Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Exclusive: काशिमीरात मेट्रो ब्रिजखाली थरार! तरुणाच्या अंगावर कोसळला सिमेंटचा ब्लॉक; घटनेचा थरारक CCTV व्हिडिओ ‘नवराष्ट्र’च्या हाती

Exclusive: मिरा रोडच्या काशिमीरा परिसरातील अक्षित बारसमोर मेट्रो ब्रिजवरून सिमेंटचा ब्लॉक कोसळल्याने २३ वर्षीय शादाब गंभीर जखमी झाला. त्याच्यावर वोखहार्ड हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया सुरू असून या घटनेचा थरारक प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घटनेचा व्हिडिओ ‘नवराष्ट्र डिजिटल’च्या हाती लागला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 21, 2026 | 12:06 PM
काशिमीरात मेट्रो ब्रिजखाली थरार! तरुणाच्या अंगावर कोसळला सिमेंटचा ब्लॉक; घटनेचा थरारक CCTV व्हिडिओ ‘नवराष्ट्र’च्या हाती

काशिमीरात मेट्रो ब्रिजखाली थरार! तरुणाच्या अंगावर कोसळला सिमेंटचा ब्लॉक; घटनेचा थरारक CCTV व्हिडिओ ‘नवराष्ट्र’च्या हाती

Follow Us
Follow Us:
  • मिरा रोडमध्ये मेट्रो ब्रिजवरून सिमेंटचा ब्लॉक कोसळला
  • २३ वर्षीय तरुण गंभीर जखमी
  • घटनेचा थरारक CCTV व्हिडिओ ‘नवराष्ट्र डिजिटल’च्या हाती
 

विजय काते, मिरा रोड : मिरा-भाईंदरच्या काशिमीरा परिसरात मेट्रो ब्रिजखाली सुरू असलेल्या कामादरम्यान सिमेंटचा मोठा ब्लॉक अचानक खाली कोसळल्याने २३ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काशिमीरा येथील अक्षित बारसमोर ही घटना घडली. संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून या घटनेचे Exclusive CCTV फुटेज ‘नवराष्ट्र डिजिटल’च्या हाती लागले आहे.

फोन आला अन् रस्त्याच्या मध्यभागी थांबला शादाब

मिळालेल्या माहितीनुसार, शादाब नावाचा २३ वर्षीय तरुण रस्ता ओलांडून जात होता. त्याचवेळी त्याच्या मोबाइलवर फोन आला. फोनवर बोलण्यासाठी तो रस्त्याच्या मध्यभागी काही क्षण थांबला. मात्र, पुढच्या काही क्षणांतच त्याच्यासोबत भयंकर प्रकार घडला. मेट्रो ब्रिजच्या परिसरात सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणाहून अचानक सिमेंटचा मोठा ब्लॉक खाली कोसळला. हा ब्लॉक थेट शादाबच्या डोक्यावर आदळला. अचानक झालेल्या या घटनेत शादाब गंभीर जखमी झाला आणि रस्त्यावर कोसळला.

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात

गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडून होता तरुण

या घटनेनंतर शादाब गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडून होता. मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास तासभर तो त्याच ठिकाणी पडून होता. रस्त्याच्या कडेला मोठी वाहने उभी असल्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना आणि वाहनचालकांना तो सहज दिसला नसल्याचे सांगण्यात येत आहे. अखेर एका व्यक्तीचे शादाबकडे लक्ष गेले. त्यानंतर तातडीने मदतीसाठी धावपळ सुरू करण्यात आली. रिक्षाच्या मदतीने जखमी शादाबला मिरा रोड येथील वोखहार्ड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.

डोक्याला गंभीर दुखापत; शस्त्रक्रिया सुरू

सिमेंटचा ब्लॉक थेट डोक्यावर आदळल्याने शादाबच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर वोखहार्ड हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर शादाबच्या कुटुंबीयांकडून पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे समजते.

CCTV मध्ये कैद झाला धक्कादायक प्रकार

या घटनेचा थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. उपलब्ध फुटेजमध्ये तरुण रस्त्याच्या परिसरात असताना अचानक वरून वस्तू कोसळल्याचा प्रकार दिसत असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेचे Exclusive CCTV फुटेज ‘नवराष्ट्र डिजिटल’च्या हाती लागले आहे.

मेट्रोच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

या घटनेनंतर मेट्रो ब्रिजखाली सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षेसाठी पुरेशा उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मेट्रोचे काम सुरू असताना खालील रस्त्यावरून पादचारी आणि वाहनांची ये-जा सुरू असल्यास बांधकाम साहित्य खाली पडू नये यासाठी आवश्यक सुरक्षा व्यवस्था असणे महत्त्वाचे ठरते.

स्थानिकांच्या दाव्यानुसार, यापूर्वीही या परिसरात बांधकाम साहित्य तसेच लोखंडी वस्तू खाली पडण्याचे प्रकार घडले आहेत. या दाव्यांची अधिकृत पुष्टी होणे बाकी आहे. मात्र, आता सिमेंटचा मोठा ब्लॉक कोसळून तरुण गंभीर जखमी झाल्याने कामाच्या ठिकाणच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.

जबाबदारी निश्चित करण्याची मागणी

या घटनेला नेमके कोण जबाबदार आहे, सिमेंटचा ब्लॉक कोणत्या कारणामुळे खाली कोसळला आणि कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाय करण्यात आले होते का, याची चौकशी होण्याची गरज व्यक्त केली जात आहे. संबंधित यंत्रणांकडून या घटनेबाबत अधिकृत स्पष्टीकरण आल्यानंतरच दुर्घटनेचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकणार आहे.

दरम्यान, गंभीर जखमी शादाबवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्या कुटुंबीयांकडून पोलिसांत तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती असून, पुढील पोलीस कारवाईकडेही लक्ष लागले आहे.

शाळकरी विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात! एका बाईकवर पाच विद्यार्थी, नियमांची पायमल्ली; Viral Video ने उघड केला निष्काळजीपणा

Web Title: Mira road metro bridge cement block falls 23 year old youth seriously injured kashimira cctv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2026 | 12:06 PM

Topics:  

  • Accident
  • Metro
  • Mira Road

संबंधित बातम्या

Mumbai BMW Accident : मुंबईच्या कोस्टल रोडवर अपघात… लाला कॉलेजसमोरील लोटस जेट्टी जवळील घटना
1

Mumbai BMW Accident : मुंबईच्या कोस्टल रोडवर अपघात… लाला कॉलेजसमोरील लोटस जेट्टी जवळील घटना

Buldhana Accident: कंटेनरच्या धडकेत मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू; बुलढाणा-धाड मार्गावरील शिवसाईनगरजवळ भीषण अपघात
2

Buldhana Accident: कंटेनरच्या धडकेत मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू; बुलढाणा-धाड मार्गावरील शिवसाईनगरजवळ भीषण अपघात

Big Breaking: अचानक आलेल्या डुलकीने केला गेम!  पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर विचित्र अपघात, 2 जखमी तर…
3

Big Breaking: अचानक आलेल्या डुलकीने केला गेम! पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर विचित्र अपघात, 2 जखमी तर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.