Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai News: वाशी एपीएमसीतील केळी पिकवण्याच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; नियमांचे उल्लंघन झाल्याची चौकशी

Navi Mumbai News: वाशी एपीएमसीमध्ये केळी पिकवण्याच्या प्रक्रियेचा कथित व्हिडिओ समोर आल्याने फळांची गुणवत्ता आणि खाद्यसुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रक्रियेत नियमांचे पालन झाले आहे की प्रतिबंधित रसायनांचा वापर करण्यात आला, याची चौकशी केली जाणार असून एफडीएच्या तपासणी अहवालाकडे लक्ष लागले आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 04, 2026 | 09:25 AM
फोटो सौजन्य- गुगल

फोटो सौजन्य- गुगल

Follow Us
Follow Us:
  • वाशी एपीएमसीमधील केळी पिकवण्याच्या प्रक्रियेची चौकशी कोण करणार?
  • वाशी एपीएमसीतील केळी पिकवण्याच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह
  • एपीएमसीमधील व्यापाऱ्यांवर नियमांचे उल्लंघन आढळल्यास कोणती कारवाई होऊ शकते?
 

वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात केळी पिकवण्याच्या प्रक्रियेचा कथित व्हिडिओ समोर आल्याने फळांच्या गुणवत्तेसह खाद्यसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. व्हिडिओमध्ये केळी पिकवण्याची प्रक्रिया दाखवण्यात आली असून, यामध्ये नियमांचे पालन केले जात आहे की प्रतिबंधित रसायनांचा वापर होत आहे, याची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.

एपीएमसीमधून नवी मुंबईसह मुंबई, ठाणे आणि परिसरातील विविध भागांत मोठ्या प्रमाणात फळांचा पुरवठा केला जातो. त्यामुळे केळी पिकवण्याच्या प्रक्रियेत खाद्यसुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित व्यापाऱ्यांसह बाजार समितीतील देखरेख यंत्रणा आणि अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीवरही प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे.

Ulhasnagar News : शिवसेना भाजपातील संघर्ष विकोपाला, पप्पू कलानी गँगस्टर तर रवींद्र चव्हाण मंचेकर गँगचे ऑपरेटर, शिवसेनेचा आरोप

व्यापाऱ्यांना एफडीआय चा धाक नाही ?

बाजारात एकसारख्या रंगाची, चमकदार आणि कमी कालावधीत पिकलेली केळी ग्राहकांचे लक्ष वेधून घेतात. मात्र केवळ रंग, चमक किंवा बाह्य स्वरूपावरून केळी सुरक्षित पद्धतीने पिकवली आहेत की नाही, समोर आलेल्या व्हिडिओतील प्रक्रिया नियमबाह्य असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यास, हा केवळ संबंधित व्यापाऱ्यापुरता मर्यादित विषय राहणार नाही. एपीएमसी परिसरात फळांची गुणवत्ता आणि खाद्यसुरक्षेच्या नियमांची नियमित तपासणी कितपत प्रभावीपणे केली जाते, यावरही प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे.

या प्रकरणी एपीएमसीचे सचिव डॉ. राजाराम धोंडकर यांनी संबंधित व्यापाऱ्यांना नोटीस बजावण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असून, एफडीआयच्या अहवालानुसार संबंधित व्यापारी दोषी आढळल्यास त्यांचा परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता एफडीआयच्या तपासणीकडे लक्ष लागले आहे. केळी सुरक्षित पद्धतीने पिकवली जात आहेत की नियमांना बगल देऊन प्रक्रिया केली जात आहे, याचे उत्तर अधिकृत चौकशी आणि प्रयोगशाळा तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे.

Navi Mumbai News: नवी मुंबई सायन्स पार्कच्या कामाला वेग; १०५ कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी, १३५ वैज्ञानिक मॉडेल्स उभारणार

एकसारख्या रंगाची चमकदार केळी म्हणजे सुरक्षितच असे नाही ?

हे निश्चित करता येत नाही. असामान्यपणे एकसारखा पिवळा रंग, बाहेरून पिकलेले दिसत असूनही आतून कडक राहणे, असामान्य वास किंवा चव जाणवणे यांसारख्या बाबींकडे ग्राहकांनी लक्ष देणे आवश्यक आहे. मात्र, या लक्षणांवरून केळ्यांमध्ये प्रतिबंधित रसायनांचा वापर झाल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही. त्यासाठी अधिकृत यंत्रणेकडून नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणी करणे आवश्यक आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Navi mumbai apmc banana ripening food safety issue pp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2026 | 09:25 AM

Topics:  

  • APMC Market
  • Navi Mumbai
  • Navi Mumbai News

संबंधित बातम्या

Navi Mumbai : APMC कांदा-बटाटा मार्केट बंदवर तात्पुरता तोडगा; मंगळवारी मंत्रालयात बैठक* | Navarashtra
1

Navi Mumbai : APMC कांदा-बटाटा मार्केट बंदवर तात्पुरता तोडगा; मंगळवारी मंत्रालयात बैठक* | Navarashtra

Navi Mumbai News: नवी मुंबई सायन्स पार्कच्या कामाला वेग; १०५ कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी, १३५ वैज्ञानिक मॉडेल्स उभारणार
2

Navi Mumbai News: नवी मुंबई सायन्स पार्कच्या कामाला वेग; १०५ कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी, १३५ वैज्ञानिक मॉडेल्स उभारणार

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या
3

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या

Navi Mumbai News: मोरबे धरणातील पाणीसाठा ७३.९० टक्क्यांवर; नवी मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन
4

Navi Mumbai News: मोरबे धरणातील पाणीसाठा ७३.९० टक्क्यांवर; नवी मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.