Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 13 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Bhayandar महापालिकेच्या नामकरण प्रस्तावांना मराठी एकीकरण समितीचा विरोध; दोन नावांवर आक्षेप

Mira Bhayandar: मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या १३ ऑगस्ट रोजी होणाऱ्या महासभेतील रस्ते, चौक आणि वास्तूंच्या नामकरण प्रस्तावावर मराठी एकीकरण समितीने हरकत घेतली आहे. ‘श्री गुरु जम्भेश्वर चौक’ आणि ‘महाराजा अग्रसेन मार्ग’ या प्रस्तावित नावांना समितीचा विरोध आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 13, 2026 | 01:03 PM
Mira Bhayandar महापालिकेच्या नामकरण प्रस्तावांना मराठी एकीकरण समितीचा विरोध; दोन नावांवर आक्षेप

Mira Bhayandar महापालिकेच्या नामकरण प्रस्तावांना मराठी एकीकरण समितीचा विरोध; दोन नावांवर आक्षेप

Follow Us
Follow Us:
  • ‘गुरु जम्भेश्वर चौक’, ‘महाराजा अग्रसेन मार्ग’ नावांवर हरकत
  • मराठी एकीकरण समितीची मागणी
  • महापालिका सभागृहाला अजितदादा पवार यांचे नाव द्या
विजय काते, भाईंदर : मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या १३ ऑगस्ट रोजी होणाऱ्या महासभेतील विषयपत्रिकेवरील प्रकरण क्रमांक ५० अंतर्गत रस्ते, चौक आणि वास्तूंच्या प्रस्तावित नामकरणावर मराठी एकीकरण समितीने तीव्र हरकत नोंदवली आहे. समितीचे गोवर्धन सखाराम देशमुख यांनी महापालिका आयुक्त आणि महापौर यांना निवेदन देत काही प्रस्तावित नावे रद्द करण्याची मागणी केली आहे. महापालिकेच्या नामकरण प्रस्तावातील अ.क्र. ८ वरील ‘श्री गुरु जम्भेश्वर चौक’ आणि अ.क्र. ९ वरील ‘महाराजा अग्रसेन मार्ग’ या नावांवर समितीने आक्षेप घेतला आहे. ही नावे स्थानिक इतिहास व महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाशी संबंधित नसल्याचे समितीचे म्हणणे आहे. (Mira Bhayandar )

मिरा-भाईंदर हादरलं! आक्षेपार्ह व्हिडीओचा धाक दाखवून १४ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; ६ जणांवर गुन्हा दाखल, दोघे गजाआड

महापालिका सभागृहाला अजितदादा पवार यांचे नाव द्या

दरम्यान, महापालिका मुख्यालयातील कॉन्फरन्स हॉलसाठी ‘माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सभागृह’ आणि ‘पंडित दीनदयाल उपाध्याय सभागृह’ अशी दोन नावे प्रस्तावित असल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. यापैकी सभागृहाला स्वर्गीय माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी समितीने केली आहे.

सर्वाधिक आक्षेप अ.क्र. १८ मधील प्रस्तावावर घेण्यात आला आहे. मिरारोड पूर्वेकडील एका चौकाला ‘शांतीस्टार बिल्डर्स श्री. असित रमेश शाह चौक’ असे नाव देण्याचा प्रस्ताव असल्याचा दावा समितीने केला आहे. सार्वजनिक रस्ते आणि चौकांना खासगी विकासक अथवा व्यावसायिक व्यक्तींची नावे देणे चुकीचे असून, यामुळे भविष्यात चुकीचा पायंडा पडू शकतो, असे समितीने म्हटले आहे.

हुतात्मा राजगुरू यांचे नाव देण्याची मागणी

सार्वजनिक मालमत्तांच्या नामकरणात स्थानिक इतिहास, भूमिपुत्र, स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, खेळाडू, कवी, लेखक आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील हुतात्म्यांना प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. जेपी परिसरातील मार्ग किंवा चौकाला हुतात्मा राजगुरू यांचे नाव देण्याची मागणी यापूर्वीच करण्यात आल्याची आठवणही समितीने करून दिली आहे.

या हरकतींची दखल घेऊन संबंधित प्रस्ताव महासभेत नामंजूर करावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच मागण्यांकडे दुर्लक्ष करून इतर राज्यांतील व्यक्ती, इतर संस्कृती किंवा खासगी विकासकांची नावे सार्वजनिक ठिकाणांना देण्यात आल्यास मराठी एकीकरण समितीतर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

Mira Bhayander : मोठी दुर्घटना टळली! भाईंदरच्या उत्तनमध्ये जमिनीत जिवंत तोफगोळा सापडला; एनएसजीच्या कारवाईत सुरक्षित निकामी

Web Title: Mira bhayandar naming proposals marathi ekikaran samiti objection

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2026 | 01:03 PM

Topics:  

  • maharashtra
  • Maharashtra Politics
  • mira bhayandar

संबंधित बातम्या

Mumbai News: अरे देवा! नॉनव्हेज खात असाल तर घर मिळणार नाही…; इस्टेट एजंटच्या व्हायरल व्हिडीओने मुंबईत नवा वाद, कारवाईची मागणी
1

Mumbai News: अरे देवा! नॉनव्हेज खात असाल तर घर मिळणार नाही…; इस्टेट एजंटच्या व्हायरल व्हिडीओने मुंबईत नवा वाद, कारवाईची मागणी

पाच वर्षांत राज्यातील 36211 कंपन्यांना टाळे, मुंबईत सर्वाधिक कंपन्या बंद; वाचा सविस्तर आकडेवारी
2

पाच वर्षांत राज्यातील 36211 कंपन्यांना टाळे, मुंबईत सर्वाधिक कंपन्या बंद; वाचा सविस्तर आकडेवारी

Manoj Jarange Patil Attack on State Govt: मराठ्यांचे वाटोळे करणाऱ्यांना सोडणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात
3

Manoj Jarange Patil Attack on State Govt: मराठ्यांचे वाटोळे करणाऱ्यांना सोडणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात

Maharashtra Breaking News Live Updates Today: राज्यातील 1.80 कोटी मतदारांची नावे वगळणार?
4

Maharashtra Breaking News Live Updates Today: राज्यातील 1.80 कोटी मतदारांची नावे वगळणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.