन्हा अध्यापनासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे संदीप राणे यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणावर महापालिका प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.

एसआयआर (विशेष पुनरावलोकन) म्हणजे काय?

एसआयआरचा मुख्य उद्देश मतदार यादीतील माहिती अद्ययावत ठेवणे हा आहे. यामध्ये मृत व्यक्तींची नावे वगळणे, स्थलांतरित झालेल्या मतदारांचे पत्ते दुरुस्त करणे, दुबार नोंदी काढून टाकणे आणि पात्र नागरिकांची नावे समाविष्ट करणे यांचा समावेश होतो. या मोहिमेदरम्यान, बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) त्यांच्या भागातील मतदारांच्या माहितीची पडताळणी करतात. काही प्रकरणांमध्ये, ते पडताळणीसाठी घरोघरी जातात, तर इतर प्रकरणांमध्ये, मतदारांना आवश्यक अर्ज भरून त्यांची माहिती अद्ययावत करण्यास सांगितले जाते.

एसआयआर कार्यक्रमांतर्गत पिंपळगाव राजात कामकाजाची पाहणी; अधिकाऱ्यांना दिल्या मार्गदर्शक सूचना

महाराष्ट्रातील मतदार यादी अद्ययावत ठेवण्यासाठी, निवडणूक आयोग वेळोवेळी विशेष सखोल पुनरावलोकन (SIR) आयोजित करण्यात आले आहे. या प्रक्रियेबाबत सोशल मीडियावर विविध दावे आणि अफवा पसरत आहेत, जसे की, “प्रत्येक मतदाराला सर्व कागदपत्रे पुन्हा सादर करावी लागतील,” “आधार कार्ड नसलेल्यांची नावे मतदार यादीतून काढून टाकली जातील,” किंवा “प्रत्येकाला नव्याने नोंदणी करावी लागेल.” तथापि, अधिकृत नियमांनुसार आणि निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, हे दावे पूर्णपणे दिशाभूल करणारे आहेत.

Web Title: Mira bhayandar school teachers deployed for sir process mns alleges studies affected

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 02:24 PM

Topics:  

  • mira bhayandar
  • MNS
  • SIR

संबंधित बातम्या

राज ठाकरेंवर रील केली अन् महेश मोटेला ‘मनसे’वाल्यांनी काळं फासलं; डोक्यावर चप्पल ठेवून उठाबशा, VIDEO व्हायरल
1

राज ठाकरेंवर रील केली अन् महेश मोटेला ‘मनसे’वाल्यांनी काळं फासलं; डोक्यावर चप्पल ठेवून उठाबशा, VIDEO व्हायरल

Mira Bhayandar Schools: चार महिने उलटले, तरी विद्यार्थ्यांच्या हातात पाण्याची बाटली नाही! महापालिका शाळांचा ढिसाळ कारभार
2

Mira Bhayandar Schools: चार महिने उलटले, तरी विद्यार्थ्यांच्या हातात पाण्याची बाटली नाही! महापालिका शाळांचा ढिसाळ कारभार

‘राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत,’ अमित ठाकरेंचं गणरायाकडे साकडं, ‘मला माहितीये तो माणूस…’
3

‘राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत,’ अमित ठाकरेंचं गणरायाकडे साकडं, ‘मला माहितीये तो माणूस…’

KDMC News: रस्त्याच्या भरावामुळे नाल्याचा प्रवाह अडला? इंदिरा नगरमध्ये घर-दुकानांत घुसले घाण पाणी; मनसे आक्रमक
4

KDMC News: रस्त्याच्या भरावामुळे नाल्याचा प्रवाह अडला? इंदिरा नगरमध्ये घर-दुकानांत घुसले घाण पाणी; मनसे आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.