Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 13 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Bhayandar News: उत्तनसह ५ गावांचे सिटी सर्वेक्षण ९ वर्षांपासून रखडले; आगरी-कोळी नागरिकांच्या मालकी हक्काचा प्रश्न ऐरणीवर

Mira Bhayandar News: मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातील उत्तन, चौक, पाली, डोंगरी आणि तारोडी या पाच गावांचे सिटी सर्वेक्षण गेल्या नऊ वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे पिढ्यान्‌पिढ्या या गावांमध्ये वास्तव्य करणाऱ्या आगरी-कोळी नागरिकांना त्यांच्या मालमत्तेवर अधिकृत मालकी हक्क प्रस्थापित करताना अडचणी येत आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 13, 2026 | 05:19 PM
उत्तनसह ५ गावांचे सिटी सर्वेक्षण ९ वर्षांपासून रखडले; आगरी-कोळी नागरिकांच्या मालकी हक्काचा प्रश्न ऐरणीवर

उत्तनसह ५ गावांचे सिटी सर्वेक्षण ९ वर्षांपासून रखडले; आगरी-कोळी नागरिकांच्या मालकी हक्काचा प्रश्न ऐरणीवर

Follow Us
Follow Us:
  • उत्तनसह पाच गावांचे सिटी सर्वेक्षण नऊ वर्षांपासून रखडले
  • स्थानिकांच्या मालकी हक्काचा प्रश्न ऐरणीवर
  • ५ गावांच्या सिटी सर्वेक्षणावरून महासभेत संताप
विजय काते, मिरा-भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातील उत्तन, चौक, पाली, डोंगरी आणि तारोडी या पाच गावांचे सिटी सर्वेक्षण गेल्या नऊ वर्षांपासून रखडले आहे. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे या गावांमध्ये पिढ्यान्‌पिढ्या वास्तव्य करणाऱ्या आगरी-कोळी नागरिकांना त्यांच्या मालमत्तेवर अधिकृत मालकी हक्क प्रस्थापित करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे स्थानिकांना त्यांच्या पारंपरिक जमिनीपासून वंचित करून शहराबाहेर जाण्यास भाग पाडण्याचा घाट घातला जात असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेच्या नगरसेविका शर्मिला बगाजी यांनी गुरुवारी महापालिकेच्या महासभेत केला.

मिरा-भाईंदर शहरातील जुन्या गावांमधील मालमत्तांचे नगरभूमापन करण्याचा निर्णय महापालिकेने २००७ मध्ये घेतला होता. त्यासाठी तीन खासगी संस्थांची नियुक्ती करण्यात आली होती. शहरातील एकूण १९ गावांपैकी १४ गावांचे सिटी सर्वेक्षण पूर्ण झाले. मात्र उत्तन, चौक, पाली, डोंगरी आणि तारोडी या पाच गावांनी सुरुवातीला सिटी सर्वेक्षणाला विरोध केल्याने या गावांचे सर्वेक्षण रखडले.

Mira Bhayander : मोठी दुर्घटना टळली! भाईंदरच्या उत्तनमध्ये जमिनीत जिवंत तोफगोळा सापडला; एनएसजीच्या कारवाईत सुरक्षित निकामी

दरम्यान, नंतर या पाच गावांनी सिटी सर्वेक्षणास संमती दिली. त्यानंतर २०१८ मध्ये महापालिकेने प्रशासकीय ठराव करून या गावांचे नगरभूमापन करण्याचा निर्णय घेतला. मात्र या निर्णयाला अनेक वर्षे उलटूनही प्रत्यक्ष सर्वेक्षणाचे काम सुरू झाले नसल्याचा मुद्दा नगरसेविका शर्मिला बगाजी यांनी महासभेतील प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला.

मालकी हक्कासह बांधकाम परवानग्यांवरही परिणाम

सिटी सर्वेक्षणाअभावी या गावांतील नागरिकांना आपल्या मालमत्तेचा अधिकृत मालकी हक्क सिद्ध करताना अडचणी येत आहेत. त्याचबरोबर बांधकाम, मालमत्ता हस्तांतरण आणि इतर मालमत्तेशी संबंधित कामांवरही त्याचा परिणाम होत आहे.

या गावांमध्ये अनेक कुटुंबे पिढ्यान्‌पिढ्या राहत असून, त्यांचा जन्म आणि मृत्यूदेखील याच गावांमध्ये झाला आहे. मात्र अद्याप त्यांच्या जमिनींचे अधिकृत नगरभूमापन पूर्ण झालेले नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे स्थानिकांच्या हक्कांवर गदा येत असल्याचा आरोप बगाजी यांनी केला.

