Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kalyan Dombivli MNS Warns Mahavitran Protest : कल्याण- डोबिंवलीकरांच्या वीजेचा प्रश्न सोडवा नाहीतर… महावितरणावर मनसे आक्रमक

मनसेने महावितरण प्रशासनाला आठ दिवसांचा अवधी दिला आहे. या कालावधीत तक्रारींवर ठोस निर्णय झाला नाही, तर सर्व वीज ग्राहकांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा दिला

  • By Riddhi Vanne
Updated On: Jul 14, 2026 | 08:20 PM
Kalyan Dombivli MNS Warns Mahavitran Protest : कल्याण- डोबिंवलीकरांच्या वीजेचा प्रश्न सोडवा नाहीतर… महावितरणावर मनसे आक्रमक
Follow Us
Follow Us:

कल्याण-डोंबिवली परिसरातील वीज ग्राहकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वाढीव येणारी लाईटबील, स्मार्ट मीटरसंदर्भात असलेला गोंधळ, मीटर बदले तरीसुद्धा येणारे जास्तीचे बील, वांरवार लाईट जाणे. यासर्व कारणांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. मनसे याबाबत नागरिकांच्या तक्रारी गोळा गेल्या त्यानंतर महावितरण प्रशासनाकडे सादर केल्या.

  • वीजबिलांवर नागरिक संतप्त
  • स्मार्ट मीटर गोंधळ
  • दोन हजार सह्यांचे निवेदन
  • महावितरणला आठ दिवस
  • आंदोलनाचा इशारा
  • वारंवार वीज खंडित
कल्याण- डोंबिवलीकरणासाठी मनसे आक्रमक 

मनसेने दोन हजार नागरिकांच्या सह्यांसह निवेदन कल्याणच्या महावितरणच्या मुख्य अभियंत्यांकडे दिले आहे. शहरातील वीज ग्राहकांना भेडसावणाऱ्या प्रमुख समस्या मांडल्या आहेत आणि त्या तातडीने सोडविण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने या तक्रारींकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा दिला आहे.

महावितरणावर नागरिक संतप्त

नागरिकांचे म्हणणे आहे की नियमितपणे वीजबिल भरूनही अनेकदा अवास्तव रकमेची बिले हातात पडत आहेत. स्मार्ट मीटर बसवल्यानंतर बिलांमध्ये अचानक वाढ झाल्याच्या तक्रारी आहेत. टीओडी मीटरबाबत पुरेशी माहिती नसल्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम आहे. अनेकांनी स्थानिक कार्यालयात तक्रारी केल्या तरी त्यांना समाधानकारक उत्तर मिळत नाही.

आझाद मैदानावर पान व्यावसायिकांचा ऐतिहासिक मोर्चा; IPC 328 आणि MCOCA च्या कथित गैरवापराविरोधात लाखोंचा आवाज

वीजपुरवठ्याचा प्रश्नही नागरिकांसाठी मोठी समस्या आहे. शहरातील अनेक भागांत दिवसातून अनेकवेळा वीज जाते, तर काही ठिकाणी कमी-जास्त दाबामुळे घरगुती उपकरणांवर परिणाम होतो. पावसाळ्यात ही समस्या अधिक तीव्र होते आणि विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी आणि लघुउद्योजकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागतो.

मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे तक्रारींची यादी दिली आहे आणि प्रत्येक प्रकरणाची स्वतंत्र तपासणी करून योग्य तो निर्णय घेण्याची मागणी केली आहे. ग्राहकांना कार्यालयांचे वारंवार हेलपाटे मारावे लागू नयेत, तक्रार निवारण प्रक्रिया वेगवान व्हावी आणि वाढीव बिलांबाबत पारदर्शक चौकशी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

नागरिकांकडून चांगला प्रतिसाद 

या उपक्रमाला परिसरातील नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अनेक रहिवाशांनी आपल्या समस्या लेखी स्वरूपात पक्षाकडे दिल्या आहेत आणि त्या महावितरणपर्यंत पोहोचविण्यात आल्या आहेत. नागरिकांचे प्रश्न सुटेपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

Mumbai News: तिकीट तपासताना कोणतेही गैरवर्तन नाही! अंधेरी एसी लोकलमधील वादावर पश्चिम रेल्वेचे स्पष्टीकरण

मनसेने महावितरण प्रशासनाला आठ दिवसांचा अवधी दिला आहे. या कालावधीत तक्रारींवर ठोस निर्णय झाला नाही, तर सर्व वीज ग्राहकांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा दिला आहे. या आंदोलनाची जबाबदारी प्रशासनाची असेल, असेही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नमूद केले आहे.

या निवेदनावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष राहुल कामत, शहराध्यक्ष हर्षद पाटील यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिला आणि पुरुष शाखा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरातील वीज समस्यांवर तातडीने तोडगा निघावा आणि ग्राहकांना दिलासा मिळावा, हीच नागरिकांची प्रमुख अपेक्षा आहे.

Web Title: Mns warns mahavitaran over power bill issues smart meter complaints in kalyan dombivli

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 08:20 PM

Topics:  

  • Electricity Bill
  • MNS
  • MNS Leader Raj Thackeray

संबंधित बातम्या

मोदींचा फोटो हटवल्याने मुंबईत मनसे-भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा; शिवतीर्थ परिसरात तणावाचे वातावरण, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात
1

मोदींचा फोटो हटवल्याने मुंबईत मनसे-भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा; शिवतीर्थ परिसरात तणावाचे वातावरण, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात

Police Arrest MNS Workers: प्राचार्यांच्या केबिनमध्ये राडा, घोषणाबाजी; अमित ठाकरेंसह २०-२५ मनसैनिकांवर गुन्हा दाखल, दोघांना अटक
2

Police Arrest MNS Workers: प्राचार्यांच्या केबिनमध्ये राडा, घोषणाबाजी; अमित ठाकरेंसह २०-२५ मनसैनिकांवर गुन्हा दाखल, दोघांना अटक

Amit Thackeray : अमित ठाकरे यांच्यासह २५ जणांविरोधात गुन्हा दाखल; ट्रेसपासिंग आणि धमकीचा आरोप
3

Amit Thackeray : अमित ठाकरे यांच्यासह २५ जणांविरोधात गुन्हा दाखल; ट्रेसपासिंग आणि धमकीचा आरोप

Amit Thackeray : मोदींचा फोटो हटवल्याप्रकरणी अमित ठाकरेंसह २० ते २५ जणांविरोधात गुन्हा; चतु:शृंगी पोलिसांचा तपास सुरू
4

Amit Thackeray : मोदींचा फोटो हटवल्याप्रकरणी अमित ठाकरेंसह २० ते २५ जणांविरोधात गुन्हा; चतु:शृंगी पोलिसांचा तपास सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.