Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत,’ अमित ठाकरेंचं गणरायाकडे साकडं, ‘मला माहितीये तो माणूस…’

अमित ठाकरेंनी पुणे दौऱ्यात राज ठाकरे यांच्या नेतृत्वाबाबत मोठं वक्तव्य केलं. राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा त्यांनी गणरायाकडे व्यक्त केल्याचं सांगितलं.

  • By विवेक
Updated On: Sep 20, 2026 | 09:30 PM
“राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत”; अमित ठाकरेंची गणरायाकडे इच्छा

“राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत”; अमित ठाकरेंची गणरायाकडे इच्छा

Follow Us
Follow Us:
  • “राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत”; अमित ठाकरेंची गणरायाकडे इच्छा
  • “मला माहितीये तो माणूस काय काम करू शकतो”; वडिलांच्या कामाचा दाखला
  • दुष्काळ आढावा बैठकीतील काजू-बदामावरून सरकारला शेतकऱ्यांच्या घरात जाण्याचा सल्ला
 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या राजकीय भूमिकांबरोबरच आता त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांचं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. पुणे दौऱ्यावर असताना अमित ठाकरेंनी गणरायाकडे आपण काय साकडं घातलं, याबाबत भाष्य केलं. राज ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, अशी आपली इच्छा असल्याचं अमित ठाकरेंनी सांगितलं.

“राज ठाकरे यांच्यासारखा माणूस मुख्यमंत्रिपदावर असावा”

अमित ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या कामाचा दाखला देताना त्यांच्या नेतृत्वक्षमतेवर विश्वास व्यक्त केला. “राज ठाकरे यांच्यासारखा माणूस मुख्यमंत्रिपदावर असावा. मला माहिती आहे तो माणूस काय काम करू शकतो. त्यांनी नाशिक शहरात खूप काम केलं आहे. ते नाशिक शहरात एवढं काम करू शकत असतील, तर राज्यासाठीही खूप काही करू शकतात,” असं अमित ठाकरे म्हणाले.

राज्यात सध्या अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, असं सांगत अमित ठाकरेंनी पेपरफुटी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. या प्रश्नांवर राज ठाकरे काम करू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांचं हे वक्तव्य सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

Sushma Andhare : ‘शेतकरी उपाशी मरतोय, नेते काजू-बदामावर ताव मारतायत,’ सुषमा अंधारेंचा सरकारवर हल्लाबोल

दरम्यान, पुण्यातील एका सरकारी तंत्रनिकेतन महाविद्यालयातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोवरून अमित ठाकरे याआधीच चर्चेत आले होते. महाविद्यालयाच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोशेजारी लावलेला मोदींचा फोटो हटवण्यात आल्याच्या घटनेनंतर त्यांच्यासह काही मनसे कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

दुष्काळाच्या मुद्द्यावरही सरकारला टोला

राज्यात पावसाचा खंड पडल्याने अनेक भागांतील शेतकरी अडचणीत आहेत. याच पार्श्वभूमीवर दुष्काळ आढावा बैठकीत खासदारांना काजू-बदाम देण्यात आल्याच्या मुद्द्यावरूनही अमित ठाकरेंनी सरकारला टोला लगावला.

“तुम्ही अन्न खायचं बंद करा, असं आमचं मत नाही. तुम्हाला काय खायचं ते खा. पण जनतेचे प्रश्न सोडवा. रुममध्ये बसून तुम्हाला शेतकऱ्यांचे प्रश्न समजणार नाहीत. शेतकऱ्यांच्या घरात जा,” असा सल्ला अमित ठाकरेंनी दिला.

त्यामुळे एका बाजूला राज ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदाची इच्छा व्यक्त करणारे अमित ठाकरे आणि दुसऱ्या बाजूला शेतकरी प्रश्नावर सरकारला थेट सवाल करणारे त्यांचे वक्तव्य, यामुळे त्यांच्या पुणे दौऱ्याची राजकीय चर्चा रंगली आहे.

Rohit Pawar : मराठवाड्यात दुष्काळाची दाहकता; ‘शक्तीपीठ’चा पैसा शेतकऱ्यांसाठी वळवा, रोहित पवारांची सरकारकडे मोठी मागणी

Web Title: Amit thackeray raj thackeray chief minister ganpati pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2026 | 09:30 PM

Topics:  

  • amit thackeray
  • MNS
  • raj thackeray

संबंधित बातम्या

KDMC News: रस्त्याच्या भरावामुळे नाल्याचा प्रवाह अडला? इंदिरा नगरमध्ये घर-दुकानांत घुसले घाण पाणी; मनसे आक्रमक
1

KDMC News: रस्त्याच्या भरावामुळे नाल्याचा प्रवाह अडला? इंदिरा नगरमध्ये घर-दुकानांत घुसले घाण पाणी; मनसे आक्रमक

Raj Thackeray on UPI : युपीआय शुल्कावर राज ठाकरे संतापले; ‘डिजिटल सापळा’ म्हणत केंद्रावर केला घणाघात
2

Raj Thackeray on UPI : युपीआय शुल्कावर राज ठाकरे संतापले; ‘डिजिटल सापळा’ म्हणत केंद्रावर केला घणाघात

Raj Thackeray :  ‘आज प्रबोधनकार असते तर लेखणीचे आसूड ओढले असते’; राज ठाकरेंचा राजकारण्यांना टोला
3

Raj Thackeray : ‘आज प्रबोधनकार असते तर लेखणीचे आसूड ओढले असते’; राज ठाकरेंचा राजकारण्यांना टोला

मानीव दिनांकापासूनची पदोन्नती प्रक्रिया रद्द करा; अन्यथा…; मनसेचे महापालिका प्रशासनाला निवेदन
4

मानीव दिनांकापासूनची पदोन्नती प्रक्रिया रद्द करा; अन्यथा…; मनसेचे महापालिका प्रशासनाला निवेदन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.