जुन्या दराचा पेच, वाढीव दराला नकार

२०१८ मध्ये पाच गावांनी सर्वेक्षणास संमती दिल्यानंतर महापालिकेने संबंधित संस्थेला काम देण्याची प्रक्रिया सुरू केली. मात्र पूर्वीच्या दराने काम करणे संबंधित संस्थेला आर्थिकदृष्ट्या अडचणीचे ठरत असल्याने संस्थेने वाढीव दराने सर्वेक्षण करण्याची मागणी केली.

मात्र ठाणे भूमी अभिलेख विभागाने दरवाढीस नकार दिल्याने या कामाचा पेच निर्माण झाला. त्यानंतर महापालिका आयुक्तांनी संबंधित संस्थेला जुन्या दरानेच सर्वेक्षण करण्याची विनंती केली. या विनंतीला संस्थेने संमती दर्शवली.

दरम्यान, उत्तन परिसरातील विकास आराखड्याचे काम सुरू असल्याने संबंधित संस्थेने ड्रोनच्या माध्यमातून प्राथमिक सर्वेक्षण केले आहे. या प्राथमिक सर्वेक्षणाचा अहवाल मंजुरीसाठी सिटी सर्वे विभागाकडे पाठविण्यात आला आहे.

मंजुरीनंतर प्रत्यक्ष सर्वेक्षण

ड्रोन सर्वेक्षणाचा अहवाल मंजूर झाल्यानंतर प्रत्यक्ष सर्वेक्षणाचे काम हाती घेऊन पाच गावांचे नगरभूमापन पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती नगररचनाकार पुरुषोत्तम शिंदे यांनी महासभेत दिली. त्यामुळे आता सिटी सर्वे विभागाकडून या अहवालाला मंजुरी कधी मिळते आणि प्रत्यक्ष सर्वेक्षणाचे काम कधी सुरू होते, याकडे उत्तनसह पाचही गावांतील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

१४ गावांतील नागरिकांनाही सनद मिळण्यास विलंब

दरम्यान, पाच गावांचे नगरभूमापन पूर्ण होईपर्यंत महापालिका क्षेत्रातील ज्या १४ गावांचे सर्वेक्षण यापूर्वीच पूर्ण झाले आहे, त्या गावांतील नागरिकांना मालमत्तेच्या सनद देण्याचे काम ठाणे भूमी अभिलेख विभागाकडून होणे अपेक्षित आहे. मात्र हे कामदेखील अद्याप रखडल्याचे महासभेत समोर आले.

Mira Bhayandar News: ‘आठवा अजूबा’ ब्रीजवर पुन्हा वाद; नवराष्ट्रच्या बातमीनंतर मनसे प्रशासनाला धारेवर धरणार

या कामाला गती देण्यासाठी चौकशी अधिकारी नेमण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर महापौरांनी संबंधित कामाचा आढावा घेऊन आवश्यक कार्यवाही करण्यासाठी चौकशी अधिकारी नेमण्याचे आदेश दिले. उत्तन, चौक, पाली, डोंगरी आणि तारोडी या पाच गावांचे सिटी सर्वेक्षण पूर्ण होऊन स्थानिक नागरिकांना त्यांच्या मालमत्तेचा अधिकृत हक्क मिळणार का, तसेच १४ गावांतील नागरिकांना सनद मिळण्याचा मार्ग कधी मोकळा होणार, याकडे आता संपूर्ण मिरा-भाईंदरचे लक्ष लागले आहे.

Web Title: Mira bhayandar city survey uttan chowk pali dongri tarodi agari koli land rights

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2026 | 05:19 PM

Topics:  

  • maharashtra
  • Maharashtra Politics
  • mira bhayandar

संबंधित बातम्या

Gondiya News: मृतदेह तब्बल दोन तास रस्त्यावर; स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण! शेतात केला अंत्यसंस्कार!
1

Gondiya News: मृतदेह तब्बल दोन तास रस्त्यावर; स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण! शेतात केला अंत्यसंस्कार!

सोनाली गायकवाड आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट, नवरा गेल्यानंतर सासरच्यांनी…; माहेरच्या नातेवाईकांचे गंभीर आरोप
2

सोनाली गायकवाड आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट, नवरा गेल्यानंतर सासरच्यांनी…; माहेरच्या नातेवाईकांचे गंभीर आरोप

FDA News: आता एजंटची पण खैर नाही…! ‘परवाना मिळवून देतो’ म्हणत पैशांची मागणी करणाऱ्यांपासून सावध, FDA चा इशारा
3

FDA News: आता एजंटची पण खैर नाही…! ‘परवाना मिळवून देतो’ म्हणत पैशांची मागणी करणाऱ्यांपासून सावध, FDA चा इशारा

From Worker to Contractor: मजुरापासून कंत्राटदारापर्यंत; सुनील अडे यांच्या मेहनतीची यशोगाथा
4

From Worker to Contractor: मजुरापासून कंत्राटदारापर्यंत; सुनील अडे यांच्या मेहनतीची यशोगाथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.