उल्हासनगरमध्ये भाजपचा मोठा निर्णय; श्रीकांत शिंदेंना सहकार्य न करण्याची भूमिका
Ulhasnagar News : उल्हासनगर मध्ये भाजप आणि शिवसेनेतील संघर्ष विकोपाला गेला आहे. भाजपाने पत्रकार परिषद घेऊन उल्हासनगर मध्ये युतीमधून बाहेर पडण्याची घोषणा केली तर यापुढे कोणत्याही निवडणुकीत खासदार श्रीकांत शिंदे यांना सहकार्य न करता काम करण्याची भूमिका घेतली. नुकत्याच पार पडलेल्या स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडी वरून सध्या शिवसेना आणि भाजपात संघर्ष सुरू झाला आहे.
दरम्यान याच पत्रकार परिषदेला शिवसेनेने देखील प्रत्युत्तर देत आम्ही युतीमध्येच असल्याचं स्पष्टीकरण दिलं. तर पप्पू कलानी गॅंग स्टार असतील तर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे मंचेकर गँगचे ऑपरेटर असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेनेच्या महापौर अश्विनी निकम यांचे पती कमलेश निकम यांनी पत्रकार परिषदेतून केला. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रवींद्र चव्हाण यांना प्रदेश अध्यक्ष पदावरून हटवावे रवींद्र चव्हाण केवळ कल्याण डोंबिवलीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. आगामी निवडणुकीत शिवसेना भाजपला दाखवून देईल.. असं म्हणत उल्हासनगर मध्ये भाजपा आणि शिवसेनेतील संघर्ष तीव्र होताना दिसून येतोय.






